Thursday, July 30, 2026

हर्षल हिरामण ढांडे


मी हर्षल हिरामण ढांडे.

मी व्यवसायाने IT Engineer आहे.


Facebook वर पूर्वा ने मला दाखवलेल्या Fitness Naturo by Reshma यांची पोस्ट आणि इतरांचे reviews पाहिल्यानंतर मला वाटलं, "जर इतर लोक त्यांचं वजन कमी करून आनंदी आयुष्य जगू शकतात, तर मीही नक्की करू शकतो." हाच विश्वास घेऊन मी Reshma Ma'am यांचा Weight Loss Program जॉईन केला.


त्या वेळी माझे वजन वाढले होते आणि सततच्या पाठदुखी (Back Pain) मुळे दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत होता. त्यामुळे वजन कमी करण्यासोबतच निरोगी जीवन जगण्याचा निर्धार केला.


पहिल्याच Follow-up मध्ये माझे सुमारे 1.5 किलो वजन कमी झाले. त्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आणि माझे Target Weight मी नक्की गाठू शकतो याची खात्री वाटू लागली.


Reshma Ma'am यांचे मार्गदर्शन आणि प्रत्येक आठवड्याचे Follow-up खूप प्रेरणादायी होते. त्यामुळे संपूर्ण प्रवासात Motivation टिकून राहिले आणि योग्य दिशेने सातत्याने प्रगती करता आली.


आज 14 आठवड्यांत तब्बल 13 किलो वजन कमी झाले आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझी Back Pain पूर्णपणे बंद झाली आहे. आता मी पुन्हा Badminton खेळू शकतो, सहज 5 किमी चालू शकतो आणि माझ्या मुलासोबत मनसोक्त खेळू शकतो. पूर्वी लठ्ठपणामुळे ज्या अनेक गोष्टी करता येत नव्हत्या, त्या आता सहज करू शकतो.


जुने T-Shirts पुन्हा फिट होऊ लागले, शरीरात हलकेपणा जाणवू लागला, ऊर्जा वाढली आणि आत्मविश्वासही अनेक पटींनी वाढला. माझ्या शरीरातील हा सकारात्मक बदल पाहून कुटुंबीय आणि मित्रांनीही भरभरून कौतुक केले.


Reshma Ma'am यांनी मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली—योग्य Diet आणि नियमित Exercise यांचा समतोलच यशस्वी Weight Loss ची खरी गुरुकिल्ली आहे.


धन्यवाद Reshma Ma'am!

तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळे माझे फक्त वजनच कमी झाले नाही, तर माझे आरोग्य, आत्मविश्वास आणि जीवनशैलीही पूर्णपणे बदलली.


(आमच्या शेजारच्या काकांचा Fitness Naturo by Reshma यांच्यासाठी रिव्ह्यू)

Tuesday, July 14, 2026

निर्गुणा कदम

मी निर्गुणा कदम.

मी एक नर्स आहे.


 डिलिव्हरीनंतर माझे वजन 59 किलो झाले होते. त्याचबरोबर मला Arthritis असल्यामुळे सांधेदुखी (Joint Pain) चा खूप त्रास होत होता. वजन कमी करण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले, पण काहीच फरक पडत नव्हता.


तेव्हा आमच्या सोसायटीतील सरिता कोंडे यांच्याकडून मला रेश्मा मॅडम यांचा संपर्क क्रमांक मिळाला



मी त्यांचा Diet Plan सुरू केला आणि पहिल्याच आठवड्यात माझे 2 किलो वजन कमी झाले. फक्त 10 आठवड्यात माझे एकूण 10 किलो वजन कमी झाले. आज सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझा Joint Pain पूर्णपणे कमी झाला आहे आणि मी पूर्वीपेक्षा अधिक हलके, उत्साही आणि निरोगी आयुष्य जगत आहे.


या Diet Plan मध्ये कोणत्याही प्रकारचे Powder, Tablet, Shakes किंवा कोणतेही Fancy Food Items नाहीत. रेश्मा मॅडम यांच्या फी व्यतिरिक्त Diet साठी एकही रुपया अतिरिक्त खर्च करावा लागत नाही, कारण Diet मधील सर्व पदार्थ आपल्या रोजच्या घरातील स्वयंपाकातीलच असतात.


रेश्मा मॅडम, मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद! 🙏❤️

 

Saturday, July 4, 2026

निधी घोलेकर

माझं नाव निधी घोलेकर.


माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीनंतर माझं वजन खूप वाढलं. प्रेग्नन्सीपूर्वी माझं वजन 61 किलो होतं, पण नंतर ते 71 किलो कधी झालं हेच मला समजलं नाही. वाढलेल्या वजनामुळे सतत काही ना काही शारीरिक त्रास जाणवत होता.


मी Instagram वर रेश्मा मॅम यांचे रिव्ह्यू पाहिले होते. त्यांचा नंबरही सेव्ह करून ठेवला होता आणि रोज त्यांच्या स्टेटसवरील रिव्ह्यू पाहायचे. शेवटी एक दिवस रेश्मा मॅमशी फोनवर बोलले आणि डायट प्लॅन सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मनात खूप शंका होत्या, पण मॅम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने प्रत्येक गोष्ट अगदी शांतपणे समजावून सांगितली, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.


मी 15 किलो वजन कमी करण्याचा प्लॅन सुरू केला. हा डायट प्लॅन फॉलो करणे खूप सोपं होतं. डायट करताना ना कंटाळा आला, ना अशक्तपणा जाणवला. मध्ये काही कौटुंबिक कार्यक्रमांमुळे काही वेळा डायट 100% फॉलो करता आलं नाही, तरीही अपेक्षित प्रमाणात वजन कमी होत गेलं.


सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना कोणती पावडर, ना शेक, ना कोणत्याही गोळ्या—फक्त योग्य आणि संतुलित आहारामुळे मला हा परिणाम मिळाला.


आता सगळेजण मला विचारतात, "एवढी बारीक कशी झालीस?" तेव्हा मी आवर्जून रेश्मा मॅमचं नाव सुचवते. आता मी माझे जुने कपडेही पुन्हा घालू शकते, याचा खूप आनंद होतो.


याआधी मी योगा क्लासही सुरू केला होता, पण त्याचा विशेष काही फायदा झाला नव्हता. मात्र, या डायट प्लॅनमुळे माझे Periods देखील नियमित यायला लागले.


प्रत्येक फॉलो-अपमध्ये रेश्मा मॅम खूप छान मार्गदर्शन करतात, प्रत्येक गोष्ट समजून सांगतात आणि त्यामुळे स्वतःवरचा विश्वास आणखी वाढतो.


रेश्मा मॅम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार! तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झाला.