Facebook वरील Pula ग्रूप वर मी रेश्मा मॅडम च्या weight loss program चे review खूप वेळा वाचले होते.. Pregnancy नंतर माझं वजन खूप जास्त वाढलं होतं.. आधी २ - ३ वेळा मी घरीच इंटरनेट वरून माहिती घेऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न केला होता.. पण हवा तसा फरक दिसत नव्हता...
Review वाचून मी एकदा रेश्मा मॅडम ना फोन करायचा ठरवला..
फोन वर त्यांना १५ किलो वजन कमी करायचं आहे असं सांगितलं...
त्यांनी त्यांचं डाएट प्लॅन आणि व्यायाम याची माहिती दिली...
कुठलही प्रोटीन पावडर किंवा औषधे न घेता घरीच डाएट करून वजन कमी करणं हे मला genuine वाटलं.. आणि मग त्यांच्याशी बोलून आपण हे करू शकतो असं वाटलं..
१० ऑगस्ट २०२४ ला मी weight loss सुरू केला आणि पहिल्याच आठवड्यात माझं वजन ३ किलो कमी झालं..
आपण जर मनाशी ठरवून जिद्दीने सगळं डाएट फॉलो केलं तर नक्कीच फरक जाणवतो हे लक्षात आलं... आणि आपण योग्य दिशेनं वाटचाल करत आहोत हे कळलं...
दर आठवड्याला त्यांची टीम आणि मॅडम फॉलोअप घेतात आणि मग consultation call होतो..
त्यांच्याशी बोलून आपण खूप छान करतोय आणि लवकरच आपला टार्गेट पूर्ण होईल याची आशा वाटते...
१० नोव्हेंबर २०२४ ला माझं वजन ७५.५ वरून ६० किलो झालं... आणि तेव्हाचा आनंद मी शब्दात खरचं सांगू शकत नाही.. आता माझं वय आणि उंची या प्रमाणे माझं ideal वजन आहे..
४ महिन्याचा प्रोग्रॅम मी काटेकोरपणे आणि चिकाटीने डाएट आणि रोजचा घरीच केलेला व्यायाम यामुळे ३ महिन्यातच १५ किलो वजन कमी करून पूर्ण केला.
रेश्मा मॅडम कायम शंकाच निरसन करतात.. सर्व उत्तरे देतात.. त्यामुळे छान हुरूप येतो.. वजन कमी व्हायला सुरुवात झाली की एक वेगळा आत्मविश्वास येतो.. जेव्हा लग्ना आधीचे कपडे पुन्हा येतात तेव्हा खूप छान वाटलं.. pregnancy नंतरचा पूर्ण wardrobe मला आता change करावा लागला आहे त्याचा मला खूप आनंद आहे..
फॅमिली मेंबर, शेजारी, मित्र मैत्रिणी सगळे जण किती छान वजन कमी केलं म्हणून कौतुक करू लागले तेव्हा खूप मस्त वाटलं.. घरच्यांचं पाठींबा होता आणि वजनात दिसणारा फरक पाहून त्यांनी पण प्रोत्साहन दिलं...
Pregnancy मुळे Diastatsis recti (muscle separation) आणि umbilical hernia अशा काही समस्या असताना मला व्यायाम करताना खूप मर्यादा होत्या.. पण योग्य आहार घेतल्या मुळे या समस्या असताना ही पोटाचा घेर ८ इंच कमी झाला ही माझ्या साठी खूप जास्त गर्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे..
हा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता .पण मी एकच सांगेन जेवढं जिद्दीने आणि प्रामाणिकपणे आपण डाएट फॉलो करू तेवढं आपल्याला ते कमी दिवसात जास्त छान रिझल्ट्स देतं..
१५ किलो वजन कमी करताना पूर्ण शरीरात inches मध्ये लॉस दिसून आला हे खूप महत्वाचं आहे.. काही hormonal problems होते तेही बरे झाले..
आता पूर्वी सारखं बारीक झाल्या मुळे खूप उत्साही आणि energetic वाटतं.. स्वतःचा अभिंमान वाटतो..
मनाशी ठरवलं तर आपण कुठल्याही conditions(वय, वजन, होर्मोनल प्रॉब्लेम, पोस्ट सिजर डिलिव्हरी) मध्ये वजन कमी करू शकतो.. यात मला माझ्या Husband ने खूप प्रोत्साहित केलं.. त्यांच्या motivation मुळे मी dedication ने पूर्ण करू शकले...
यातून आरोग्यदायी आहार आणि व्यायाम याची योग्य सांगड याचं महत्त्व पटलं आहे..
मी रेश्मा मॅडम आणि त्यांची टीम याची आभारी आहे..
अपेक्षा शिवारे