Wednesday, May 3, 2023

Anita Shelake



 
आज माझं आवर्जून इथे येऊन लिहिण्याच कारण म्हणजे Reshma Jadhav मॅम..

हा माझ्याकडून #SuperPositiveReview फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच आहे.

मी एक साधारण मध्यमवर्गीय गृहिणी आहे. माझं नाव सौ.अनिता राम शेळके. तर रेश्मा मॅमशी माझी ओळख झाली ती म्हणजे 2 ते अडीच वर्षांपूर्वी.. साधारणपणे इतर सर्व स्त्रियांना जे डिलीव्हरी नंतरचे प्रॉब्लेम येतात तेच मलाही येत होते. दोन मुलांचा जन्म, त्यांच्यापाठी आणि नवऱ्यापाठी धावपळ करता करता माझं स्वतःकडे प्रचंड दुर्लक्ष झाल होत. आणि त्यामुळेच वजन खूपच वाढलं होत. लग्नापूर्वी माझं वजन फक्त 45kg होत, आणि आता ते 65kg पर्यंत गेलं होतं, म्हणजे जवळपास 20kg ने वाढलं होत. वजन कमी करण्याची खूप इच्छा होती, त्यासाठी मी योगाचा कोर्से पण केला होता, तसेच रोज सकाळी गार्डनमध्ये चालायला पण जात होते, पण यासर्व प्रयत्नात माझे वजन 2-3 किलो च्या पुढे कमी होऊ शकले नाही.. त्यावेळी मग जिम चा विचार मनात यायला लागला.. आणि जिम शोधायला पण सुरवात केली, पण आमच्या एरिया मध्ये जिम खूपच कॉस्टली होत्या, जवळपास 20 ते 25 हजारपर्यंत मेम्बरशीप होती. आणि हे सर्व माझ्या बजेटच्या बाहेर होत. काहींनी मला हर्बल, आयुर्वेदीक पावडर पण सुचवल्या, पण ते सर्व मला करायचं नव्हतं, मला नैसर्गिकरित्या weight loss करायचा होता.. ना की unhealthy पद्धतीने कोणताही शॉर्टकट मारून .. अशावेळीच सकाळी जेव्हा गार्डन मध्ये walk ला जायचे तेव्हा माझी नजर एका व्यक्तीवर गेली. एक अशी व्यक्ती जी न चुकता रोज पहाटे 5 ला तिथे येऊन स्वतःच्या धुंदीतच Exercise करत असायची. तीच कोनाकडेच लक्ष नसायच, ती फक्त स्वतः मध्येच exercise करण्यात रमलेली असायची.. जिथे आम्ही इतर ladies walking च्या नावावर गप्पा मारत असायचो, तिथे ती मुलगी ??.. हो मुलगीच .. म्हणजे मला तरी ती प्रथमदर्शनी 20-22 वर्षाची कॉलेज गोइंग तरुणीच वाटत होती.. तिची एकंदरीतच फिगर आणि ज्या सहजरित्या परफेक्ट फॉर्म्स मध्ये ती exercise करत होती ते पाहून मला ती मुलगीच वाटली, आणि अस वाटत होतं की ती कुणीतरी professional आहे.. तिच्या देहबोलीतुनच ते लक्षात येत होतं. म्हणून एक दिवशी तिच्याशी बोलायच ठरवलं. आणि तिच्याशी बोलल्यानंतर मी एवढी आश्चर्यचकित झाले😮.. 

म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे ती खरोखरच #Professional and #Certified #Fitness Coach + #Fitness Consultant + #Nutritionist होतीच.. पण सर्वात मोठं आश्चर्य या गोष्टीच होत की ती माझ्य एव्हढीच वयाने होती, म्हणजे 34 वर्षाची, 15 वर्षांपासून married आणि तिला 12 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे, जो की आता 14 वर्षाचा आहे, आणि तिच्या लग्नाला आता यशस्व रित्या 17 वर्ष पूर्ण झालीत.. तर हे ऐकून मी खुपच आश्चर्यचकित झाले.. कारण ती अक्षरशः 20 वर्षाची College going student दिसत होती. तिच्याकडे आणि तिच्या स्वतःच्या फिटनेस कडे पाहून मी खूपच खुश झाले, मला मनापासून आशा वाटली की हिच्यात काहीतरी आहे, आणि ही आपलं weight loss करवून देऊ शकते.. आणि तिची सर्वात छान गोष्ट मला ही वाटली की तिचा प्लॅन हा #NoProtein #NoAyurvedic #NoHerbalProducts #NoSteroids #NoTablets असा होता.. ती फक्त #Diet and #Exercise वर #WeightLoss घडवून आणत होती. आणि खरं सांगायचं तर मी तिच्या कोणत्याही clients चे results पाहायला मागितले नाहीत, चौकशी पण फार केली नाही. मी फक्त आणि फक्त तिला पाहूनच तिच्यापासूनच प्रेरणा घेऊन तिच्याकडे जॉईन केलं. जॉईन करण्यापूर्वी पण मला डाएट म्हणजे उपाशी राहणं अस वाटत होतं. पण Reshma Jadhav मॅम ने मला खूप छान प्रकारे डाएट म्हणजे Healthy Eating हे समजावून सांगितलं. त्यानुसार मी त्यांच्याकडे जॉईन केलं होतच की lockdown पडला.. तरीही त्यांनी हार न मानता मला घरी करण्यासाठी काही exercise पाठवले आणि डाएट चार्ट पण पाठवला.. आणि प्रत्येक 8-8 दिवसानी माझं फॉलो अप घेत होत्या. त्यांच्या डाएट प्लॅन मुळे पाहता पाहता माझं lockdown काळात 2.5 ते 3 महिन्यात #17किलो ने वजन कमी झालं. 

काही महिन्यानी lockdown शिथिल झाल्यावर जेव्हा सर्व हळूहळू घराबाहेर पडू लागले तेव्हा मला #65kg वरून #48kg वर पाहून सर्वांनी आश्चर्यने तोंडात बोटं घातली.. सर्वजण म्हणायला लागले lockdown काळात आमचं घरात बसून बसून वजन वाढलं आणि तुझं कसं काय कमी झालं , ते ही एवढा #DrasticChange त्यांच्या समजण्यापालिकडे होता. तिच्या स्वतः प्रमाणे आता मलाही लोक #CollegeGoingGirl दिसते अस म्हणू लागले.. सोसायटी मधली छोटी मुलं जी पूर्वी #aunty म्हणत होती ती अचानक #Didi म्हणू लागली. यामुळे मी खूपच खुश झाले. माझा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्यातला हा बदल 2 वर्षपूर्वी घडला आहे, तो हि पहिल्या lockdown मध्ये घरात बसून. आणि अजूनही 2 वर्षांनंतरही माझं वजन maintain आहे, कारण डाएट बंद केल्यावरही ते manitain कस ठेवायच हे Reshma jadhav मॅम ने मला सांगितलं, त्यामुळेच अजूनही ते maintain आहे. याच सर्व श्रेय फक्त आणि फक्त Reshma Jadhav मॅम यांनाच जात.. त्यामुळे या Review च्या रुपात माझी तुमच्या बद्दलची कृतज्ञता आणि आभार मी व्यक्त करत आहे. तुम्ही त्याचा स्वीकार करावा ही मनापासून विनंती आहे.. 😊🙏🙏🙏🏼
Highly recommended to Reshma Jadhav mam
--Anita Shelake




No comments:

Post a Comment