Thursday, June 6, 2024

Rekha Kale




आज बरोबर तीन महिने झाले मी रेश्मा मॅडमच्या फिटनेस नेचेरोला जॉईन झाले. माझे नाव रेखा काळे. मी एक प्रोफेसर आहे..

खरंतर वेटलॉसचा हा प्रवास सुरु करावा असे वर्षभरापासून वाटत होते . रेश्मा मॅडम आणि माझी सिक्कीम दार्जिलिंगच्या ट्रीप मध्ये ओळख झाली होती . गेली दोन वर्षे मी फेसबुक व व्हाटस्अप चे स्टेटस वरती त्यांच्या पोस्ट पाहत होते . पण डाएटचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होईल किंवा वीकनेस जाणवेल अशी भिती होती .

वेटलॉस वरील प्रॉडक्ट शेक किंवा कृत्रिम न्युट्रीयंटस घेण्याच्या विरोधात होते मला वजन कमी करायचे होते पण तेही नैसर्गिकरीत्या आणि उपासमार न होऊ देता . आणि खरंच जेव्हा मी पहिल्यांदा रेश्मा मॅडमशी बोलले तेव्हा लक्षात आले की डाएट करण म्हणजे घरगुती जेवणच जेवायचे आणि तेही घरी उपलब्ध असलेल्य धान्य आणि भाज्यामधून . मी लेक्चरर म्हणून जॉब करते दिवसभर उभे राहुन लेक्चर घेतल्यामुळे संध्याकाळी खुप थकवा आणि पाय खुप दुखायचे त्यात दिवाळीनंतर पाठदुखी सुरु झाली . आणि मग माझे पती म्हणाले की आपण डॉक्टरकडे ट्रिटमेंट घेऊयात . मी विचार केला की ॲलोपॅथी ची ट्रिटमेंट घेण्यापेक्षा आपण वजन थोडे कमी करून फरक पडतो का ते पाहुयात .

आणि मग मी रेश्मा मॅडमकडे वेट लॉससाठी अपाईटमेंट घेतली . खरतर त्यांचे क्लायंटचे रिव्ह्यु आणि रिझल्टस कायम पहात होते . त्यामुळे आणखी चौकशी न करता लगेच डाएट प्लॅन आणि एक्झरसाईज सुरु केला . आणि काय आश्चर्य एकाच आठवड्यात माझी पाठदुखी आणि Leg Pain पुर्ण नाहीशी झाली . मग मी ठरवले की आपण पुढे continue ठेवायचे . माझ्या मैत्रिणींना मी डाएट करते हे सुरुवातीला सांगितले नव्हते. पण दोन तीन आठवड्यानंतर त्या मला म्हटल्या मॅडम तुमच्या चेहऱ्यावर छान glow आलाय कुठली क्रिम लावता ? माझ्या लक्षात आले की हा डाएटचा परिणाम आहे मला भीती होती की डोळे खोल जातील काळी वर्तुळे येतील पण यातील एकही दुष्परिणाम शरीरावर झाला नाही .

पुर्वी मला कॉलेजवरून घरी गेले की आपण आजारी आहोत अशी भावना असायची आणि घरी गेले की झोपून रहाव लागायच . आता मात्र माझ्यामध्ये प्रचंड उत्साह वाटतो आणि सकाळी ५ ते रात्री ११ पर्यत न थकता काम करते . माझी पाठदुखी आणि leg pain ची समस्या पुर्णपणे बंद झाली याचा मला weight loss पेक्षाही जास्त आनंद होतोय .

६८ किलो वजन हे वयाच्या पंचेचाळीशीनंतर ५७ किलोवर आणण हे तस दिव्य होते पण ते रेश्मा मॅडममुळे शक्य झाले .

Thank you so much Reshma mam & Team for your assistance in my weightloss journey...



No comments:

Post a Comment