Sunday, December 3, 2023

Dr Savita Patil

नमस्कार मी डॉ सविता पाटील..🙏 राहणार औरंगाबाद..
माझं वजन माझ्या उंचीच्या प्रमाणापेक्षा 5-6 किलो म्हणजे खूप काही जास्त नव्हतं असं मला वाटायचं😜 मात्र कोविड नंतर माझं वजन दोन-तीन वर्षांमध्ये पाच-सहा किलो वाढलं.अगोदर वर्षाला सरासरी एक किलो हिशोबाने वाढत होते ते दोन वर्षांमध्ये पाच ते सहा किलो ने वाढले आणि मग मला मात्र टेन्शन येऊ लागला, आता आपण हे वजन कंट्रोल करायला हव.
तशी यापूर्वी मी झुंबा आणि काही एक्सरसाइज करायचे पण कुठलेही डायट मी कधी केले नव्हते कारण माझं तसं बाहेरचं खूप खाणं , जंक फूड ,बेकरी items अशातलाही प्रकार नव्हता , पंधरा दिवसातून कधीतरी बाहेरचं खाणं व्हायचं. त्यामुळे डायटिंग मी कधी केलीच नव्हती. पण जेव्हा 66 किलो पर्यंत माझं वजन झालं तेव्हा वाटू लागलं आता काहीतरी करण्याची गरज आहे फक्त एक्ससाइज करून फायदा होत नाही हे अगोदर पासूनच माहिती होतं मग आता diet वर focus करणं गरचेच होतं पण diet करायचा तर कसा करावा प्रश्न मनात होता.
कुठल्याही प्रकारचे सप्लीमेंट घेऊन वजन कमी करायचं नव्हतं.मग माझा शोध सुरू झाला. MLA grp. वर रेश्मा मॅम बद्दलचे काही review वाचण्यात आले ,होम diet म्हणुन त्यांना contact केला त्यांनी माझ्या शंकांचे छान निरसन केले आणि मग माझी weight loss journey सुरू झाली..

 


सुरुवातीला थोड जड गेले पण हळू हळू सवय झाली .पहिल्या आठवड्यात माझे 1किलो वजन कमी झाले.त्यामुळे आत्मविश्वास वाढला पण माझा रिझल्ट इतरांच्या तुलनेत खूप slow होता त्यामुळे असा का होतं याच टेन्शन यायचं पण mam प्रत्येक वेळी छान support करायच्या आणि guide करायच्या मध्ये मध्ये घरगुती कार्यक्रमांमुळे ,प्रवासामुळे diet break होण्यासारखे प्रसंग आले पण मॅडम ने त्यावेळी देखील काय खायचे आणि काय टाळायचे याबद्दल छान मागदर्शन केले. आणि मोजकेच diet आणि workout यामुळे माझं 2.5 month मध्ये 10kg वजन कमी झालं. All Credit Goes To Reshma mam..😊Thanks You Reshma mam🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment