Thursday, May 4, 2023

Sonal Gambare


नमस्कार मैत्रिणींनो ..🙏

मी सोनल गांबरे. मूळची पुण्यातली आणि लग्न होऊन गेली 10 वर्ष मुंबईत राहत आहे. आज मी इथे येऊन आवर्जून लिहिण्याच कारण म्हणजे मला माझा अनुभव तुम्हा सर्वासोबत share करण्याची इच्छा आहे. आणि याला कोणताही review म्हणून वाचू नका, माझा अनुभव आणि #ReshmaJadhav मॅम सोबत माझा अजूनही चालू असलेला प्रवास आणि त्यांच्याप्रति माझी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हे लिहत आहे.. माझ्या लग्नाच्या वेळी माझं वजन 55 किलो होत. त्यानंतर पहिल्याच pregnancy मध्ये ते खूप वाढलं, आणि त्यातल्या त्यात pregnancy मध्ये पोट नॉर्मल इतर प्रेग्नन्ट ladies पेक्षा खुपच जास्त होत, मला वाटलं होत ही Temperory Phase आहे, डिलीव्हरी झाल्यावर येईल पुन्हा नॉर्मलला, पण डिलीव्हरी झाल्यानंतर सुद्धा ते पोट अर्धा इंच पण कमी झालं नाही. डॉ ही म्हणाले की जस इतरांच डिलीव्हरी झाल्यावर पोट बऱयापैकी रेगुलर येत तसा तुमच्याबाबतीत दिसत नाही, त्यामुळे ते आता सहज कमी होणार नाही, त्यासाठी प्रयत्न करूनच professionals ची मदत घेऊन तुम्हला ते कमी कराव लागेल. त्यावेळी माझं बाळ छोटं होत, पण पोटामुळे मला त्याला उचलून घेता येत नव्हतं, दूध पाजायला त्रास होत होता, मी बसले तर मला उठवत नव्हतं, वाकून करायची कामं डिलीव्हरी झाली तरी जमत नव्हत्या, आणि बाळ छोट असल्याने मी डाएट पण करू शकत नव्हते, त्यामुळे त्याच पोटाने मी पुढची 5-6 वर्ष काढली . कोणत्याही समारंभात गेले तर सर्वाना वाटायचं मी पुन्हा एकदा गरोदर आहे, आणि पहिल्याच डिलीव्हरीच पोट अजून कमी नाही झालं तर लोक आश्चर्य व्यक्त करत होते. आणि नंतर नंतर नावं ठेवायला लागले, शेजारच्या काही बायका समोर दिसली, चार लोकांत पण सरळ सरळ सतत बोलायच्या, काय ते पोट, गरोदर असल्यासारखं वाटतय, कमी करा ते या सर्व सततच्या टोमण्यांना मी वैतागले होते, depression मध्ये गेले होते, मलाही वाटत होतं की कदाचित आता माझं पोट पुन्हा पाहिल्यासारखं कधीच होणार नाही, वेगवेगळे dietitian +fitness consultant पाहिले पण फरक काही पडला नव्हता.या मध्ये मी एकदा oriflame चे #Weight #Loss Product घेतले होते पण त्यानें वजनात अजिबात फरक पडला नाही त्यामुळे मी अजून निराश झाली होते. त्यातच एकदा #ReshmaJadhav मॅम चा कॉन्टॅक्ट नंबर fb वरून मिळाला, त्याना फॉलो करू लागले, त्यांचे result खरोखरच खूप छान होते, पण तरीही मला माझं वजन अस कमी होईल हा विश्वास नव्हता. आणि मुळात मला त्यांच्यावर पण विश्वास नव्हता, कारण कोणतेही #Protein, #Herbal, #Ayurvedic Powders न वापरता फक्त #Exercise + #NaturalSourceOfDietPlan ने असे result दिसतील, आंतही एवढ्या कमी वेळात अस खरोखरच वाटलं नव्हतं. म्हणून मी जवळपास 7-8 महिने फक्त त्यांची चौकशीच करत होते, इतकी चौकशी केली की शेवटी मी ज्यांना result आला त्यांचे नंबर द्या म्हणाले, त्या इतर clients नि स्वतःच्या हातानी त्यांच्यासाठी #review लिहिले होते, तरी मी ही मागणी केली.. पण आता माझ्या लक्षात येतय की ही मागणी किती चुकीची होती, कारण clients च्या Privacy Policy नुसार त्यांचे नंबर share करता येत नाहीत, हे मला आता लक्षात आलं आहे, जेव्हा मला result आला आणि आता माझा नंबर इतर लोक त्याना मागत आहेत, आणि जर मॅम ने तो दिला तर मला माझी इतर कामं सोडून मला त्यांच्याशीच बोलत बसावं लागेल, आणि हे प्रॅक्टिकली शक्य नाही, हे मला आता स्वतः अनुभव घेऊन कळून चुकलं आहे, म्हणून याचाही उल्लेख मी आवर्जून या अनुभवात करत आहे.

तर finally मी त्यांचा प्लॅन घेतला, आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणे Diet + Exercise सुरू केले, तरीही मला संशय होता की माझ्या केसमध्ये याचा कितपत फरक पडणार आहे. पण तरीही मी मनापासून आणि त्यांनी सांगितलं तस Strictly Diet +Exercise सुरू केलं.. आणि पहिल्याच आठवड्यात माझं वजन 3 किलो ने कमी झालं 😮, माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, मी पुन्हा पुन्हा वजन करून पहात होते, पण तरीही ते 3kg loss असच दाखवत होते, अवघ्या 8 दिवसात वजनात एवढा फरक पडला म्हणून मला जरा आशा वाटली आणि मी खुप खुश झाले , आणि अजून जोमाने Diet + Exercise सुरू केलं. प्रत्येक 8-8 दिवसानी न चुकता मॅम माझा फॉलो अप घेत होत्या, आणि बघता बघता #3 महिन्यात माझं वजन जवळपास #15किलो ने कमी झालं. आणि पोटाचा घेर अर्ध्यापेक्षाही कमी झाला. एवढं वजन कमी झाल्यावर आता सगळीकडे कौतुक सुरू झालं, ज्या बायका आतापर्यंत टोमणे देत होत्या त्या आता म्हणू लागल्या बास आता अजून किती बारीक होणार?😅.. सगळीकडे होत असलेल कौतुक पाहून मी सुखावून गेले, आणि मॅम ला न सांगताच मी #Diet and #Exercise ब्रेक केलं. पण तरीही त्या प्रत्येक 8 दिवसाला मला फॉलो अप साठी कॉन्टॅक्ट करतच राहिल्या, कारण माझं टार्गेट अजूनही पूर्ण झालं नव्हतं. पण लोकांच्या बोलण्यात मी पुन्हा एकदा आले आणि सर्व सोडून बसले, शेवटी मॅम ने वाट पाहून पाहून एकदाच मला फोन केला आणि जरा सुनावलं, कारण माझं पोट पूर्णपणे फ्लॅट झालं नव्हतं, आणि ते कमी करण कसं गरजेचं आहे हे समजावून दिलं, आणि त्यासाठी पुन्हा motivation ही दिलं, त्यांच्या या फोन मुळे मला माझी चूक कळली आणि पुन्हा #motivation ही मिळालं, आणि आता पुन्हा एकदा मी diet+exercise सूरु केलं.


Note: या ब्रेकमधल्या एक महिन्यात माझं वजन फक्त अर्धा किलो ने वाढलं, आणि दुर्लक्ष झाल तर अजून वाढू शकेल अस मॅम ने मला सांगितलं.

अशा प्रकारे माझं वजन #11Weeks मध्ये #19किलो ने कमी झालं. पूर्वी ते #85kg होत आणि आता ते #66kg आहे. पण माझ्या मधल्या सुट्ट्या आणि ब्रेक मध्ये या प्रोसेस ला टोटल 4महिने गेले. आज माझा पोटाचा घेर #38in वरून #30in वर आला आहे, आणि कमरेचा घेर #48in वरून #39in वर आलेला आहे. म्हणजे जवळपास 9in ते 10in चा फरक झाला आहे, पण यावर रेश्मा मॅम अजूनही समाधानी नाहीत, त्याना माझं लग्नच्या वेळी जे 55 किलो वजन होत तिथपर्यंत मला आणायच आहे. पण तरीही मी हा अनुभव मांडला , आणि टार्गेट पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा तुम्हा सर्वना इंफॉर्म करेन. 😊🙏





No comments:

Post a Comment