Thursday, June 6, 2024

Sayali Mhetre





आजचा माझा सुपर पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहे रेश्मा जाधव दोरके मॅम साठी. दुसऱ्या डिलिव्हरी नंतर माझे वजन 25 kg ने वाढले होते वजनामुळे मला शारीरिक त्रास व्हायला लागला. पाय, गुडघेदुखी वगैरे आणि कॉन्फिडन्स ही कमी होत गेला. मग एके दिवशी पूल ग्रुप वर मी रेश्मा मॅम बद्दलचा वेटलॉस चा रिव्ह्यू वाचला. मग अजून थोडी माहिती घ्यावी म्हणून ग्रुप वर सर्च केले तर बरेच रिव्ह्यूज वाचायला मिळाले.

मग प्रश्न होता माझा बेबी लहान आहे तर आता वेटलॉस करणं चांगला आहे का बाळाच्या दुधावर याचा परिणाम तर होणार नाही ना हे सगळे प्रश्न रेश्मा मॅमला कॉल करून विचारू असं ठरवलं मग फायनली मी रेश्मा मॅम ला कॉल केला कॉल वर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली व निरसन झाले. थोडीफार डायट बद्दल व एक्सरसाइज बद्दल माहिती मिळाली. एक्सरसाइज आपण कधीही करू शकतो आपल्या वेळेनुसार हे समजल्यावर अजून छान वाटले कारण बेबी मुळे ऑनलाईन एक्सरसाइज जमणार नव्हते. मग दोन दिवसात फायनल केले यांच्याकडेच आपण घेऊ, मग डायट प्लॅन मिळाला मला जसा पाहिजे होता तसा, (कोणतेही शेक, पावडर, मेडिसिन, पॉरिज) असे सर्व पदार्थ त्यात नव्हते सर्व पदार्थ घरीच उपलब्ध होते.

फायनली डाएट सुरू झाला आणि वन वीक मध्ये 1kg वेट लॉस झाला. मग ठरल्याप्रमाणे रेश्मा मॅमने फॉलोअप घेतला त्यांच्याकडून अजून मोटिवेशन मिळाले. असे करत #22kg चा प्लॅन माझा फक्त #22week मध्ये पूर्ण झाला.

माझ्याआधी माझ्या एका मैत्रिणीने द्दुसऱ्या एक dietitian कडे प्लॅन घेतला होता तिचे वजन 8-9month मध्ये फक्त 8kg लॉस झाले होते.. आणि माझे 5.5 month madhe 22kg लॉस.. तेही कोणत्याही पावडर,शेक शिवाय..



आता मला खूपच भारी वाटत आहे. आधीचे कपडे परत बसले आहेत. कॉन्फिडन्स वाढला आहे याचे सर्व श्रेय मी रेश्मा मॅडमला देते थँक्यू सो मच रेश्मा मॅम तुमच्यामुळे मला माझे सर्व पूर्वीचे कपडे घालता येऊ लागले. बाहेर गेल्यावर आधी जे लोक किती जाड झाली तू असं म्हणत होते तेच आता तू अगदी पूर्वीसारखी दिसायला लागली असं म्हणत आहेत. खरच खूप थँक्यू रेशमा मॅम तुमचे करावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आणि तुमच्या ऑफिस स्टाफ पण त्यांनी व्हाट्सअप आणि कॉलवर माझ्या सर्व शंकांचे निरसन केले. त्यासाठी मी तुम्हाला फाईव्ह स्टार रेटिंग देते.. Thank You 😊


सायली म्हेत्रे

No comments:

Post a Comment