Monday, December 2, 2024

Rahul Sawant



 माझं नाव राहुल सावंत. मी IT Engineer आहे. वाकडला राहतो.

           मला रेश्मा मॅम आणि #FitnessNaturo बद्दल माझ्या बायकोकडून कळलं, तिने facebook वर PULA group वर तुमचे reviews वाचले होते. मी या आधीही बरेच diet follow केले पण पाहिजे तसे result नाही मिळाले. तर मला वाटल असच काहीतरी असेल. पण माझी बायको मला convince करत राहिली. आणि मग मी डाएट करण्याचा निर्णय घेतला. मला अजिबातही खात्री वाटत नव्हती माझं वजन कमी करण्याचं स्वप्न साकार होईल की नाही याची.

पण रेश्मा मॅम चे  पूर्वीच्या क्लायंट्सचे यशस्वी अनुभव आणि बायकोचा आग्रह यामुळे मी त्यांच्याकडे जॉईन व्हायचं ठरवलं.

             पहिल्या फॉलोअपला म्हणजे पहिल्या 8 दिवसातच माझं वजन डायरेक्ट 4किलो ने कमी झालं. त्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळालं आणि  मी अधिक आत्मविश्वासाने फिटनेस चा प्रवास सुरू करण्याचं ठरवलं.

              रेश्मा मॅम आणि Fitness Naturo कडून मिळणारा प्रतिसाद खूप सकारात्मक होता. त्यांनी वेळोवेळी मला प्रेरणा दिली आणि योग्य मार्गदर्शन केलं.

            त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली मी डाएट आणि exercise अगदी काटेकोरपणे पाळल. आणि त्यामुळे 11 वीक मध्ये माझे वजन 92 किलो वरून 77 किलो असे टोटल 15किलो लॉस झाले. आता वजन कमी झाल्यानंतर शरीर आणि मन दोन्ही हलके वाटतंय. माझा आत्मविश्वास वाढलाय आणि फिटनेसच्या बाबतीत खूप चांगलं वाटतंय.

                रेश्मा मॅम एक प्रेरणादायक, positive आणि समर्पित फिटनेस कन्सल्टंट, कोच आणि ट्रेनर आहेत. त्याचं मार्गदर्शन प्रत्येक क्लायंटच्या गरजेनुसार असतं, ज्यामुळे प्रत्येकाला अपेक्षित यश मिळतं.

                त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक वेगळे व्यायाम प्रकार आणि healthy आहाराच्या सवयी अंगीकारता आल्या. मी मधेमधे regular diet follow नाही करू शकलो. पण त्यांनी पुन्हा पुन्हा मला track वर आणत होत्या. त्याबद्दल त्यांचे खूप कौतुक ..😊

                 फॅमिली, मित्र मंडळी यांना सुरुवातीला काहींना शंका होती, "काही नाही होत वजन कमी... आणि झाल तरी लगेच वाढेल".  पण आता त्यांनीही माझ्या मेहनतीचं आणि बदललेलं रूप पाहून कौतुक केलं. आणि माझं वजन constant राहिले.. normal diet सुरू झाल्यावरही... माझ्या खूप साऱ्या मित्रांना मी त्यांचा फिटनेस प्लॅन जॉइन करण्याचा सल्ला दिला. 

                 आता वजन कमी झाल्यामुळे माझी एनर्जी लेव्हल वाढली आणि काही जुने आरोग्याचे त्रासही कमी झाले. पूर्वी मी माझ्या क्षमतांबद्दल थोडा साशंक होतो पण आता मला माझ्यावर विश्वास आहे आणि फिटनेसच्या बाबतीत मी स्वतःला खूप स्ट्रॉंग समजतो. आणि मी नेहमी फिट आणि healthy राहण्यासाठी तुमच्या सर्व tips follow करेन.😊

No comments:

Post a Comment