Monday, May 29, 2023

Dhiraj Loke



नमस्कार धिरज विजय लोके माझा Fitness Naturo सोबतचा #Weight #Gain बाबतचा #Review इथे मांडतोय..

बऱ्याच तरुणांना २०-२५ या वयाच्या टप्प्यात एक नशा असते बॉडी बनविण्याची आणि त्यासाठि वाट्टेल ते प्रयत्न करण्याची तयारी असते, त्यापैकी मी ही एक... २०१२-१३ च्या दरम्यान gym च प्रचंड वेड आणि बॉडी बनवायची खुमखुमी आणि त्यासाठि प्रोटीन पावडर सारखे शॉर्टकट वापरायचीही तयारी होती. काहीवेळा ते वापरले सुद्धा पण हवा तसा फरक पडत नव्हता... Gym मध्ये कितीही प्रयत्न केले आणि जेवण खाण कितीही बदललं तरी अगदी जास्तीत जास्त ६२-६३ च्या पुढे वजन कधी गेलं नाही.. हळूहळू gym सुटली आणि त्यासोबत ते खाण पिणं सुद्धा... मध्ये बराच काळ गेला नोकरी, व्यवसाय याच्या धावपळीत पुन्हा वजन ५७ वर येऊन पोचल होतं..

या दरम्यान फेसबुक वरून रेशमा Weight Loss/ Weight Gain प्रोग्राम बाबत कळलं... तशी आमची त्यापूर्वीची जुजबी ओळख होती त्यामुळे सर्व प्रोसेस समजून घेणं अजून सोप्पं झालं.. माझ्या उंची आणि वय याच्या मानाने BMR नुसार किमान ७०च्या आसपास वजन हवेच होते. माझा धावपळीचा दिनक्रम आणि त्यात सकस आहाराचा डाएट बसविणे खर तर चॅलेंज च होतं... पण रेशमा ने हे चॅलेंज घेतलंच.

माझ्या सकाळीं उठण्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत च्या पुर्ण दिनक्रमाचां नीट अभ्यास करून तिने माझ्यासाठी एक परफेक्ट डाएट प्लॅन दिला दिला. मला हे सर्व जमेल इतका confidence होता पण किती दिवसांत फरक पडेल याबाबत मी साशंक होतो. रेश्मा ने सांगितल्याप्रमाणे मी आठवडाभर डाएट केलं.. या आठवड्याभरात बऱ्याचदा वजन करून पहायची इच्छा झाली पण स्वतः ला आवरलं... आणि आठ दिवसांनी वजन केलं तर माझ्या डोळ्यासमोर अक्षरशः तारे चमकले. एका आठवड्यात तब्बल ९ किलोने वजन वाढल होतं.

Gym ला जायचो तेव्हा एक दोन किलो वजन वाढलं की नुसता gym च्या आरश्यात स्वतःला ला कौतुकाने निरखत बसायचो... आणि इथे कोणत्याही gym शिवाय अवघ्या Strict Diet वर आठवड्यात आठ किलो वजन वाढवलं होतं... वजन काट्यावर किमान चार पाच वेळा तरी उभ राहून चेक केलं नक्की काही चुकत नाहीय ना माझं. लगेच फोटो काढून रेशमा ला पाठवला.. तिलाही तो इतक्या कमी दिवसांत आलेला रिझल्ट पाहून आश्चर्य वाटलं..

पुढच्या आठड्यापासून डाएट मध्ये थोडे बदल करून पुन्हा चालु केलं कारण टार्गेट ७०-७१ च्या पुढे न जाउ देणं होत. आणि माझं तर अवघ्या आठ दिवसांत ५७ वरून ६६ वर वजन आलं होतं... त्यानंतरच्या आठ दिवसांच्या अगोदरच माझं ७१ च टार्गेट पूर्ण होऊन ७२ वर वजन गेलं... अवघ्या १५ दिवसांत ५७ वरून ७२ म्हणजे १५ किलो वजन वाढवलं होतं.. आणि हे सर्व शक्य झालं ते फक्त रोजच्या वापरातील पदार्थ खाऊन. कोणतेही महागडे पदार्थ किंवा प्रोटीन, steroids न वापरता हा रिझल्ट आला होत. फक्तं रोजच दिनक्रम लक्षात घेऊन सहज उपलब्ध होतील अस जेवण आणि नाश्ता याच गोष्टींवर हा रिझल्ट येणं हे माझ्यासाठीही नवलच होतं. पुढे हे वाढलेल वजन फक्त ७० ते ७१ मध्ये maintained ठेवायचं होतं त्यामुळे strict Diet बंद करून नाश्ता जेवण बाबतच्या साध्या सोप्या टीप्स दिल्या..


