Tuesday, July 23, 2024

Jayesh Dalvi

नमस्कार माझे नाव मैथिली दळवी.. काही दिवसांपूर्वी मी पुल ग्रुप वर रेश्मा मॅम चे reviews पाहिले. ते पाहून माझ्या मिस्टरांसाठी मी त्यांच्याकडे प्लॅन जॉईन केला.. आज सांगताना आनंद होत आहे की अवघ्या 3 महिन्यात माझ्या मिस्टर जयेश दळवी यांचं 15kg #weightloss झालं आहे. तर त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दांत इथे मांडत आहे..



नमस्कार, माझे नाव जयेश दळवी. वय 43. या वर्षाच्या सुरवातीलाच ठरवले की वजन कमी करायचं. बरेच पर्याय बघितले पण कही final होत नव्हते. शेवटी जानेवारी एंड ला माझ्या मिसेस ने पुला ग्रुप मधुन रेश्मा मॅमचा संदर्भ दिला.

नैसर्गिक आणि घरातल्या गोष्टी खावून वजन कामी करू शकतो ही संकल्पना मला आवडली. मूलभूत तपशील दिल्यावर बोलणे झाले आणि डाएट सुरू केले. सुरवातीला एक-दोन आठवडे जिभेवर नियंत्रण करणे खूप अवघड जात होते. रेश्मा मॅम आणि टीम दर आठवड्याला फॉलोअप कॉल आणि मेजरमेंट तपशील घेत होते.

रेश्मा मॅम शी कॉल वर बोलून आत्मविश्वास यायचा की आपण हे करू शकतो. त्यांनी एक गोष्ट सांगितली की weight loss हा मनाचा खेळ आहे. नुसते exercise किंवा भुक मारुन नाही जमणार. आपल्या आहार योजनेचे काटेकोरपणे पालन केले पाहीजे. डाएट प्लॅन वर विश्वास ठेवा, आणि जेवढ सांगितले आहे तसे करा मग पुढचे सगळे ऑटोमेटिक होइल.

मग काय, हळू हळू वजन कमी व्हायला लागल आणि 3 महिन्यातच माझे वजन 84kg वरून 69kg असे टोटल 15kg loss चे टार्गेट पूर्ण झाले. काही वेळा मला कामानिमित्त पुण्याबाहेर जावे लागायचे तेव्हा काय खायचे आणि काय टाळायचे हे रेशमा मॅम नी व्यवस्थित समजावुन सांगितले. रेश्मा मॅम सांगितले ते फॉलो की वजन कमी होते आणि नाही केले की नाही होत हे मला पण समजू लागले.


वजन कमी झाल्याचे आरोग्यविषयक फायदे आपण सर्व जाणतोच पण वैयक्तिकरित्या आम्लपित्त, पाठदुखी खूप कमी झाली. मला माझ्या बायको मैथिली दळवी ला खुप धन्यवाद म्हणायचे आहे. रेश्मा मॅम ने दिशा दाखवली पण माझ्या बायकोशिवाय मी त्या मार्गावर चालु शकलो नसतो.

रेश्मा मॅम,त्यांची टीम आणि माझे वजन कमी करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी या प्रवासात ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचे खूप खूप आभार. आशा आहे की रेश्मा मॅम ने दिलेल्या maintainance tips मध्ये यापुढे हि मी वजन असेच नियंत्रण मध्ये ठेवू शकेन. धन्यवाद

No comments:

Post a Comment