Monday, May 29, 2023

Gauri Kulkarni - Chaudhari


#PULAFridayReview

#SuperPositiveReview

#Weightlossreview

#Reshma_Jadhav

खरं तर या PULA Pune वरचा हा माझा पहिलाच #positivereview आहे. आज हा Review लिहितीये #Nutritionist + #FitnessConsultant + #Fitness coach #ReshmaJadhav मी जवळपास 76 किलो वरून माझं वजन कमी केलय ते 66 पर्यंत. माझं रूटीन तसं खूपच बिझी असतं त्यामुळे कित्येकदा वजन कमी करणं किंवा व्यायाम याबाबत कधीच सिरीयस नव्हते. पण यामुळेच माझं वजन वाढता वाढता इतक वाढलं की त्याचे परिणाम माझ्या शरीरावर व्हायला लागले. रोजची कामं करतानाही प्रचंड त्रास व्हायला लागला होता. छोटी छोटी कामं करतानाही थकायला होत होतं.

याच दरम्यान मी आपल्या PULA Pune गृप वर #weightloss बाबत वेगवेगळे review वाचले. #ReshmaJadhav मॅडम च्या डाएट ने फरक पडलेले अनेक क्लायंट स्वतः इथे review टाकत होते. हे सर्व पाहताना मला जाणीव व्हायला लागली होती हीच वेळ आहे मला माझ्याही #Health बाबत सिरीयसली विचार करून काही पावल उचलण्याची.... जर आता हा निर्णय नाही घेतला तर कदाचीत माझ्या तब्येतीवर अजून भयानक परिणाम होऊ शकतात.

त्या review मधून मी रेश्मा मॅडम चां नंबर घेऊन डाएट प्लॅन कसा असतो मला काय करावं लागेल वगैरे जुजबी माहिती घेतली. सुरुवातीला तर मला शंका होती डाएट वगैरे काही जमेल की नाही कारण यापूर्वी मी ना कधी डाएट केलं होतं ना कोणती exercise. पण Reshma मॅडम सोबत बोलल्यावर त्यांच्या मार्गदर्शनानुसार एकदाचं डाएट आणि exercise सुरू केलीच.

खरं सांगायचं तर माझं वजन कमी होईल आणि मी पुन्हा #slim and #trim दिसेन इतका आत्मविश्वास नव्हता. रेश्मा मॅडम सोबत सुरुवातीला जुजबी बोलणं झालं तेव्हा त्यांच्या बोलण्यातून जाणवलं कोणतीही गोष्ट करण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी, काहितरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते याची धमक गरजेची असते. मी स्वतः ला निक्षुन सांगितले मला हे करायचेच आहे. मला काहीही करून आयुष्यातल हे आव्हान स्वीकारायलाच हवं आणि जिंकालायच हवं. आजवर शिक्षण आणि करियर बाबतीत मी जशी मेहनत घेतली तशी आताही मेहनत घेतली तर हे "कठीण ध्येय्य" साध्य करणे "अशक्य" नक्कीच नाहीय.

पहिल्याच आठवड्यात मला माझ्यात झालेला बदल पाहून विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला. मॅडम कडून #follow_up आणि motivation मिळत गेलं आणि दुसऱ्या बाजूने मी डाएट आणि exercise न चुकता करत राहिले. आज 6 आठवड्यात माझं वजन तब्बल १0 किलोने कमी झाले आहे. माझ्यातला बदल अगदी स्पष्टपणे जाणवायला लागला आहे.

Mam ने अगदी घरगुती साधे diet दिले जे सहज follow होऊ शकेल..... वेगवेगळ्या रेसिपी share केल्या .... घरी करता येतील असे exercise शेअर केले....आणि या सोबत mam guide तर करतच होत्या ..... माझे पहिल्याच week मध्ये 2 kg वजन कमी झाले. ही तर सुरुवात होती पण मला फरक जाणवत होता. आणि सुरुवातीलाच असा result पाहून diet follow करायला आणखी उत्साह आला.

पहिले खूप जण म्हणायचे की weight खूप वाढले आहे कमी कर वगैरे ....... आणि आता कुठेही बाहेर गेले तर सर्वजण म्हणतात की weight खूप कमी झालेलं  दिसतय  ...छान दिसत आहेस आणि हे असे ऐकून खरच खूप छान वाटते.😊 कोणी म्हणण्या आधी मला माझ्यात झालेला बदल पाहून जास्त आनंद होतो.... आता विचार केला की वाटते कशी होते मी आधी आणि आता किती छान दिसत आहे.....आणि आता या weight loss मुळे स्वतः ला आरश्यात पहिले की वाटते किती छान change झाला आहे आणि वाटते की अजून इथले fat कमी झाले तर figure आणखी छान होईल. आणि असे आणखी weight कमी करायला motivation मिळते 

Thank You Reshma मॅडम आणि Team. Weight loss सोबत माझ्या आयुष्यात हा सकारात्मक बदल घडवून आणल्याबद्दल शतश: धन्यवाद....😊🙏🏻❤️

Shweta Shaha

#PulaFridayReview

#PositiveReview

#weightlossreview

माझ नाव श्वेता शहा. आजचा हा #positivereview आहे #Nutrtionist and #Fitnessconsultant @reshmajadhav (Dorke) यांच्यासाठी.

रेश्मा मॅम बद्दल मला पुल ग्रुप वर माहिती मिळाली. त्यांच्यासाठी आलेले खूप सारे रिव्ह्यू वाचून मला थोडी positivity आली. आणि विचार केला की आपणही का नाही ट्राय करावं रेश्मा मॅम कडे weight loss साठी. माझं वजन जवळपास 107 किलो पर्यंत पोहचलं होत आणि त्यामुळे मला पाय दुखायला लागले होते, दम लागायाचा आणि इतर सर्वांमध्ये वावरताना अस वाटायचं की माझ कधी वजन कमी होणार, त्यामुळे मनात अस ठरवल की एकदा रेश्मा मॅम कडे नक्की ट्राय करूया..

आणि finally मी रेश्मा मॅम कडे 15kg weight loss साठीचा प्लॅन घेतला. आणि पहिल्याच 8 दिवसात माझ वजन 2.5kg ने कमी झालं..😍 त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि असा एक confidence पण आला की मी सुद्धा weight loss करू शकेन आणि अस पण वाटल की मी इतके दिवस का वाया घालवले हे सर्व मी रेश्मा मॅम कडे आधीच का नाही ट्राय केलं असा विचार पण मनात आला.

रेश्मा मॅम आणि त्यांच्या टीम कडून प्रतेक फॉलो अप ला मिळणारा रिस्पॉन्स खूप छान आहे. ते अगदी एखाद्या फॅमिली मेंबर ची काळजी घेतात तसे बोलतात आपल्याशी, त्या आपली प्रतेक अडचण समजून घेतात त्यामुळे अस कधीही दडपण येत नाही मनावर की एखाद्या आठवड्यात डाएट फॉलो नाही झालं आणि रिझल्ट नाही दिसला तर मॅमला काय फॉलो अप द्यायचा..

