Sunday, December 3, 2023

Madhuri Jadhav



#PULAFridayReview

#positivereview

#weightlossreview

#transformation

आजचा review खास Reshma Dorke Jadhav मॅडम यांच्यासाठी आहे. Group वर माझी ही पहिलीच पोस्ट आहे, पण ती मला अगदी मनापासून लिहावीशी वाटली.

मी इंजिनिअर कॉलेज मध्ये प्रोफेसर आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये माझ्या मावस भावाचं लग्न झालं, नेहमीसारखेच नटून-थटून छान छान फोटो स्टेटसला ठेवले होते. खूप छान छान कमेंट्स आल्या पण त्यातल्या तीन ते चार जणांच्या कमेंट्स खरंच मला विचार करायला लावणारे होत्या, त्यांनी विचारलं होतं की तू प्रेग्नेंट आहेस का?🙈🤦‍♀️ म्हणजे माझ्या पोटाचा घेरा इतका झाला होता की लोकांना मी प्रेग्नेंट असल्यासारखे वाटत होते, तेव्हा थोडं मी इग्नोर केलं पण नंतर मात्र मला त्यावरती थोडा विचार करावासा वाटला.



मग मी जिम जॉईन केलं पण काही फरक पडला नाही कारण की तोंडावरती अजिबात ताबा नव्हता उलट अडीच किलो न वजन वाढलं माझं आणि मग मी परत जिम बंद केली. असंच एक दिवस ग्रुप वरती रेश्मा मॅडमचे रिव्ह्यू आणि फीडबॅक बघितले आणि विचार केला की करायला काय हरकत आहे. आणि मी केलं, आणि अक्षरशः 3 महिन्यांमध्ये माझं 12 kg वजन कमी झालं. पण हे टार्गेट माझ्यासाठी इतकं सोप्पं नव्हतं कारण की मॅडमनी दिलेला डायट रोजच्या घरच्या जेवणातील चपाती, भाकरी, भात, भाजी असा असला तरी मला अतिशय कठीण वाटत होता, कारण मी खूप जास्त फुडी व्यक्ती आहे, एक्सरसाइज सोपे वाटले पण डायट फॉलो करन सुरुवातीला खूप कठीण वाटत होत. पण माझ्यासारख foody माणूस हे करू शकत असेल तर हे कुणीही करू शकतो.

मॅडमचा दर आठवड्यामध्ये फॉलोअप असतो आणि त्या अतिशय छान आणि सोप्या भाषेमध्ये सगळं समजावून सांगतात, वजन कमी झाल्यावर खरंच खूप हलकं वाटतं आणि त्या डायट मुळे माझ्या चेहऱ्यावरती एक वेगळाच glow आलाय हे माझं मला जाणवत, So a big thanks and gratitude towards Reshma Mam.


College मध्ये lunch time मध्ये जेवताना सगळे colleague चेष्टा करायचे, काय मॅडम grams मध्ये खाता म्हणून चिडवायचे, पण या तीन महिन्यांमध्ये माझे मिस्टर आणि माझ्या आईने खूप support केलं आणि फायनली मला रिझल्ट मिळाला. आणि तेव्हा चिडवणारे सगळेच आता फार कौतुक करतात. आणि मुळात हा weight loss कोणतेही आयुर्वेदिक, प्रोटीन, हर्बल पावडर कोणतेही शेक, टॅबलेट न वापरता फक्त घरच्या जेवनातून झाला आहे याचा मला खूप आनंद आहे.😊

मी आयुष्यात कधी एक्सरसाइज केला नव्हता पण आता त्याची इतकी सवय झालेली आहे एक दिवस नाही झाला तरी मला करमत नाही आणि याचा फायदा मला माझा पुढच्या आयुष्यात सुद्धा नक्की होईल.

Thank You Reshma Mam And Fitness Naturo's Team

No comments:

Post a Comment