Sunday, December 3, 2023

Vrunda Joshi Rao

#PULAFridayReview

#20kgLost

#superpositivereview

#weightlossreview

मी वृंदा राव. माझ्या second pregnancy nantar माझं वजन खूप वाढलं होतं. आधीच्या ७१ kg वरून ८३ पर्यंत मजल गेली होती. माझी आई मला सांगत होती की तुझं वजन वाढले ते तुला कमी करायला हवं. मला असं वाटायचं की ठीक आहे ना. जाड लोक पण graceful असतात. बघू काय करायचं. पण जेव्हा मी माझे pics पाहिले तेव्हा मला जाणवलं की माझे pics मलाच आवडत नाही तर मग मला वजन कमी करावच लागेल.

मी ऑप्शन्स check करत होते. पण मला कोठेही supplements घेऊन किंवा औषधं घेऊन वजन कमी करायचं नव्हतं. कारण मी माझ्या colleagues चे experience पाहिले होते. त्यांचं वजन औषधं ओर supplements घेऊन तात्पुरतं कमी झालं. पण नंतर पुन्हा वाढलं. किंवा ते रोगिष्ट दिसू लागले होते. मला माझ्या बॉडीवर वेटलोस चे negative साईड इफेक्टस नको होते.

त्यांचं वेळेस मला रेश्मा मॅडमचा reference FB च्या MLA ग्रूपवरून मिळाला. त्यांचे FB पेज चेक केले तेव्हा बऱ्याच testimonies मिळाल्या ज्यात कोणतेही supplements न घेता फक्त diet आणि excercise var भर देऊन clients चे २०-३० kg कमी केले असे वाचण्यात आले. मला असं वाटलं की मे हे try करायला हरकत नाही.

पण मला जमेल की नाही अशी शंका वाटायची. असं वाटायचं diet फॉलो नाही करता आलं तर?? आणि रोजच्या खाण्यापेक्षा काही वेगळं diet routines दिले तर मला जमेल का?? कारण मी working woman असून घरी सासू सासरे आणि दोन लहान मुलं आहेत. त्यापैकी दुसरा तर जस्ट ५ महिन्यांचा होता. त्यामुळे थोडी शंका वाटत होती.

दुसरी गोष्ट अशी की तेव्हा अजून माझं फीडींग चालू होतं. तर diet मुळे दूध कमी झालं तर अजून प्रॉब्लेम होईल असे वाटायचे. पण जशा जशा अजून testimonies वाचल्या तस तसं वाटायला लागलं की i should give it a try. मनाचा हिय्या केला आणि रेश्मा मॅडम ना contact केला.

Diet बद्दल असा एक गैरसमज असतो की diet म्हणजे उपासमार. पण मॅडमशी बोलल्यावर असं वाटलं की मी हे करू शकते. मी हे करायलाच हवं. तरी पण मनातून अजूनही शंका वाटत होती. नवऱ्याला ते page अणि testimonies दाखवल्या. त्याला विचारलं काय करू?? ट्राय करू का?? तो म्हणाला मला आवडेल तुला पाहिल्यासारखं दिसलेलं बघायला.

मग ठरवलं हे करायचंच. फायनल केलं अणि diet plan आला. पहिले १५ दिवस खूप कठीण गेले कारण pregnancy Ani post pregnancy बाळासाठी म्हणून ओव्हर eating ची सवय झालेली. त्यामुळे controlled eating करताना थोडा त्रास झाला. असं वाटायचं सोडून द्यावं सगळं. नको ते diet. पण तरी continue केलं. जेव्हा आईला सांगितलं तेव्हा ती ओरडली. म्हणाली काही होत नसतं असं diet वगैरे करून. त्रास होईल. तुला अणि बाळाला सुद्धा. पण म्हटलं मला ट्राय करू दे. त्रास झालाच तर बंद करू.

Office friends पण हसले की बाप रे तू इतके पैसे दिलेस. आम्हाला द्यायचे. आम्ही तुझं खाणं कंट्रोल केलं असतं. पैसे फुकट गेले तुझे. काही उपयोग नाही वगैरे वगैरे. मी डाएट साठी चार्ट प्रमाणे खायला भरपूर डब्बे घेऊन जायची. तर मला चिडवायचे इतका खाऊन कसलं डाएट करतेस. इतकं जास्त खाऊन डाएट आणि वेटलॉस कसा होणार?? पण मी फक्त फायनल रिझल्ट साठी continue केलं.