आता माझ 3 महिन्यात 15kg वजन कमी झाल्याने माझा confidence खुप वाढला आहे, मला अजूनही वजन कमी करण्याची गरज आहे त्यासाठी सेकंड इंनिग साठी मी पुन्हा एकदा रेश्मा मॅम कडे जॉईन झाले आहे. आणि अजूनही मी त्यांच्या मार्गद्शनाखाली खूप weight कमी करू शकते याचा खूप confidence आला आहे, आणि आता जे 15kg लॉस झालं आहे त्याचाही आनंद वेगळाच आहे..❤️✌🏻




रेश्मा मॅम बद्दल सांगायचं तर त्या खूपच friendly आहेत, आपला प्रतेक प्रोब्लेम त्या समजून घेतात आणि त्यानुसार त्या आपल्याला गाईड करतात, एकतर बोलताना पण त्या खूप नॉर्मल असतात तुम्ही हेच करा तेच करा असा कधीही त्या आग्रह करत नाहीत.. आपल्याला जे suitable आहे ते त्या सांगतात, त्यामुळे अगदी सहज डाएट फॉलो केलं जात.. मला तर अस वाटतच नाहीये की मी मागचे 3-4 महिने डाएट करून वजन कमी केलं आहे, नॉर्मल रूटीन मध्ये राहूनच वजन कमी केलंय अस वाटत.. त्यामुळे रेश्मा मॅम ची मी खूप आभारी आहे त्यांनी मला एखद्या लहान बहिणी सारखं समजून घेतल आणि consider केलं.

जेव्हा डाएट सुरू केलं तेव्हा सुरवातीला मी कोणाला काही सांगितल नव्हत कारण पूर्वीचे वजन कमी करण्याचे अनुभव काही फार चांगले नव्हते. पण जस जस माझ्यात बदल दिसायला लागला तस तस फॅमिली मध्ये पण सर्वना लक्षात यायला लागलं आणि त्यांनाही कळालं की ही जे काही करतेय ते बरोबर करतेय आणि आता तर 15kg नंतर सर्वांना हे दिसून येतंय आणि मलाही जाणवत आहे की घेतलेले efforts हे बरोबर दिशेला गेले आहेत.

डाएट सुरू करण्यापूर्वी मला uric acid चा प्रोब्लेम होता, त्यामुळे मला पायामध्ये जॉइंट पैन खूप होत होतं, पायाला खूप जास्त सूज होती, walking केलं की पाय खूप दुखायचे.. रेश्मा मॅम ने हे सर्व consider करून मला डाएट दिलं होत, ज्यामुळे माझ वजन तर कमी झालच पण आता मी 50 min वॉक केलं तरीही माझे पाय दुखत नाहीत, जॉइंट पेन पण खूप कमी झालंय, कमरे मधील पेन पण खूप कमी झालय.

सुरू करण्याआधी मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता पण आता 15kg कमी झाल्यावर पुढचे 15kg कमी करायला मला अजिबात टेंशन येत नाही, मी अगदी सहजपणे हेही 15kg कमी करू शकेन अशी खात्री आता वाटतेय.. आणि हा माझ्या आधीच्या आणि आताच्या confidence मधला फरक माझ्या चेहऱ्यावर पण दिसून येतो आहे त्यामुळे मी स्वतः पण खूप खुश आहे आता.. त्यामुळे Thank you Reshma mam, Thank you so much for your team and Reshma mam too🥰🥳✌🏻🙏🏻



Dhiraj Loke



नमस्कार धिरज विजय लोके माझा Fitness Naturo सोबतचा #Weight #Gain बाबतचा #Review इथे मांडतोय..

बऱ्याच तरुणांना २०-२५ या वयाच्या टप्प्यात एक नशा असते बॉडी बनविण्याची आणि त्यासाठि वाट्टेल ते प्रयत्न करण्याची तयारी असते, त्यापैकी मी ही एक... २०१२-१३ च्या दरम्यान gym च प्रचंड वेड आणि बॉडी बनवायची खुमखुमी आणि त्यासाठि प्रोटीन पावडर सारखे शॉर्टकट वापरायचीही तयारी होती. काहीवेळा ते वापरले सुद्धा पण हवा तसा फरक पडत नव्हता... Gym मध्ये कितीही प्रयत्न केले आणि जेवण खाण कितीही बदललं तरी अगदी जास्तीत जास्त ६२-६३ च्या पुढे वजन कधी गेलं नाही.. हळूहळू gym सुटली आणि त्यासोबत ते खाण पिणं सुद्धा... मध्ये बराच काळ गेला नोकरी, व्यवसाय याच्या धावपळीत पुन्हा वजन ५७ वर येऊन पोचल होतं..

या दरम्यान फेसबुक वरून रेशमा Weight Loss/ Weight Gain प्रोग्राम बाबत कळलं... तशी आमची त्यापूर्वीची जुजबी ओळख होती त्यामुळे सर्व प्रोसेस समजून घेणं अजून सोप्पं झालं.. माझ्या उंची आणि वय याच्या मानाने BMR नुसार किमान ७०च्या आसपास वजन हवेच होते. माझा धावपळीचा दिनक्रम आणि त्यात सकस आहाराचा डाएट बसविणे खर तर चॅलेंज च होतं... पण रेशमा ने हे चॅलेंज घेतलंच.

माझ्या सकाळीं उठण्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत च्या पुर्ण दिनक्रमाचां नीट अभ्यास करून तिने माझ्यासाठी एक परफेक्ट डाएट प्लॅन दिला दिला. मला हे सर्व जमेल इतका confidence होता पण किती दिवसांत फरक पडेल याबाबत मी साशंक होतो. रेश्मा ने सांगितल्याप्रमाणे मी आठवडाभर डाएट केलं.. या आठवड्याभरात बऱ्याचदा वजन करून पहायची इच्छा झाली पण स्वतः ला आवरलं... आणि आठ दिवसांनी वजन केलं तर माझ्या डोळ्यासमोर अक्षरशः तारे चमकले. एका आठवड्यात तब्बल ९ किलोने वजन वाढल होतं.

Gym ला जायचो तेव्हा एक दोन किलो वजन वाढलं की नुसता gym च्या आरश्यात स्वतःला ला कौतुकाने निरखत बसायचो... आणि इथे कोणत्याही gym शिवाय अवघ्या Strict Diet वर आठवड्यात आठ किलो वजन वाढवलं होतं... वजन काट्यावर किमान चार पाच वेळा तरी उभ राहून चेक केलं नक्की काही चुकत नाहीय ना माझं. लगेच फोटो काढून रेशमा ला पाठवला.. तिलाही तो इतक्या कमी दिवसांत आलेला रिझल्ट पाहून आश्चर्य वाटलं..

