Wednesday, November 4, 2026

Shripriya Ranade


मी Shripriya Ranade, व्यवसायाने IT Professional. मला Fitness Naturo बद्दल माझ्या एका मैत्रिणीकडून माहिती मिळाली होती. तिने स्वतः हा अनुभव घेतला असल्यामुळे मीसुद्धा एकदा प्रयत्न करून पाहावा, असा विचार केला.


माझे वजन खूप वाढले होते आणि कोणत्याही प्रकारे कमी होत नव्हते. त्यामुळे मनात एक शंका होती की, आता तरी डाएट करून खरंच फायदा होईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला ते नियमितपणे जमेल का?


पण Fitness Naturo चा 15 Kg Weight Loss Plan सुरू केल्यानंतर माझा हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. डाएट खूप सोपा होता, घरच्या जेवणावर आधारित होता आणि वजनातही हळूहळू चांगला फरक जाणवू लागला. त्यामुळे मला आत्मविश्वास आला की हे आपण नक्की करू शकतो!



रेश्मा मॅम यांचे नियमित Follow-ups माझ्यासाठी खूपच Helpful ठरले. प्रत्येक वेळी त्यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत राहिले. त्या केवळ डाएट देत नाहीत, तर एक Fantastic Guide म्हणून प्रत्येक टप्प्यावर आपल्याला साथ देतात.


विशेष म्हणजे, माझ्या Sikkim Trip मध्येही माझे 1.5 Kg वजन कमी झाले! पूर्वी मी स्वतःच म्हणायचे की, जे डाएट आपल्याला पाळता येणार नाही त्यावर पैसे खर्च करण्यात काय अर्थ आहे? पण आज माझा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे.


आता मला पूर्वीपेक्षा खूप जास्त Energetic वाटते. माझे Menstrual Cycles सुद्धा नियमित झाले आहेत. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझे 15 Kg वजन कमी झाले असून मला आता स्वतःला 10 वर्षांनी तरुण असल्यासारखे वाटते. आजूबाजूच्या लोकांकडून मिळणाऱ्या कौतुकाच्या प्रतिक्रिया तर माझा आनंद आणखी वाढवतात!


Fitness Naturo मुळे केवळ माझे वजन कमी झाले नाही, तर माझा आत्मविश्वास, ऊर्जा आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे.


मनापासून धन्यवाद रेश्मा मॅम आणि संपूर्ण Fitness Naturo Team! ❤️



— Shripriya Ranade

IT Professional | 15 Kg Weight Loss Plan

No comments:

Post a Comment