बरेच ups अणि downs आले. कधी कधी वाटलं सोडून द्यावं. पण रेश्मा मॅडमचं प्रोत्साहन आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे मला माझा फोकस ठेवता आला. कधी कधी फॉलो अपला वजन कमी व्हायचं नाही तेव्हा टेन्शन यायचं. तेव्हा रेश्मा मॅडम ने कधी समजाऊन कधी रागावून माझा फोकस हळू दिला नाही. अणि आज २२ आठवड्यानंतर माझं टार्गेट जे वजन २० kg कमी करायचं होतं ते पूर्ण झालेलं आहे.
हे फिलिंग माझ्यासाठी खूप खास आहे. जेव्हा मी पहिल्यांदा रेश्मा मॅडम ना कॉल केला तेव्हा मी म्हटलं होतं की मला माझा वॉर्डरोब change नाही करायचाय म्हणून मला वजन कमी करायचंय. तेव्हा मला रेश्मा मॅडम म्हणाल्या की तुम्हाला तुमचा वॉर्डरोब नाही change करावा लागणार. पण आज मला हे म्हणताना अजिबात दुःख होत नाहीये की मला माझा वॉर्डरोब change करावा लागणार आहे कारण माझे आधीचे सगळे कपडे मला आता ढगळ होत आहेत अणि ते खूप विचित्र दिसतंय. त्यामुळे वॉर्डरोब change is essential now.

ह्या वेटलॉस मुळे मला झालेला अजून एक फायदा म्हणजे माझा PCOD चा त्रास कमी झाला. आधी माझे periods २-२.५ महिन्याने येत होते. पण ते आता regular दर महिन्याला येत आहेत.

माझे ऑफिस मधले सहकारी जे मला आधी हसत होते माझी चेष्टा करत होते ते आता म्हणतात तुझे पैसे वसूल झाले. वेटलॉसचा इफेक्ट दिसतोय. बारीक दिसतेस.

सोसायटी मधल्या बऱ्याच मैत्रिणींनी complements दिल्या. ऐकून खूप बरं वाटलं आणि इतके दिवस जे शिवधनुष्य उचलून पेललं होतं त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आता अशी परिस्थिती आहे की दोन दिवस सलग जर excercise नाही केला तर मला बेचैन व्हायला होतं अणि असाच दिवस संपला तर चुकल्या चुकल्यासारखं होतं.

मधे जेव्हा अजून ५ kg कमी व्हायचे होते तेव्हा बाबा म्हणाले की बस आता अजून वजन कमी करू नकोस. अशीच चांगली वाटतेस. पण मी म्हटलं नाही अजून माझी शर्यत संपली नाही. आज जेव्हा फायनाली माझं टार्गेट acheive झालंय तेव्हा मला खूप समाधान मिळालं आहे.

माझ्या लग्नाला ह्याच महिन्यात १० वर्ष पूर्ण झाली आहेत अणि माझ्या लग्नात मी घातलेल्या माझ्या सोन्याच्या बांगड्या मला गेली ५ वर्ष होत नव्हत्या. त्या मोडून मला नवीन करायच्या होत्या. पण त्याचा खर्च मला जवळ जवळ १.२५ ते १.५० लाख पर्यंत जात होता. ह्या वेटलॉस मुळे मला माझ्या त्या सोन्याच्या बांगड्या व्यवस्थित होत आहेत. माझ्या बांगड्यांचा size जो २.४ वरून २.८ वर गेला होता तो आता पुन्हा २.४ वर आला आहे आहे आणि माझा बांगड्या मोडायचा सगळा खर्च वाचला आहे. मला वाटतं मला हा झालेला सगळ्यात मोठा फायदा आहे. 🤭🤭🤭

सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ह्या वेट लॉस नंतर अजिबात अशक्तपणा आला नाही की चरबी कमी झाल्यामुळे स्किन धिल्ली झाली नाही. त्यामुळे माझा ह्याबाबतीतला अनुभव सकारात्मक आहे. इतके दिवस रेश्मा मॅडम ने सपोर्ट दिलाच पण आताही ह्यानंतर जर काही गरज लागली तर त्यांनी सपोर्ट करायचं आश्वासन दिलं आहे. यापुढे कसा कंट्रोल ठेवायचा काय खायचं काय नाही खायचं जेणेकरून माझं वजन फार वाढणार नाही हे छान समजाऊन सांगितलं. Thank you Reshma Mam for your support and motivation



No comments:

Post a Comment