पुढच्या आठड्यापासून डाएट मध्ये थोडे बदल करून पुन्हा चालु केलं कारण टार्गेट ७०-७१ च्या पुढे न जाउ देणं होत. आणि माझं तर अवघ्या आठ दिवसांत ५७ वरून ६६ वर वजन आलं होतं... त्यानंतरच्या आठ दिवसांच्या अगोदरच माझं ७१ च टार्गेट पूर्ण होऊन ७२ वर वजन गेलं... अवघ्या १५ दिवसांत ५७ वरून ७२ म्हणजे १५ किलो वजन वाढवलं होतं.. आणि हे सर्व शक्य झालं ते फक्त रोजच्या वापरातील पदार्थ खाऊन. कोणतेही महागडे पदार्थ किंवा प्रोटीन, steroids न वापरता हा रिझल्ट आला होत. फक्तं रोजच दिनक्रम लक्षात घेऊन सहज उपलब्ध होतील अस जेवण आणि नाश्ता याच गोष्टींवर हा रिझल्ट येणं हे माझ्यासाठीही नवलच होतं. पुढे हे वाढलेल वजन फक्त ७० ते ७१ मध्ये maintained ठेवायचं होतं त्यामुळे strict Diet बंद करून नाश्ता जेवण बाबतच्या साध्या सोप्या टीप्स दिल्या..


आज या गोष्टीला जवळपास ३ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय पण अजूनही ६९ ते ७१ या लाईन च्या बाहेर वजन जात नाही. आणि खरतर या सर्वात माझी मेहनत फक्त त्या आठ दिवसांचीच होती पण त्यासाठी लागणारा अभ्यासपूर्ण डाएट आणि त्यानंतर च्या टीप्स मला कायम उपयोगी पडत आल्या आहेत.


या सर्व प्रवासात एक उल्लेखनीय बदल माझ्यात झाला जो मला आयुष्यभर उपयोगी पडणारा होता. हे डायट सुरू करण्याआगोदर मी दिवसातून किमान १०-१२ कप कधी कधी तर १५ कपच्या आसपास चहा प्यायचो आणि त्यांचे परीणाम भूक कमी लागणे यात दिसत होते. पण त्या १५ दिवसांच्या डाएट नंतर माझी ही वर्षानुवर्षे असलेली चहा ची सवय पूर्णपणे बंद झाली. त्या नंतर मी आजवर फारतर दोन अगदीच जास्त झाल्या तर तीन ते चार कप चहा घेतो. पुर्वी अर्ध्या पाऊण तासात चहा मिळाला नाही की डोकं दुखायच, चिडचिड व्हायची पण आता चहा प्यायलाच हवी अशी इच्छाही होत नाही. माझ्यातला हा बदल जितका सुखावह होता तितकाच आरोग्याच्या दृष्टिने खूप महत्वाचा होता. १ जानेवारी च्या सकाळीं सुरू झालेले चहा सोडण्याचे माझे कितीतरी संकल्प "दिड दिवसांत" विसर्जित झाले होते. पण या Diet मुळे ही सवय इतक्या सहजपणे सुटली की पूर्वी "दिवसभर चहाचच नावं घेणारा" मी सध्या "नावाला चहा" घेतो. याच पूर्ण श्रेय रेश्मा ला जातं.
 
तीन वर्षांपुर्वी माझ्यात अचानक झालेला बदल पाहून बऱ्याच जणांनी मला त्याच कारण विचारल त्यावर मी फक्त Diet असं उत्तर द्यायचो. माझ्या एका फेसबुक फ्रेंड ने रेशमा ने पोस्ट केलेल्या फोटो चां screen shot पाठवून विचारल की तुझ्या फोटो चां missuse होतोय का?? तेंव्हा मला समजून सांगावं लागलं की दोन्हीं फोटोतला तो मीच आहे. आणि यासाठी मी रेश्मा च्या #Fitness #Naturo कडून डाएट घेतोय. पण बऱ्याच जणांना प्रश्न पडायचां बारीक माणसाला कसलं डाएट.. पण खरतर डाएट म्हणजे फक्त वजन कमी करणाऱ्याची गरज नसते...तर एक healthy आयुष्य जगण्याचा तो एक मार्ग असतो..Diet खरतर गरज म्हणून नाही तर सवय म्हणून follow करायला हवं. वजन वाढलं किंवा डॉ. ने इशारा दिला म्हणून डाएट करण्यापेक्षा #Diet आपल्या दिनचर्येचा भाग असायला हवा.

वजन कमी असणं किंवा जास्त असणं दोन्ही धोकादायक. हेचं वजन कस maintained ठेवायचं हे काम एक तज्ञ Nutritionist किंवा Dietitian च योग्य पद्धतीने करू शकतो.. आणि Fitness Naturo च्या माध्यमातून रेशमा हे काम फार जबरदस्त पद्धतीने करतेय यात शंकाच नाही. आज तीच्या इतर क्लायंट चे #Weight #Loss चे result पाहून बर वाटतं. प्रत्येकाने एक निरोगी व सुदृढ आयुष्य जगावं यासाठी ती Fitness Naturo च्या माध्यमातून जे प्रयत्न करतेय त्याला हॅट्स ऑफ... अशीच यशस्वी हो आणि तुझा Fitness चां उप्रकम जगभर पोहोचव...

Best Of Luck... Reshma

Tuesday, May 9, 2023

Dipali Patil

मी सौ. दिपाली योगेश पाटील. राहणार सांगली. हा #positivereview #Dietitian आणि #Nutritionist Reshma Jadhav (Dorke) मॅडम यांच्यासाठी आहे. रेश्मा मॅडम साठीचे खूप सारे रिव्ह्यू मी फेसबुक ला पहात होते, त्यांच्यमुळे खूप साऱ्या लोकांचे वजन कोणत्याही suppliment, powder आणि टॅबलेट , शेक न वापरता फक्त घरच्या जेवणातील डाएट प्लॅन मधून आणि घरगुती exercise मधून होत आहे हे पाहून मलाही त्यांना contact करावासा वाटला म्हणून मी त्यांचा नंबर सेव्ह केला, त्यांच्या एवढ्या सर्व clients चे रिझल्ट पाहून माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला, म्हणून मग मी पण त्यांच्याकडे मोठ्या आशेने जॉइंन केलं आणि माझी weight loss journey सुरू झाली..

