Thursday, June 6, 2024

Surekha Jawalkar

 


  नमस्कार मी सुरेखा जवळकर. सर्वप्रथम मी रेश्मा मॅम चे मनापासून आभार मानते.त्यांच्यामुळेच आज मी माझ्या टार्गेट पर्यंत पोहचू शकले. रेश्मा मॅम बद्द्ल मला पुला ग्रुप वरून माहिती मिळाली. तिथे मी नेहमी त्याच्याबद्दल चे review पाहायचे. मलासुद्धा त्यांचा कोर्स जॉईन करण्याची इच्छा झाली पण मनात खूप शंका होत्या की फक्त घरच्या जेवणातून डाएट करून कसा काय वजन कमी होऊ शकते. असाच विचार करत पुढच्या महिन्यापासून सुरू करू असे करत करत जानेवारी 2024 आल. मग ठरवलं की आता नक्की वजन कमी करायचं आणि यासाठी काही कारण ही होते की माझी दोन्ही मुलं.त्यांनी मला सारखं म्हणत होते की मम्मी तु खुप जाड झालिये.

कुठल्या प्रोग्रामला मला जायची इच्छा होत नसे कारण मनाला वाटेल ते कपडे घालता येत न्हवते. आणि माझे शरीर मला बेढव दिसायला लागले होते. कारण मी लग्नाच्या आधी खूप स्लिम होते अगदी 50 ते 52 kg. आणि दुसऱ्या डिलिव्हरी नंतर माझे वजन 84kg वर गेले. पण नंतर ते 74kg पर्यन्त आले.पण त्यानंतर वजन कमी होतच न्हवते. जास्त वजनामुळे मला गुडघेदुखी चा त्रास व्हायला लागला. खूप आळस यायचा, कोणतेही काम केले की थकवा जाणवायचा. मग ठरवलं आता काही झाले तरी रेश्मा मॅम चा डाएट प्लॅन चालू करायचा आणि मग मी रेश्मा मॅम ना कॉल केला .
त्यांनी खूप छान समजाऊन सांगितलं की घरच्या घरी जेवणातून कस वजन कमी करता येते .डाएट चालू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात माझे वजन 2kg ने कमी झाले.मग मला वाटले खरंच काम होतंय.आणि मग मी मनापासून डाएट सुरू ठेवला.
मॅम दर followup la call करून विचारपूस करायच्या.काही त्रास होत नाही ना . अशा प्रकारे प्रत्येक वेळी माझे वजन कमी होताना पाहून मला खूप भारी वाटत होते. घरचे जेवण आणि 45 min. वर्कआऊट यामुळे वजन कमी होत गेले. रेश्मा मॅम पण खूप उत्साह वाढवायच्या. त्यांच्यामुळेच टार्गेट लवकरात लवकर पूर्ण करायला मदत झाली. आणि माझे जे हेल्थ इश्यू होते ते पण पूर्ण आता नाहीसे झालेत माझे गुडघेदुखी पूर्ण बंद झाली. आणि आता आळस अजिबात येत नाही कुठलेही काम करताना थकवा जाणवत नाही खूप उत्साह वाटतो.

थँक्यू रेश्मा मॅम आज तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झाले. 74kg वरून आज मी 64kg वर येऊ शकले ते फक्त तुमच्यामुळेच. वजन कमी झाल्यापासून मला खूप छान कॉम्प्लिमेंट मिळतात एवढं कसं काय वजन कमी करू शकले असे सगळेजण मला प्रश्न विचारतात नक्की काय केलंस तू. मला एक पंधरा वर्षाचा मुलगा आणि एक सात वर्षाची मुलगी आहे पण सगळ्यांना वाटतच नाही मला एवढा मोठा मुलगा आहे म्हणून. इतक्या छान कॉम्प्लिमेंट्स मिळाल्यावर कोणालाही आनंद होईलच.
त्यामुळे रेश्मा मॅम तुम्हाला खूप खूप थँक्यू. आणि तुमच्या टीमला खूप सदिच्छा.



No comments:

Post a Comment