Monday, September 30, 2024

Amruta Tambe


 माझं नाव अमृता तांबे. मी 38 वर्षाची आहे आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात मॅनेजर आहे.

       लहानपणापासूनच मी ओव्हरव्हेट होते, पण लग्नाआधी नियमित व्यायाम आणि खाणे करून वजन आटोक्यात होतं. लग्नानंतर मात्र दोन डिलिव्हरी नंतर वजनाचा काटा भराभर पुढे सरकत 94 वर कधी जाऊन पोहोचला कळलच नाही. मी बरेच डायट कोर्सेस ट्राय केले पण एक ते दोन आठवड्यातच मी हार मानायचे. 

    

          अशातच बऱ्याचदा  PULA ग्रुप वर रेश्मा जाधव यांचे रिव्ह्यू वाचले. घरगुती आणि सोप्या डायटने आणि घरगुती व्यायामाने वजन कमी करून देणार याचा मला खूप आश्चर्य वाटलं.

 

            हो नाही करत शेवटी एकदा कॉल केलाच. पहिल्याच कॉल मध्ये मॅडमनी इतका आत्मविश्वास वाढवला की मी हे डायट करू शकेल असं मला वाटलं. डायट चालू झाल्यावर सगळं घरगुती असल्यामुळे दोन मुलं घर ऑफिस सगळं सांभाळून हे करणं अगदी सहज जमू शकेल असं मला वाटलं आणि पहिल्याच आठवड्यात चार किलो वजन कमी झालं. 

         

           सायटिका व कंबर दुखी मुळे मी जवळपास तीन आठवडे काही व्यायाम करू शकले नाही तरीही पहिलं 15 किलो वजन मी चार महिन्याच्या आतच पूर्ण केला. लगेच त्यांचा दुसरे पॅकेज घेतलं यावेळी मात्र मे महिन्याची सुट्टी लग्न ट्रीप या सगळ्यांमध्ये वजनाचा काटा मागे पुढे मागे सरकत राहिला, पण प्रत्येक वेळी फॉलोअपला रेश्मा मॅम खूप आत्मविश्वास वाढवायचा वजन कमी झालं पाहिजे असं सांगायचं.

          या सगळ्या प्रवासामध्ये दोन वेळा मी माझ्या इतर काही हेल्थ इश्यू मुळे अतिशय आजारी झाले. जवळपास तीन ते चार आठवडे कुठल्याही प्रकारचा व्यायाम करू शकत नव्हते, तरीही माझं वजन कमी होत राहिला फक्त डाएटमुळे. 

     

        आज माझा 23 किलो वजन कमी झाला आहे. यामध्ये मी कोणत्याही प्रकारचे टॅबलेट्स, पावडर घेतल्या नाहीत आणि फक्त घरी व्यायाम केला, कुठेही बाहेर गेले नाही व्यायामासाठी.  



           आता प्रत्येक जण आश्चर्य आणि कौतुक करतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, आता तू लग्ना आधी जशी दाखवण्याच्या कार्यक्रमात दिसत होतीस तशीच दिसायला लागली आहेस. हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं कॉम्प्लिमेंट आहे. आणि याचं सगळं श्रेय फक्त रेश्मा मॅम आणि त्यांच्या टीमला जातं.

   

             ज्या मैत्रिणींना घर,मुलं,नवरा ऑफिस हे सगळं सांभाळून पण वजन कमी करायचं आहे त्यांनी रेश्मा मॅडम ला एकदा तरी जरूर कॉन्टॅक्ट करा.

No comments:

Post a Comment