Monday, October 28, 2024

Kalyani Magar


 माझ नाव कल्याणी मगर. मी एक IT Engineer आहे. माझ्या डिलिव्हरी नंतर माझं वजन खूप वाढलं होतं 72 किलो झाल होत. मी कित्येक महिने झालं छान डायट प्लॅनच्या शोधात होते पण मनात एक भीती होती की आपण जोपर्यंत डायट करतो तेव्हा तेवढेच वजन आपलं कमी होतं आणि जेव्हा आपण आपलं नॉर्मल रुटीन मध्ये येतो ते वजन आहे तसं परत वाढत. 

       मी रेश्मा मॅम चे फेसबुक वरती रिव्ह्यूज  पाहिलं होते आणि एक वर्ष त्यांना फॉलो करत होते. यावर्षी सप्टेंबर मध्ये मी त्यांच्याकडून डायट प्लॅन घेतला आणि अगदी सात आठवड्यातच माझं वजन दहा किलो पेक्षा जास्त कमी झालं. आणि तेही मध्ये  दोन आठवडे नवरात्रीमुळे माझं डायट प्लॅन बिलकुल फॉलो नव्हतं झाल.

       माझा तीन महिन्यांचा प्लॅन अगदी सहा ते सात आठवड्यातच कम्प्लीट झाला मी खूप खुश आहे. माझा रिझल्ट पाहून खूप सगळ्यांनी मला माझ्या डायट प्लॅन विषयी विचारल आहे. 

       रेश्मा मॅम आणि त्यांची टीम खरच खूप सपोर्टिव्ह आहे त्यांनी प्रत्येक आठवड्याच्या फॉलोअपला काही ज्या चुका झाल्या असतील किंवा काही अजून इम्प्रूमेंट करायच्या असतील ते सगळे व्यवस्थित माहिती दिली. 

         याच्या आधीही मी काही डायट प्लॅन फॉलो केला होता पण तो रिझल्ट आला नव्हता. परंतु हा डायट प्लॅन्स असा आहे की तुम्ही रोजच्या घरी जे बनवता तेच खायचं.  मी माझं वर्क फ्रॉम होम आणि मुलं सांभाळून घरच्या घरी हा डायट प्लॅन फॉलो केला अजिबात अवघड नाही , खूप जास्त इफेक्टिव आहे. माझी पाठ दुखीची समस्या होती ती पूर्णतः बंद झाली आहे. मला खूप सकारात्मकता वाटते आता.

2 comments:

  1. https://gymdietplanandexercises.blogspot.com/2023/03/reduce-belly-fat-process.html?sc=1731595092393#c3374686698981658015

    ReplyDelete
  2. As someone who’s passionate about healthy eating, I found this post extremely helpful! It's so important to find high-calorie healthy foods, especially for those looking to build muscle or maintain weight in a healthy way. A nutritionist for high calorie healthy foods can really guide you toward the best choices for your needs. I recently came across this great resource at DietDoc for personalized nutrition advice.

    ReplyDelete