त्यांच्याकडे जॉईन केलं तेव्हा मांझ वजन 72किलो होत, त्यामुळे मला BP चा त्रास सुरू झाला होता, धाप लागणे , गुडघे दुखणे अशा सर्व समस्या होत्या.. पण रेश्मा मॅडम कडे जॉईन केलं आणि पहिल्याच आठवड्यात माझ वजन 3kg ने कमी झालं..😍 मी खूप खुश झाले त्यामुळे आणि एवढा चांगला result पाहून माझा आत्मविश्वास अजूनच वाढला.. आणि आता मी माझ 15kg च टार्गेट मी लवकरच पूर्ण करू शकेन याची मला खात्री झाली.. प्रत्येक 8 दिवसांनी मॅडम फॉलो अप घेत होत्या वेळोवेळी डाएट मध्ये काय काय सुधारणा केली पाहिजे हे सांगत होत्या.. त्यामुळे आज जवळपास 12 आठवड्यात माझ वजन 72kg वरून 58kg वर आल आहे..😊



आता वजन कमी झाल्यावर मला खूपच छान वाटत आहे. समाजात वावरताना माझा confidence वाढला आहे ... माझा बीपी चां गोळी चां डोस कमी झाला आहे, आता मी खूप वेगाने सतत एक तास चालू शकते , चालताना धाप लागन बंद झालं आहे.. रेश्मा mam खूपच सपोर्ट करतात, वेळोवेळी मार्गदर्शन करतात..

मागच्याच आठड्यात एका लग्नाला गेले होते तेव्हा इतर बघणाऱ्याना माझ्याकडे पाहून खूप आश्चर्य वाटल.. 13 वर्षापूर्वी माझ्या स्वतःचा लग्नात त्यांनी मला शेवटचं बारीक पाहिलं होत.. त्यानंतर 2 मुलांच्या डिलिव्हरी नंतर कोणीही मला इतकं बारीक झालेलं पाहिलं नव्हत.. आता तब्बल 13 वर्षांनी पुन्हा एकदा माझी तब्बेत पूर्वी जशी होती तशी झाली असे सर्व म्हणत होते.. त्यामुळे मला खूप छान वाटल आणि स्वतःला आरशात पाहून ही खूप छान वाटत आता..❤️

मी पूर्वी स्वतः माझ्या मनाने वजन कमी होण्यासाठी उपाशी राहून जेवण कमी करून प्रयत्न केले, पण आता मला समजल की योग्य पद्धतीने वजन कमी करण्यासाठी योग्य आहार विहार आणि व्यायमाची तसेच रेश्मा मॅडम सारख्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे..

माझ्यात झालेल्या या बदलासाठी आणि मला माझी पूर्वीची मी शी पुन्हा एकदा ओळख करून देण्यासाठी रेश्मा मॅडम चे मी खूप खूप आभार मानते.. Thank you so much Reshma mam..❤️❤️❤️


Thursday, May 4, 2023

Archana kedge

My weight loss journey.
Time period- 5weeks
21/9/2021 - 2/10/2021
Total weight loss- 6 kgs.

Dear Reshma,
I am so glad to write this review about you as my dietitian. I saw your post on pula and started this weight loss journey with you. Earlier I had tried so many diets with different dietitians but nothing worked for me. Honestly I was more convinced by seeing your 20 kg weight loss and your before after pictures. Your photos were so mesmerizing that I couldn't believe you are 36 years old and have 13 year old son.

By seeing your pictures I got so inspired by you, I followed all the diet given by you very sincerely for 5 weeks and lost 6kgs very easily. Though it was a high protein diet the quantity was so filling that I never felt hungry and the best part was coffee and tea were allowed.

With your diet I saw rapid results from the very first week. With your diet and simple exercises I could lose my weight. In diwali i couldn't follow the diet though my weight didn't increase. My experience with you has been great.

Thank you for motivating me. My journey has not stopped yet. So will continue until I reach my goal. Regards ❤️
Archna kedge



Sonal Gambare


नमस्कार मैत्रिणींनो ..🙏

मी सोनल गांबरे. मूळची पुण्यातली आणि लग्न होऊन गेली 10 वर्ष मुंबईत राहत आहे. आज मी इथे येऊन आवर्जून लिहिण्याच कारण म्हणजे मला माझा अनुभव तुम्हा सर्वासोबत share करण्याची इच्छा आहे. आणि याला कोणताही review म्हणून वाचू नका, माझा अनुभव आणि #ReshmaJadhav मॅम सोबत माझा अजूनही चालू असलेला प्रवास आणि त्यांच्याप्रति माझी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हे लिहत आहे.. माझ्या लग्नाच्या वेळी माझं वजन 55 किलो होत. त्यानंतर पहिल्याच pregnancy मध्ये ते खूप वाढलं, आणि त्यातल्या त्यात pregnancy मध्ये पोट नॉर्मल इतर प्रेग्नन्ट ladies पेक्षा खुपच जास्त होत, मला वाटलं होत ही Temperory Phase आहे, डिलीव्हरी झाल्यावर येईल पुन्हा नॉर्मलला, पण डिलीव्हरी झाल्यानंतर सुद्धा ते पोट अर्धा इंच पण कमी झालं नाही. डॉ ही म्हणाले की जस इतरांच डिलीव्हरी झाल्यावर पोट बऱयापैकी रेगुलर येत तसा तुमच्याबाबतीत दिसत नाही, त्यामुळे ते आता सहज कमी होणार नाही, त्यासाठी प्रयत्न करूनच professionals ची मदत घेऊन तुम्हला ते कमी कराव लागेल. त्यावेळी माझं बाळ छोटं होत, पण पोटामुळे मला त्याला उचलून घेता येत नव्हतं, दूध पाजायला त्रास होत होता, मी बसले तर मला उठवत नव्हतं, वाकून करायची कामं डिलीव्हरी झाली तरी जमत नव्हत्या, आणि बाळ छोट असल्याने मी डाएट पण करू शकत नव्हते, त्यामुळे त्याच पोटाने मी पुढची 5-6 वर्ष काढली . कोणत्याही समारंभात गेले तर सर्वाना वाटायचं मी पुन्हा एकदा गरोदर आहे, आणि पहिल्याच डिलीव्हरीच पोट अजून कमी नाही झालं तर लोक आश्चर्य व्यक्त करत होते. आणि नंतर नंतर नावं ठेवायला लागले, शेजारच्या काही बायका समोर दिसली, चार लोकांत पण सरळ सरळ सतत बोलायच्या, काय ते पोट, गरोदर असल्यासारखं वाटतय, कमी करा ते या सर्व सततच्या टोमण्यांना मी वैतागले होते, depression मध्ये गेले होते, मलाही वाटत होतं की कदाचित आता माझं पोट पुन्हा पाहिल्यासारखं कधीच होणार नाही, वेगवेगळे dietitian +fitness consultant पाहिले पण फरक काही पडला नव्हता.या मध्ये मी एकदा oriflame चे #Weight #Loss Product घेतले होते पण त्यानें वजनात अजिबात फरक पडला नाही त्यामुळे मी अजून निराश झाली होते. त्यातच एकदा #ReshmaJadhav मॅम चा कॉन्टॅक्ट नंबर fb वरून मिळाला, त्याना फॉलो करू लागले, त्यांचे result खरोखरच खूप छान होते, पण तरीही मला माझं वजन अस कमी होईल हा विश्वास नव्हता. आणि मुळात मला त्यांच्यावर पण विश्वास नव्हता, कारण कोणतेही #Protein, #Herbal, #Ayurvedic Powders न वापरता फक्त #Exercise + #NaturalSourceOfDietPlan ने असे result दिसतील, आंतही एवढ्या कमी वेळात अस खरोखरच वाटलं नव्हतं. म्हणून मी जवळपास 7-8 महिने फक्त त्यांची चौकशीच करत होते, इतकी चौकशी केली की शेवटी मी ज्यांना result आला त्यांचे नंबर द्या म्हणाले, त्या इतर clients नि स्वतःच्या हातानी त्यांच्यासाठी #review लिहिले होते, तरी मी ही मागणी केली.. पण आता माझ्या लक्षात येतय की ही मागणी किती चुकीची होती, कारण clients च्या Privacy Policy नुसार त्यांचे नंबर share करता येत नाहीत, हे मला आता लक्षात आलं आहे, जेव्हा मला result आला आणि आता माझा नंबर इतर लोक त्याना मागत आहेत, आणि जर मॅम ने तो दिला तर मला माझी इतर कामं सोडून मला त्यांच्याशीच बोलत बसावं लागेल, आणि हे प्रॅक्टिकली शक्य नाही, हे मला आता स्वतः अनुभव घेऊन कळून चुकलं आहे, म्हणून याचाही उल्लेख मी आवर्जून या अनुभवात करत आहे.

