Thursday, December 26, 2024

Revati Joshi

 नमस्कार , मी  रेवती जोशी वय 41..., प्रोफेशनली IT Engineer आहे. मी रेश्मा मॅमना तसं त्यांच्या मुलामुळे g\ओळखते. माझ्या लेकीच्या क्लासमेट ची आई  एवढीच काय ती ओळख होती ...त्यांचे  स्टेटस त्यामुळे रोज बघितले जायचे , पण  आपल्याला काय याची गरज ? असा एक काळ होता. 

                 मग हळूहळू काट्यावर मी स्वतः 79 किलो जेव्हा दिसायला लागले, उंची 160 सेंटीमीटर ...त्यामानाने आपण आता वरची पातळी गाठत आहोत असे दिसत असून पण आधी बऱ्या पैकी वेळ मी त्यांच्या स्टेटस च्या  सक्सेस स्टोरीस बघण्यात घालवला... मग एक दिवस आलाच , मॅम शी  बोलून प्लॅनच फिक्स केला . माझे दोनदा सिझर झाले असल्याने थोडं टेन्शन आलं होतं ,पण त्यांच्याशी नीट बोलून घेऊन फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या.

              आता अचानक काय प्लॅन मिळेल आणि आपण खरंच करू शकणार की  खाण्याची आवड असणाऱ्या माझ्याकडून फक्त चिट डेज साजरे होणार अशी पण शंका होती... दोन दिवसात प्लॅन मिळाला आणि आता त्या डाएट चक्रात आपण उतरलो  असे  पण वाटले. 

         मी शुद्ध शाकाहारी  असल्याने मला तर SOYA पण खायला अवघड जात होते. '0101h'10जेव्हा रेश्मा आणि माझा कॉल झाला तेव्हा एकदम हलकं वाटायला लागलं . सुरु झाला डाएट चा पहिला आठवडा , फॉल्लो उप मीटिंग मध्ये रेश्मा मॅम ने  अजून छान समजावून सांगितले. 

                2 आठवड्यात  4किलो  कमी पाहून मी खूष झाले .. 

हळूहळू आत्मविश्वास निर्माण होत गेला की YES I CAN DO IT!

थोडासा challenge यायला लागला गौरी गणपती मध्ये...पण मॅम सोबत आधीच झालेल्या कॉल मध्ये त्यांनी मला वेळेपूर्वीच सावध करून ठेवले होते की घरच्यांना 'नाही' म्हणून गोड खाणे टाळून टार्गेट कडे पुढे कसे जायचे आहे ... फूड कंट्रोल केला कसा बसा ...पण  घरात पाहुणे , मुलं , व्यायामाला थोडा आराम पडला होता. पण  पुन्हा मॅम चा कॉल होणार आणि आपल्याला रागावणार त्या या भीतीने थोडा थोडा करत व्यायाम चालू ठेवला. रेश्मा मॅडम ची  टीम पण कोणतीही शंका पोस्ट केली कि त्वरित रिस्पॉन्ड करतात , हे विशेष !त्यामुळे शंका लगेच दूर होतात आणि एवढेच नाही तर  WEIGHT LOSS का नाही झाला असे हक्काने विचारतात पण!

               दिवाळी पूर्वीच माझे वजन 10 किलोने कमी झाले होते आनंद तर होत होताच पण काही काळाने मात्र त्याच त्याच डाएट चा आलेला कंटाळा पण मी व्यक्त केला आणि मॅम ने मला चालणार असा प्लॅन देखील बदलून दिला ,छान वाटलं... 

               79kilo पासून आत्ता 66 किलोवर येऊन अजूनच कॉन्फिडन्ट , हलकं  वाटत आहे , माझ्या आवडीची अनेक आसने मी पुन्हा नव्या उत्साहाने करते , घरी करता येणारे सर्व exercise आता आधी पेक्षा चांगले जमतात मला . 


                पूर्वी घरातल्यांना वाटायचं कि काय हे डाएट वगैरे ची गरज काय , असा काही होत नसतं ...पण  आता समोरून जेव्हा बदल दिसतो तेव्हा तेच सगळे  छान झालं , छान दिसतेस असं कौतुक करत आहेत!

रेश्मा मॅम ने मला आता  हेल्दी कसं राहायचंय , व्यायाम का महत्वाचा आहे असा permanently पटवूनच दिलंय ! जे  कधीही न सोडण्याचा मी नेहेमी प्रयत्न करणार आहे . 

         Thank you so much रेश्मा  and Fitness Naturo TEAM!!!  पुढे पण असेच सहकार्य आणि मार्गदर्शन  कायम असू द्या!



No comments:

Post a Comment