Thursday, June 6, 2024

Jayashree Kulkarni




नमस्कार..🙏 माझ नाव जयश्री कुलकर्णी.. मी धुळ्याला राहते आणि मी एक Government Servent आहे. मला रेश्मा मॅम बद्दल माहिती माझ्या भाऊजी कडून मिळाली जे की पुण्याला राहायला होते आधी.

माझ्या पायाचा जन्मापासूनच प्रॉब्लेम असल्यामुळे मला वजन कमी करायचे होते. माझ्या एका पायाला स्पयाना बायफिडा आहे.त्यामुळे मला नॉर्मल चालण्यात पण अडचणी येत होत्या . फार शारीरिक हालचाली मला करता येत नव्हत्या..

माझे वजन खूपच वाढले होते 78 झाले होते त्यामुळे माझ्या पायावर जास्त दाब पडत होता. त्यामुळे वजन तर कमी करायचे होते पण कोणत्याही प्रकारचे मेडिसिन नको होते. आणि रेश्मा मॅडम मुळे हे शक्य झाले. कारण त्यांच्या वेट लॉस करण्यात मध्ये करण्यात वेट लॉस च्या पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचे मेडिसिन, ज्यूस, पावडर असे पदार्थ असे मेडिसिन नसल्यामुळे मला त्यांचा डायट प्लॅन घ्यावासा वाटला. आणि त्याचा मला फायदा झाला. माझे वजन हळूहळू कमी होत चालले होते. त्यांची फॉलो अप ची डेट जवळ आली की टेन्शन असायचं की आपलं वजन कमी व्हायला हवं. त्यामुळे वजन कमी करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांच्या फॉलोअपला आपलं वजन कमी दिसले पाहिजे असा टार्गेट ठरलेला होता.

रेश्मा मॅडम खूप चांगल्या प्रकारे समजावंतात आणि वजन कसं कमी करायचं आणि अजून अजूनही तुम्ही यापेक्षा चांगल्या प्रकारे कसं वजन कमी करा यासाठी त्या नेहमी मोटिवेट करतात. त्यामुळे एखाद्या आठवड्यामध्ये आपलं वजन नाही जरी कमी झालं तरी पण आपण निराश होत नाही आणि मॅडमच्या सांगण्यामुळे आपण पुन्हा जोमाने वजन कमी करण्याकडे लागतो. त्यामुळे जरी माझे exercise restrictions होते तरीही रेश्मा मॅम ने मला प्रोपर डाएट प्लॅन देऊन आणि तो follow करायला लावून माझे आता 15 विक मध्ये 11kg #weightloss झाले आहे.

मी जेव्हा माझ्या मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये गेट-टुगेदर मध्ये गेले असता त्यांनी सुद्धा ऍप्रिसिएट केलं की माझं वजन छान कमी होतंय आणि त्यांना पण डायट प्लॅन घ्यावासा वाटला.

वजन कमी झाल्यामुळे माझा चाळण्यातला confidence वाढला आहे.. कारण आता मला व्यवस्थित चालता येत अस माझ मलाच फील होतय.. मला अजूनही वजन कमी करायच आहे आणि रेश्मा मॅम च्या मार्गदर्शनाखाली ते नक्की होईल याची खात्री आहे.. Thank You So Much Reshma Mam😊🙏

No comments:

Post a Comment