तर finally मी त्यांचा प्लॅन घेतला, आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणे Diet + Exercise सुरू केले, तरीही मला संशय होता की माझ्या केसमध्ये याचा कितपत फरक पडणार आहे. पण तरीही मी मनापासून आणि त्यांनी सांगितलं तस Strictly Diet +Exercise सुरू केलं.. आणि पहिल्याच आठवड्यात माझं वजन 3 किलो ने कमी झालं 😮, माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, मी पुन्हा पुन्हा वजन करून पहात होते, पण तरीही ते 3kg loss असच दाखवत होते, अवघ्या 8 दिवसात वजनात एवढा फरक पडला म्हणून मला जरा आशा वाटली आणि मी खुप खुश झाले , आणि अजून जोमाने Diet + Exercise सुरू केलं. प्रत्येक 8-8 दिवसानी न चुकता मॅम माझा फॉलो अप घेत होत्या, आणि बघता बघता #3 महिन्यात माझं वजन जवळपास #15किलो ने कमी झालं. आणि पोटाचा घेर अर्ध्यापेक्षाही कमी झाला. एवढं वजन कमी झाल्यावर आता सगळीकडे कौतुक सुरू झालं, ज्या बायका आतापर्यंत टोमणे देत होत्या त्या आता म्हणू लागल्या बास आता अजून किती बारीक होणार?😅.. सगळीकडे होत असलेल कौतुक पाहून मी सुखावून गेले, आणि मॅम ला न सांगताच मी #Diet and #Exercise ब्रेक केलं. पण तरीही त्या प्रत्येक 8 दिवसाला मला फॉलो अप साठी कॉन्टॅक्ट करतच राहिल्या, कारण माझं टार्गेट अजूनही पूर्ण झालं नव्हतं. पण लोकांच्या बोलण्यात मी पुन्हा एकदा आले आणि सर्व सोडून बसले, शेवटी मॅम ने वाट पाहून पाहून एकदाच मला फोन केला आणि जरा सुनावलं, कारण माझं पोट पूर्णपणे फ्लॅट झालं नव्हतं, आणि ते कमी करण कसं गरजेचं आहे हे समजावून दिलं, आणि त्यासाठी पुन्हा motivation ही दिलं, त्यांच्या या फोन मुळे मला माझी चूक कळली आणि पुन्हा #motivation ही मिळालं, आणि आता पुन्हा एकदा मी diet+exercise सूरु केलं.


Note: या ब्रेकमधल्या एक महिन्यात माझं वजन फक्त अर्धा किलो ने वाढलं, आणि दुर्लक्ष झाल तर अजून वाढू शकेल अस मॅम ने मला सांगितलं.

अशा प्रकारे माझं वजन #11Weeks मध्ये #19किलो ने कमी झालं. पूर्वी ते #85kg होत आणि आता ते #66kg आहे. पण माझ्या मधल्या सुट्ट्या आणि ब्रेक मध्ये या प्रोसेस ला टोटल 4महिने गेले. आज माझा पोटाचा घेर #38in वरून #30in वर आला आहे, आणि कमरेचा घेर #48in वरून #39in वर आलेला आहे. म्हणजे जवळपास 9in ते 10in चा फरक झाला आहे, पण यावर रेश्मा मॅम अजूनही समाधानी नाहीत, त्याना माझं लग्नच्या वेळी जे 55 किलो वजन होत तिथपर्यंत मला आणायच आहे. पण तरीही मी हा अनुभव मांडला , आणि टार्गेट पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा तुम्हा सर्वना इंफॉर्म करेन. 😊🙏





Deepali Bhatlavande

खरं तर या PULA Pune वरचा हा माझा पहिलाच #positivereview आहे. मी जवळपास ८१ किलो वरून माझं वजन कमी केलय ते ७० पर्यंत. माझं रूटीन तसं खूपच बिझी असतं त्यामुळे कित्येकदा वजन कमी करणं किंवा व्यायामबाबत कधीच सिरीयस नव्हते. पण यामुळेच माझं वजन वाढता वाढता इतक वाढलं की त्याचे परिणाम माझ्या शरीरावर व्हायला लागले. अगदी थोडं फास्ट चालतानाही मला त्रास व्हायला लागला होता. रोजची कामं करतानाही प्रचंड त्रास व्हायला लागला होता. छोटी छोटी कामं करतानाही थकायला होत होतं.


याच दरम्यान मी आपल्या PULA Pune गृप वर #weightloss बाबत वेगवेगळे review वाचले. #ReshmaJadhav मॅडम च्या डाएट ने फरक पडलेले अनेक क्लायंट स्वतः इथे review टाकत होते. हे सर्व पाहताना मला जाणीव व्हायला लागली होती हीच वेळ आहे मला माझ्याही #Health बाबत सिरीयसली विचार करून काही पावल उचलण्याची.... जर आता हा निर्णय नाही घेतला तर कदाचीत माझ्या तब्येतीवर अजून भयानक परिणाम होऊ शकतात.