आज या गोष्टीला जवळपास ३ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय पण अजूनही ६९ ते ७१ या लाईन च्या बाहेर वजन जात नाही. आणि खरतर या सर्वात माझी मेहनत फक्त त्या आठ दिवसांचीच होती पण त्यासाठी लागणारा अभ्यासपूर्ण डाएट आणि त्यानंतर च्या टीप्स मला कायम उपयोगी पडत आल्या आहेत.


या सर्व प्रवासात एक उल्लेखनीय बदल माझ्यात झाला जो मला आयुष्यभर उपयोगी पडणारा होता. हे डायट सुरू करण्याआगोदर मी दिवसातून किमान १०-१२ कप कधी कधी तर १५ कपच्या आसपास चहा प्यायचो आणि त्यांचे परीणाम भूक कमी लागणे यात दिसत होते. पण त्या १५ दिवसांच्या डाएट नंतर माझी ही वर्षानुवर्षे असलेली चहा ची सवय पूर्णपणे बंद झाली. त्या नंतर मी आजवर फारतर दोन अगदीच जास्त झाल्या तर तीन ते चार कप चहा घेतो. पुर्वी अर्ध्या पाऊण तासात चहा मिळाला नाही की डोकं दुखायच, चिडचिड व्हायची पण आता चहा प्यायलाच हवी अशी इच्छाही होत नाही. माझ्यातला हा बदल जितका सुखावह होता तितकाच आरोग्याच्या दृष्टिने खूप महत्वाचा होता. १ जानेवारी च्या सकाळीं सुरू झालेले चहा सोडण्याचे माझे कितीतरी संकल्प "दिड दिवसांत" विसर्जित झाले होते. पण या Diet मुळे ही सवय इतक्या सहजपणे सुटली की पूर्वी "दिवसभर चहाचच नावं घेणारा" मी सध्या "नावाला चहा" घेतो. याच पूर्ण श्रेय रेश्मा ला जातं.
 
तीन वर्षांपुर्वी माझ्यात अचानक झालेला बदल पाहून बऱ्याच जणांनी मला त्याच कारण विचारल त्यावर मी फक्त Diet असं उत्तर द्यायचो. माझ्या एका फेसबुक फ्रेंड ने रेशमा ने पोस्ट केलेल्या फोटो चां screen shot पाठवून विचारल की तुझ्या फोटो चां missuse होतोय का?? तेंव्हा मला समजून सांगावं लागलं की दोन्हीं फोटोतला तो मीच आहे. आणि यासाठी मी रेश्मा च्या #Fitness #Naturo कडून डाएट घेतोय. पण बऱ्याच जणांना प्रश्न पडायचां बारीक माणसाला कसलं डाएट.. पण खरतर डाएट म्हणजे फक्त वजन कमी करणाऱ्याची गरज नसते...तर एक healthy आयुष्य जगण्याचा तो एक मार्ग असतो..Diet खरतर गरज म्हणून नाही तर सवय म्हणून follow करायला हवं. वजन वाढलं किंवा डॉ. ने इशारा दिला म्हणून डाएट करण्यापेक्षा #Diet आपल्या दिनचर्येचा भाग असायला हवा.

वजन कमी असणं किंवा जास्त असणं दोन्ही धोकादायक. हेचं वजन कस maintained ठेवायचं हे काम एक तज्ञ Nutritionist किंवा Dietitian च योग्य पद्धतीने करू शकतो.. आणि Fitness Naturo च्या माध्यमातून रेशमा हे काम फार जबरदस्त पद्धतीने करतेय यात शंकाच नाही. आज तीच्या इतर क्लायंट चे #Weight #Loss चे result पाहून बर वाटतं. प्रत्येकाने एक निरोगी व सुदृढ आयुष्य जगावं यासाठी ती Fitness Naturo च्या माध्यमातून जे प्रयत्न करतेय त्याला हॅट्स ऑफ... अशीच यशस्वी हो आणि तुझा Fitness चां उप्रकम जगभर पोहोचव...

Best Of Luck... Reshma

No comments:

Post a Comment