Monday, September 30, 2024

shubhangi Badgujar


 Hello mam,

         माझे नाव शुभांगी बडगुजर, 

Second pregnancy नंतर वाढलेलं वजन काही करून कमी होत नव्हतं, मग मी पूला ग्रुप वर रेश्मा मॅम चे रिव्ह्यूज पाहिले आणि ठरवलं जॉईन करायचं.

            घरातल्या जेवणातून वेटलॉस करणार आहोत ही गोष्ट खूप छान वाटली.या प्रवासात कोणतेही पावडर, शेक, टॅबलेट, फॅन्सी फूड नाही फक्त आणि फक्त मॅमने सांगितलेला डाएट आणि एक्सरसाइज एवढेच आणि त्याचा खूप फायदा झाला. 

              रेश्मा मॅम आणि टीम दर आठवड्याला फॉलोअप आणि मेजरमेंट घेत होत्या. रेश्मा मॅम शी कॉल वर बोलून खूप छान वाटायचं आणि वेगळाच आत्मविश्वास यायचा की आपण हे करू शकतो.

           मग काय हळूहळू वजन कमी व्हायला लागलं आणि माझं 10kg टारगेट पूर्ण झालं. आता मी XL वरून M size वर आले आहे. पूर्वीचे कपडे घातल्यावर खूप छान वाटते आहे

आणि हे सर्व शक्य झालं फक्त आणि फक्त रेश्मा मॅम तुमच्यामुळे.

         Weight loss journey चालू असताना मध्येच चार दिवस गावाला जावे लागणार होते मला खूप टेन्शन आलेले पण मॅमने काय खायचे आणि काय टाळायचे हे व्यवस्थित समजावून सांगितले.  आणि त्याचा खरंच खूप फायदा झाला. 

             वजन कमी करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी या प्रवासात माझी मदत केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे.


          Thank you so much Reshma mam and team.🙏

No comments:

Post a Comment