त्या review मधून मी रेश्मा मॅडम चां नंबर घेऊन डाएट प्लॅन कसा असतो मला काय करावं लागेल वगैरे जुजबी माहिती घेतली. सुरुवातीला तर मला शंका होती डाएट वगैरे काही जमेल की नाही कारण यापूर्वी मी ना कधी डाएट केलं होतं ना कोणती exercise. पण Reshma मॅडम सोबत बोलल्यावर त्यांच्या मार्गदर्शनानुसार एकदाचं डाएट आणि exercise सुरू केलीच. पहिल्याच आठवड्यात मला माझ्यात झालेला बदल पाहून विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला. मॅडम कडून #follow_up आणि motivation मिळत गेलं आणि दुसऱ्या बाजूने मी डाएट आणि exercise न चुकता करत राहिले. आज ७ आठवड्यात माझं वजन तब्बल ११ किलोने कमी झाले आहे. माझ्यातला बदल अगदी स्पष्टपणे जाणवायला लागला आहे. Weightloss मुळे माझ्या शरिराप्रमाने मनानेही मला उत्साही वाटायला लागलं आहे. Thank You Reshma मॅडम आणि Team. Weight loss सोबत माझ्या आयुष्यात हा सकारात्मक बदल घडवून आणल्याबद्दल शतश: धन्यवाद....😊🙏🏻❤️
Deepali Bhatlavande


Neha Kane

This special review goes to Reshma Jadhav who guided, helped and motivated me to lose all the post partum weight. I was depressed and was not even enjoying motherhood. I had developed inferiority complex. I didn't feel like dressing up or even going to places.

I had consulted atleast 4 dieticians before her and in my 1st call itself i felt very demotivated. Somehow didnt get the vibe. Some told me 8 meals a day funda and i waa like i am a new mom that too working. this is not possible for me. Some told me things like you cant lose more than 2 kgs a month. But when i called Reshma she was so kind and humble to speak with. she was very encouarging and positive. I decided to give it a try. Within the 1st week i lost 2 kgs. i felt very encouraged.
I continued with the diet and within a month people around me started to notice the change. i was showered with compliments like you look like a college going girl, you dont look like a mother of a kid. I was fitting into my pre pregnancy clothes. Her diet is simple to follow and easy to adapt. She is ever so approachable and always available to solve queries and to simply pep you up. Even if you want to eat out or go for an event she guides you thoroughly on do's and dont's. Her workouts are also very simple to follow and doable too. I completed my milestone in a span of 2.5 months. that is I lost 15 kilos in 2.5 months. Not only has Reshma helped me with weight loss but my skin and hair also look healthier. i feel lighter and more active. My confidence had gone to a different level. I highly recommend her as i have seen the change in me. I cant wait to start my next milestone with her.👍


आजचा हा खास #Review रेश्मा जाधव यांच्यासाठी आहे ज्यांनी मला प्रसूतीनंतर #Weightloss करण्यासाठी मार्गदर्शन, मदत आणि प्रेरणा दिली. या वाढत्या वजनाने मी पूर्णपणे नैराश्यात होते अगदी माझं मातृत्वसुखही अनुभवण विसरून गेले होते. माझ्यात एक प्रकारचा न्यूनगंड आला होता, इथवर की मला चांगले कपडे परिधान करणे किंवा इतर कुठल्या ठिकाणी जाणंही मला नकोसं वाटायला लागलं होतं.

रेश्मा मॅडम आगोदर मी किमान ४ Dietition कडून सल्ला घेतला. पण का कुणास ठावूक मला इतरांच्या अगदी पहिल्या कॉल पासूनच एक नकारात्मकता जाणवत होती. फार काही चांगली अनुभूती येत नव्हती. काहींनी मला दिवसात ८ वेळा जेवणाचा फंडा सुचवला पण मी एका तान्ह्या मुलाची आई आणि त्यात नोकरी सुद्धा करते त्यामुळे हे फंडे मला फारसे परवाडणारे नव्हते. काहींनी तर असेही सांगितले की एका महिन्यात "दोन किलोंपेक्षा जास्त" वजन कमी करतातच येणार नाही.

मी जेव्हा रेश्मा जाधव यांना कॉल केला तेव्हा त्यांच्या बोलण्यात एक वेगळ्या प्रकारचा आपलेपणा आणि नम्रता जाणवली (कदाचित या अगोदरच्या इतर डाएटिशियन सोबत च्या कॉल मध्ये ही जाणीव होत नव्हती). त्या कायमच प्रोत्साहित करणाऱ्या आणि सकारात्मक जाणवतात. सरतेशेवटी मी त्यांच डाएट प्लॅन वापरून पहायचं ठरवलं. अगदी पहिल्याच आठवड्यात तब्बल २ किलो वजन कमी झालं. या गोष्टीने मला अजून प्रोत्साहित केले. मी डाएट सुरू ठेवले आणि अगदी एका महिन्यातच माझ्या सभोवतालच्या लोकांना माझ्यातला बदल जाणवू लागला. तू एखाद्या #कॉलेजतरुणी सारखी वाटतेस, तू एका मुलाची आई असशील असं अजिबात वाटतच नाही आशयाच्या compliments वारंवार मिळायला लागल्या होत्या. गरोदरपणाच्या अगोदरचे कपडे जे मला डिलिव्हरी नंतर अजिबातच बसत नव्हते, ते मला आता छान बसू लागले होते. रेश्मा मॅडम च डाएट Follow करायला अगदी सोपे आहे आणि आपल्या रोजच्या जीवनात अगदी चपखल बसणारे होते (पूर्वीच्या डाएटिशियन ने अमुक हे अमुक अमुक वेळी वगैरे ज्या अटी ठेवल्या त्या रोजच्या आयुष्यात Follow करन कठीण जातं तसं रेश्मा मॅडम बाबत काही नव्हतं). त्या नेहमी कोणताही आडपडदा न ठेवता अगदी आपलेपणाने तुमच्या शंकाच समाधान करण्यासाठी तत्पर असतात. एखाद्या दिवशी तुम्हाला बाहेर काही खायचे असेल किंवा एखाद्या समारंभासाठी जायचं असेल तरी त्यावेळी छोट्या छोट्या गोष्टी ज्या केल्या पाहिजेत आणि टाळल्या पाहिजेत यावर सुद्धा त्या मार्गदर्शन करतात. त्यांचे व्यायामप्रकार हे अगदीच सोप्पे आणि सहज शक्य असे असतात. मी माझं टार्गेट अवघ्या अडीच महिन्यांच्या कालावधीतच पूर्ण केले. या अडीच महिन्यात माझं तब्बल #15_किलो वजन कमी झालं. रेश्मा मॅडम च्या डाएट ने माझं नुसत वजन कमी नाही झालं तर माझ्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज आणि केसांना मजबुती जाणवायला लागली आहे. आता मला पूर्वीपेक्षा खुप हलकं आणि ताजतवान असल्यासारखं वाटतं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला की माझ्या आत्मविश्वासात कमालीचा बदल झालाय. माझ्यात झालेला हा सर्वांगीण बदल पाहता मी रेश्मा मॅडम चे डाएट नक्कीच suggest करेन. या १५ किलो चे प्लॅन यशस्वीपणे पूर्ण केल्यावर आता मी थांबणार नाहीय लवकरच त्यांच्यासोबतच मी दुसरा डाएट प्लॅन टार्गेट सुरू करतेय....👍🏻
Neha Kane 



Wednesday, May 3, 2023

Madhura Rasal

हॅलो.. मी मधुरा रसाळ. फक्त 18 वयातच माझे वजन 80 चा काटा ओलांडणार होते. या वाढत्या वजनामुळे खूप tension अले होते .....जेव्हा माझे periods सुरू झाले त्या नंतर माझे वजन वाढत गेले पण मागच्या 1 वर्षात वजन खूपच जास्त वाढले...मला pcod असल्यामुळे weight वाढत आहे असे माझे family doctor म्हणाले....मी स्वतःहून weight कमी करण्याचा खूप प्रयत्न केला.... कोणालातरी विचारून वा youtube वरचे व्हिडिओ, diet पाहुन.. पण सातत्य ठेवायला नाही जमायचं...त्याने वजन काही कमी झाले नाही ...

