Wednesday, May 3, 2023

Deepika Badgujar



हॅलो ऑल ऑफ यु..

मी दीपिका बाडगुजर. हा माझा अगदी पहिला वहिला #review आहे.. आणि हा #SuperPositiveReview आहे माझ्यात amazing बदल घडवणाऱ्या माझ्या #Nutritionst + #FitnessConsultan + #FitnessCoach Reshma Jadhav यांच्यासाठी. कारण आज जी माझी पूर्वीची personality मला परत मिळाली आहे, ती फक्त आणि फक्त Reshma Jadhav यांच्यामुळे शक्य झालं आहे. माझ्या लग्नानंतर 4 वर्षांनी मला मुलगी झाली, आणि pregnancy मध्ये वजन वाढलं, डिलीव्हरी नंतर ते अजूनच वाढतच गेल. आणि ते कंट्रोल करण मला खुपच अशक्य होत गेलं.. मला खुपजण बोलत होते खुपच जाड झाली तू तेव्हा मला खरंतर राग यायचा त्यांचा, पण मी त्यांना ignore करू शकत नव्हते, कारण माझं मलाच स्वतःला जाणवत होतं की मी खरंच जाड झाली आहे.. मला माझे कॉलेजमधले लग्नापूर्वीचे दिवस खूप प्रकर्षाने आठवत होते, त्यावेळी मी कशी स्लिम ट्रिम होते, आणि आता ही माझ्या शरीराची काय अवस्था झालीय असा विचार करून करून मी खूप डिप्रेस झाले होते. माझे जुने कुर्ते, टी शर्ट जे आता मला फिट होत नव्हते, ते पाहून तर मी अजूनच दुःखी झाले. कारण माझं वय फक्त 27 वर्ष होत आणि वजन 72 किलो झालं होतं. पण मग एक दिवशी ठरवलं की रडत बसून काही उपयोग नाही. वजन कमी करण्यासाठी निदान प्रयत्न तरी केला पाहिजे, जेणेकरून पूर्वीइतकी नाही झाले तरी थोडीतरी मी बारीक होईन. या आशेवर मी Social Media वर search करायला सुरुवात केली. तिथे मला Reshma मॅम बद्दल ची माहिती सापडली, मग मी त्यांचे past result search करायला सुरुवात केली, त्यांच्या clients चे results खुपच amazing होते. ते पाहून मला थोडी आशा वाटली, म्हणून मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला, आणि त्यांच्याशी बोलून मला खरंच खूप छान वाटलं. मेन म्हणजे त्या कोणतेही हर्बल, प्रोटीन, आयुर्वेदिक पावडर देत नाहीत आणि फक्त घरात बनवले जाणाऱ्या पदार्थ मधेच डाएट बसवून देत होत्या, आणि काही exercise सांगत होत्या.. हे पाहून मला आणखीनच आशा वाटली.. कारण जनरली आपण जेव्हा डाएट सुरू करतो तर त्यात सर्व ब्रोकोली, आणि काय काय इतर असे पदार्थ असतात जे भारतात बनत नाहीत, आणि बाजारात पण सहजपणे उपलब्ध होत नाहीत, मिळाले तरी खूप महाग असतात.. आधीच आपण जिम, डाएट प्लॅन वर एवढे खर्च करतो, त्यापेक्षा या भाज्यांचा डबल खर्च असतो, त्यातही प्रोटीन पावडर वगेरे सुचवले तर त्या एका डबा चा खर्च जवळपास 5-6 हजार असतो..
पण मी खूप नशीबवान होते की मला असले कुठलेही खर्च करावे लागले नाहीत.. कारण Reshma मॅम च्या डाएट प्लॅन मध्ये असले पदार्थ☝🏻आणि पावडर्स पण नाहीत.. फक्त घरात बनणारे पदार्थ आणी घरात करू शकू असे काही सोपे व्ययामप्रकार.. त्यामुळे मला जर कोणत्या गोष्टीचा खर्च झाला तर तो फक्त त्यांच्या डाएट प्लॅन चा, जो की one time होता.. आणि खूपच nominal charges होते.. जे की मला स्वतःला खूपच परवडणारे वाटले, आणि या सर्व घरगुती गोष्टींवरच अगदी natural पद्धतीने result पण इतक्या लवकर आला.. जो की मला वाटत होतं माझ्या #VegDiet मध्ये शक्य होईल की नाही. त्यांनी माझं टार्गेट पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी मार्गदर्शन, प्रत्येक Week ला follow up.. हे सर्व चालू ठेवलं. त्यामुळे 23 March 2021 ला सुरू केलेला प्लॅन 4 july 2021 ला माझं टार्गेट पूर्ण झालं, आणि माझं वजन 72kg वरून 57kg वर आलं. टोटल 15किलो कमी झालं आणि आता ते 55 kg वर maintain आहे. 




खरंतर माझं हे वजन कमी व्हायला 8Weeks लागले होते, ज्याची weekly नोंद मी स्वतः माझ्या body measurement chart वर करून ठेवली आहे.. पण मधल्या काळातील काही सण, घरचे कार्यक्रम, वाढदिवस, बाहेर फिरायला गेलेल्या सुट्ट्या, अस सर्व पकडून त्याला 3 महिने लागले.. पण यासर्वतही रेश्मा मॅम ने वेळोवेळी आठवण करून माझं ब्रेक झालेलं डाएट मला पुन्हा सुरू करायला लावलं, आणि माझं टार्गेट पूर्ण होईपर्यंत माझा पिच्छा सोडला नाही. त्यानंतर त्यांनी काही ठराविक tips वापरून weight कसं manitain ठेवायच हेही सांगितलं. आज माझं टार्गेट पूर्ण होऊन जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आलंय , आणि आता मी डाएट सुद्धा करत नाही.. पण त्यांच्या tips मुळे अजूनही माझं वजन mainitain आहे. आणि हो माझे पूर्वीचे टी शर्ट, कुर्तीज पण मला आता अगदी परफेक्ट फिटिंग मध्ये बसत आहेत.



याचे सर्व श्रेय मी Reshma Jadhav तुम्हालाच देईन. खरंच Thank u very much. मला हे करणं खूप impossible होत जे जे तुम्ही घडवून आणलं. मला या फिटनेस मध्ये आणण्यासाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार..😊🙏

दीपिका बाडगुजर

1 comment:

  1. Thank you for sharing this blog. I would like to share about fitnesscareguide.com, your ultimate online destination for valuable knowledge, experiences, and insights covering all aspects of fitness and wellness.

    ReplyDelete