Sunday, December 3, 2023

Yogita Mitkari Bukke



#PULAFridayReview

#superpositivereview

#positiveReview

#healthylifestyle

#weightlossreview


मी प्रोफेशनली IT Engineer आहे. दुसऱ्या delivery नंतर माझी तब्बेत भरपूर सुधारली होती. मुळात body type च असा आहे की आराम म्हणा किंवा चांगल जेवण म्हणा मला लगेच मानवतं (म्हणजे तब्बेत लगेचच सुधारते). तर मग झालं अस, दुसऱ्या डिलिव्हरी नंतर तब्बल 10kg वजन वाढलं. पोटाचा घेरा असा की जणू 5-6 महिन्यांची प्रेग्नंट दिसत होते. बाळाला feeding चालू आहे या विचारानेच जास्त खाल्ल जात होत, गरजेपेक्षाही जास्त.. मग बाळ 11 month च झालं, मग ठरवल की बस आता काहीतरी केलं पाहिजे, खूप कमी नाही पण आधी इतकं तरी झालं पाहिजे.

त्याच दरम्यान रेश्मा मॅम च्या पोस्ट वाचत होते, बऱ्याच ठिकाणी त्या कुठलही प्रोटीन, हर्बल, आयुर्वेदिक पावडर, शेक, स्मूदी, टॅबलेट तसच कोणताही Hardcore Diet देत नाहीत अस कळलं. म्हणून मग ठरवल आणि त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि आमचा प्रवास सुरु झाला. मॅम ने सांगितलेलं सर्व नीट फॉलो करत गेले आणि 2 महिन्यातच टार्गेट गाठल. 10kg वजन कमी केलं आणि पोट आणि कमरेचा घेरा जवळपास 4 - 5 इंच ने कमी झाला.. 40 वरून 36.. माझ वजन पहिल्या प्रेग्नन्सीच्या आधी जेवढं होत तेवढं झालं आहे. जे कपडे मी 3.5 वर्षापासून ठेवून दिले होते, वाढलेल्या वजनामुळे ते होत नव्हते, आता ते सगळे परत होत आहेत. आणि तो आनंद गगनात मावेनासा आहे. खूप जण भेटले की विचारतात .. "काय ग कशी झाली एवढी कमी..?" त्यामागचं कारण म्हणजे रेश्मा मॅम च continues motivation. अर्थात् माझंही क्रेडिट आहेच की मी ही काटेकोरपणे डाएट फॉलो केलं, 45 मिन चां रोज व्यायाम केला. पण बऱ्याचदा आपण डगमगतो मग मॅम सतत motivate करतात. THANKS A LOT RESHMA MAM.. हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं.


आता मला एवढं भारी फील होत आहे.. Like "पंछी बनू उडती फिरू मस्त गगन मे, आज मैं आझाद हु दुनिया के चमन मे"

आधी lower back pain चा जास्त त्रास होता तो 90% कमी झाला आहे. PCOD पण बऱ्यापैकी क्लिअर झाला आहे. Periouds regular झालेत, आता मी कोणतेही कपडे घालू शकते याचा मला खूप आनंद आहे. शिवाय एक Healthy Lifestyle मॅम ने जगायला शिकवली जी मला खूप उपयोगी ठरेल. आणि या सगळ्या प्रोसेस मध्ये बाळाच्या फीडींग वर काहीही परिणाम नाही झाला जो की माझा मेन उद्देश होता. "Thanks A Ton Reshma Mam & Team

No comments:

Post a Comment