या वर्षी जेव्हा मी exams नंतर घरी आले तेव्हा मम्मी ने मला रेशमा मॅडम च्या fitness naturo बद्दल माहिती दाखवली... मम्मीच्या 1 friend ने मॅडम च्या मदतीने weight कमी केले होते.... ते पहिल्यानंतर वाटले की आत्ताच वेळ आहे करूया वजन कमी.... एवढे पैसे घालवावे का नाही असे वाटत होते पण weight कमी करने जास्ती महत्त्वाच होते....आणि जेव्हा mam च्या clients चे status वर result पाहिले तेव्हा फिक्स केले fitness naturo la .... आणि अशी माझी weightloss journey सुरू झाली .....

Mam ने अगदी घरगुती साधे diet दिले जे सहज follow होऊ शकेल..... वेगळ्या वेगळ्या रेसिपी share केल्या .... घरी करता येतील असे exercise शेअर केले....आणि या सोबत mam guide तर करतच होत्या ..... माझे पहिल्याच week मध्ये 2 kg वजन कमी झाले. ही तर सुरुवात होती पण मला फरक जाणवत होता. आणि सुरुवातीलाच असा result पाहून diet follow करायला आणखी उत्साह आला.
Fitness naturo प्रत्येक week मधे follow up घेत असल्याने motivation कमी नाही व्हायचे. कोणत्याही शंका असतील तर त्या 1 call किंवा message केला तरी दूर व्हायच्या.

रेशमा mam चे बोलणे फार प्रोत्साहन देणारे असायचे... कधीही न ओरडता नेहमी समजाऊन सांगायच्या. मी mam ना एखादी गोष्ट खाऊ नाही वाटतं आहे आता तर त्यांनी लगेच मला इतर 4..5 option दिले. एवढे 16kg mi फक्त रेशमा mam chya मार्गद्शनामुळेच करू शकले आहे... Mam ने दिलेल्या diet मुळे weight तर कामी झालेच पण सोबत skin glow करू लागली ....confidence सुद्धा वाढला. Mam कायम call केला की म्हणायच्या tension घेऊ नको होईल weight कमी त्यामुळे अगदी relax वाटायचे. ते ऐकून छान वाटायचं.

Diet सुरू केल्या नंतर weight छान कमी होत होते पण दरम्यानच्या काळात kidney stone चा त्रास झाला जो मला पूर्वीपासूनच थोडा होता. त्या 2 week मध्ये weight कमी नाही झाले...... पण रेशमा mam ने तेव्हा पण छान guide केले..... Kidney stone मुळे diet मध्ये देखील बदल करून दिले. त्यामुळे काही अवघड वाटले नाही .... आणि जेव्हा mam च्या clients चे result status वर पाहायचे तेव्हा असा वाटायचे की हे सर्व जण 30..40 किलो कमी करू शकतात तर मला पण 15 किलो कमी करने अवघड नाहीये. आणि आता 16kg 13week मध्ये कमी केले हे पाहून मला खूप आनंद होत आहे.... विशेष म्हणजे जेव्हा mam म्हणाल्या की follow up photo मधला dress loose होत आहे एखादा tight dress घालून फोटो send करा तेव्हा पहिला तर पाहिले सगळे tight होणारे कपडे आता fitting करून घ्यायची गरज आहे ...तेव्हा वाटलं की खरंच खूप weight कमी केले आहे. आणि याचा खूप आनंद होत आहे.



पहिले खूप जण म्हणायचे की weight खूप वाढले आहे कमी कर वगेरे ....... आणि आता कुठेही बाहेर गेले तर सर्वजण म्हणतात की खूप weight कमी दिसत आहे ...छान दिसत आहेस आणि हे असे ऐकून खरच खूप छान वाटते.😊 कोणी म्हणण्या आधी मला माझ्यात झालेला बदल पाहून जास्ती आनंद होतो.... आता विचार केला की वाटते कशी होते मी आधी आणि आता किती छान दिसत आहे.....आणि आता या weight loss मुळे स्वतहाला आरश्यात पहिले की वाटते किती छान change झाला आहे आणि वाटते की अजून इथले fat कमी झाले तर figure आणखी छान होईल. आणि असे आणखी weight कमी करायला motivation भेटत राहते.

हे जे काही होऊ शकले आहे ते फक्त fitness naturo आणि #ReshmaJadhav mam च्या guidance support आणि help मुळेच. जेवढी मेहनत मी केली आहे त्याहून जास्त मेहनत रेशमा mam ने घेतली आहे म्हणूनच मी 16kg kami karu शकले. त्यासाठी mam चे जितके आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

असेच ज्यांना याची खरच गरज आहे त्यांच्या पर्यंत रेशमा mam आणि त्यांचे काम पोहोचत राहावे असे वाटते.


Thank you FITNESS NATURO✨

Thank you RESHMA MAM ✨

"thank you very much for your support throughout my weightloss journey 😇♥️✨"


