मला रेश्मा मॅम बद्दल माझी मैत्रीण जान्हवी हिने माहिती दिली. मुळात आधी मला डाएट जमेल की नाही हा खूप मोठा प्रश्न होता कारण मी खवय्ये आणि त्यात कॅटरिंग चा व्यवसाय आहे माझा. त्यामुळे खाणे, जेवण, वेगळे पदार्थ, तळण, गोड ह्या सगळ्याची माझा रोजचाच संबंध😂 जे डाएट च्या विरुद्ध आहे. आता डाएट करायचं तर मी आधी मनाशी ठरवलं...मुख्य म्हणजे मला या वर्षी माझ्या वयाची मी 40 वर्ष छान जगले आणि पुढे अजून छान जगण्यासाठी आपले वजन आटोक्यात असणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वतःचे स्वतः ला एक वाढदिवसाचे अमूल्य गिफ्ट म्हणून डायरेक्ट करायचे ठरवले.
जानवी कडून नंबर घेऊन रेश्मा मॅम ना संपर्क केला. त्यांनी त्यांचे फी आणि फीडबॅक पाठवले त्याला असे वाटले अरे बापरे खूप पैसे आहे आपण करू शकू की नाही नाहीतर थोडे दिवस फायदा होईल आणि म्हणून तर पुन्हा आहे तेच वजन... पण म्हणलं एकदा त्यांच्याशी बोलून बघू... म्हणून बोलल्या वर फार काही खर्च किंवा वेगळं काही बनवायचे नसून आपल्या रोजच्या आहारातून काही पदार्थ खायचे होते. ते ही त्यांनी एक चार्ट बनवला त्यामुळे सोप्पे झाले. त्यातही माझ्या काही तब्बेतीच्या तक्रारी मुळे मी काही पदार्थ खाऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी पर्याय सुचवले.
पण ह्यात मी एक सांगते.आपल्याला फक्त रेश्मा मॅम कडे पैसे भरायचे एवढाच खर्च नसतो बर का... आपल्याला बारीक झाल्यावर आधीचे सगळे कपडे alter करावे लागतात. नवीन कपडे आणावे लागतात. जणू 5 -10 वर्षांनी लहान झालो आहोत😄😄
पण एक आहे. आधी मला वाटत होतं हे डाएट केवढं सोप्प आहे. मी पण करू शकते. पण एक अनुभवातून सांगते. आपण जेव्हा एखाद्या कामासाठी पैसे देतो तेव्हाच ते serious घेतो. कारण आता पर्यंत मी खूप वेळा डायट करायचा प्रयत्न केला पण जाऊ दे आज इथे चाललोय खाऊन घेऊया आज खूप दिवसांनी बहीण भेटली खाऊया हॉटेलमध्ये जाऊया असंच होतं. पण जेव्हा आपण पैसे भरतो त्यावेळेला कुठलाही पदार्थ खाताना आपल्या डोक्यात पैसे भरले आहेत आणि आपलं वजन हे कमी झालं पाहिजे हे जास्त डोक्यात येत.
आधी केव्हाही मी मॅक्स किंवा झूडिओमध्ये जात होते तेव्हा सगळ्यात जास्त साईझचे कपडे पण मला होत नव्हते. मला नेहमी खूप वाईट वाटायचं पण आता मी Max मधले XXL कपडे सुद्धा घेऊ शकते आहे. याचा मला खूप आनंद होतो. कारण तिला कित्येक वर्षात मी मला आवडतील असे कपडे कधीच घेतले नाही; मला ज्या साईज मध्ये होतील ते कपडे मला आवडायला लागायचे. त्यामुळे तर खूप जास्त आनंद होतो.
सुरवातीला एक आठवडा अस वाटत होतं की काही खाल्लच नाही. खूप विकनेस आल्यासारखं वाटत होतं पण हे सगळं मानसिक असतं हे दुसऱ्या आठवड्यापासून कळलं😄😄😂 कारण मी आधी जेवढं काम करते त्याच्यापेक्षा जास्त काम करायला लागले ते पण कमी खाऊन म्हणजे योग्य ते खाऊन खरं सांगायचं तर डायट म्हटल्यावर आपण कमी खाणं हेच डोक्यात येत. पण ते एवढं असतं की आपल्या रोजच्या डायट पेक्षाही जास्त असत. योग्य त्या प्रमाणात योग्य ते पदार्थ खाल्ले तर वजन नक्कीच आटोक्यात राहतो किंवा वाढत नाही हे कळलं .
अक्षरशः नवरात्रीमध्ये दोन ब्लाउज अल्टर करून आणले आणि त्या दोन ब्लाउज वरच सूट होतील अशा साड्या नेसल्या कारण माझे आधीचे ब्लाऊज मला होतच नव्हते.
शिवाय आता दिवाळीचा एक नवीन काम मागे आले. ते म्हणजे दिवाळीसाठी आधीचे जे चांगले कपडे आहेत ते चांगल्या साडीवरचे ब्लाउज आहेत ते अल्टरेशन करणे म्हणजे मला काही वेळेला वाटतं आपण फक्त रेश्मा मॅमना पैसे न देता आपल्याला यावर पण खूप पैसा खर्च करावा लागतो पण हा खूप सुखद अनुभव आहे हा प्रत्येकाने घ्यावा. मी 5XL वरून XXL वर आले आहे. मी या सहा महिन्यात 20 किलो वजन कमी केले खरंतर पाच महिन्यातच पण एक- दीड महिना मी बाहेरगावी होते.
खूप खूप धन्यवाद रेश्मा मॅडम आणि त्यांच्या पूर्ण टीमला🙏🏻
सौ प्राजक्ता आदित्य दिवेकर, खारघर





































.jpeg)