Preeti Rege

99.4 किलो😱..
माझ्या वजनाचा काटा एवढा वर गेलेला पाहिला आणि मला शॉकच बसला.. हा प्रसंग आहे 6 महिन्यांपूर्वीचा, डिलिव्हरी नंतर माझं वजन एवढ्या झपाटयाने वाढलं की ते fc100 ला टेकायला आलं होतं... त्याआधीपासूनच काही महिने जाणवत होतं की वजन वाढतंय, डॉ ने pregnancy मधला #Diabetese पण डिटेक्ट केला होता, तेव्हापासून वजन कमी करण्याचा विचार सुरू असतानाच रेश्मा मॅम ची पूल पुणे ग्रुप वर काही क्लायंट चा ट्रान्सफॉर्मशन पाहिलं, त्यांचे #Positivereview वाचले, पण तरीही मनात अस होत की डाएट म्हणजे उपाशी राहणं, कमी खाणं, भूक मारणं असच असेल.. त्यात माझं बाळ छोटं असल्याने मला जिम ला जाणं जमणार नव्हतं.. म्हणून मी जरा कानाडोळाच केला, पण जसजस रेश्मा मॅम च्या clients चे #Drastic_Change झालेले result पाहायला लागले तस मलाही चौकशी करायचा मोह आवरला नाही, आणि finally 6 महिन्यानंतर मी रेश्मा मॅम ला फोन केला... सुरवातीला मला खूप प्रश्न होते पण रेश्मा मॅम ने माझ्या प्रत्येक प्रश्नाच न कंटाळता समाधानकारक उत्तर दिल.. मला कोणतीही जिम लावायची गरज नाही, फक्त #घरातल्याकाहीव्यायामाने आणि त्यांनी दिलेल्या #घरगुतीव्हेजडाएट मुळे तर मला अजूनच हे सर्व फॉलो करायला सोपं गेलं.. त्यांनी डाएट मध्ये कोणताही फॅन्सी डाएट दिला नव्हता, त्यामुळे मला डाएट करत आहोत असं वाटलंच नाही कधीही.. रेश्मा मॅम प्रत्येक 8-8 दिवसानी फोल्लो अप घेतात, पहिल्या 8 दिवसातच मला माझ्यात फरक दिसू लागला, आणि घरातूनच किचनमधल्या रोजच्या पदार्थांने आणि घरच्या सोप्या व्यायामामुळे मी खूप खुश होते, त्यांच्या डाएट आणि रेग्युलर exercise मुळे हळूहळू माझं वजन कमी होत गेलं, आणि पाहता पाहता जवळपास ते #21किलोकमी झालं, तेही अवघ्या #6_महिन्यात.. आणि त्यामुळे माझा pregnancy मध्ये सुरू झालेला Diabetes सुद्धा पूर्णपणे गेला, आता मला Diabetes ची कोणतीही गोळी सूरु नाही..
यासर्वांच 100% श्रेय मी फक्त आणि फक्त रेश्मा मॅम लाच देत आहे.. 


त्यांच्यामुळेच मला कळले की healthy खाणे काय आहे, त्यांनी मला कायम motivate आणि सपोर्ट केला आहे, अजूनही करत आहेत, डाएट सुरू झाल्यापासून खूप वेळा माझा डाएट ब्रेक होत होता, पण तरीही त्या न चुकता फॉलोअप घेत होत्या, अस नाही की पैसे भरले आणि विषय संपला, ह्या आधी ज्या ठिकाणी पैसे भरले होते पण तिथे एकदा consultation चार्जे भरले की कोणीही फिरून विचारत नव्हते, पण रेश्मा मॅम जे clients चे वजन कमी व्हावे यासाठी मेहनत घेतात ती खरंच कौतुकास्पद आहे, त्यामुळे आता माझ्या वजनातही जो फरक पडला आहे त्यामुळे सर्व मित्र, मैत्रिणी, नातेवाईक पण कौतुक करत आहेत, त्यामुळे मला खूप छान वाटते, माझे टार्गेट 30किलो लॉस चे आहे, अजूनही 9किलो लॉस करणं बाकी आहे आणि रेश्मा मॅम च्या साथीने ते लवकरच पूर्ण होईल याचा विश्वास आहे..😊
Thank you Reshma Jadhav Ma'am , Thank you so much for everything..❤️🙏
From Preeti Rege





Deepika Badgujar



हॅलो ऑल ऑफ यु..

मी दीपिका बाडगुजर. हा माझा अगदी पहिला वहिला #review आहे.. आणि हा #SuperPositiveReview आहे माझ्यात amazing बदल घडवणाऱ्या माझ्या #Nutritionst + #FitnessConsultan + #FitnessCoach Reshma Jadhav यांच्यासाठी. कारण आज जी माझी पूर्वीची personality मला परत मिळाली आहे, ती फक्त आणि फक्त Reshma Jadhav यांच्यामुळे शक्य झालं आहे. माझ्या लग्नानंतर 4 वर्षांनी मला मुलगी झाली, आणि pregnancy मध्ये वजन वाढलं, डिलीव्हरी नंतर ते अजूनच वाढतच गेल. आणि ते कंट्रोल करण मला खुपच अशक्य होत गेलं.. मला खुपजण बोलत होते खुपच जाड झाली तू तेव्हा मला खरंतर राग यायचा त्यांचा, पण मी त्यांना ignore करू शकत नव्हते, कारण माझं मलाच स्वतःला जाणवत होतं की मी खरंच जाड झाली आहे.. मला माझे कॉलेजमधले लग्नापूर्वीचे दिवस खूप प्रकर्षाने आठवत होते, त्यावेळी मी कशी स्लिम ट्रिम होते, आणि आता ही माझ्या शरीराची काय अवस्था झालीय असा विचार करून करून मी खूप डिप्रेस झाले होते. माझे जुने कुर्ते, टी शर्ट जे आता मला फिट होत नव्हते, ते पाहून तर मी अजूनच दुःखी झाले. कारण माझं वय फक्त 27 वर्ष होत आणि वजन 72 किलो झालं होतं. पण मग एक दिवशी ठरवलं की रडत बसून काही उपयोग नाही. वजन कमी करण्यासाठी निदान प्रयत्न तरी केला पाहिजे, जेणेकरून पूर्वीइतकी नाही झाले तरी थोडीतरी मी बारीक होईन. या आशेवर मी Social Media वर search करायला सुरुवात केली. तिथे मला Reshma मॅम बद्दल ची माहिती सापडली, मग मी त्यांचे past result search करायला सुरुवात केली, त्यांच्या clients चे results खुपच amazing होते. ते पाहून मला थोडी आशा वाटली, म्हणून मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला, आणि त्यांच्याशी बोलून मला खरंच खूप छान वाटलं. मेन म्हणजे त्या कोणतेही हर्बल, प्रोटीन, आयुर्वेदिक पावडर देत नाहीत आणि फक्त घरात बनवले जाणाऱ्या पदार्थ मधेच डाएट बसवून देत होत्या, आणि काही exercise सांगत होत्या.. हे पाहून मला आणखीनच आशा वाटली.. कारण जनरली आपण जेव्हा डाएट सुरू करतो तर त्यात सर्व ब्रोकोली, आणि काय काय इतर असे पदार्थ असतात जे भारतात बनत नाहीत, आणि बाजारात पण सहजपणे उपलब्ध होत नाहीत, मिळाले तरी खूप महाग असतात.. आधीच आपण जिम, डाएट प्लॅन वर एवढे खर्च करतो, त्यापेक्षा या भाज्यांचा डबल खर्च असतो, त्यातही प्रोटीन पावडर वगेरे सुचवले तर त्या एका डबा चा खर्च जवळपास 5-6 हजार असतो..
पण मी खूप नशीबवान होते की मला असले कुठलेही खर्च करावे लागले नाहीत.. कारण Reshma मॅम च्या डाएट प्लॅन मध्ये असले पदार्थ☝🏻आणि पावडर्स पण नाहीत.. फक्त घरात बनणारे पदार्थ आणी घरात करू शकू असे काही सोपे व्ययामप्रकार.. त्यामुळे मला जर कोणत्या गोष्टीचा खर्च झाला तर तो फक्त त्यांच्या डाएट प्लॅन चा, जो की one time होता.. आणि खूपच nominal charges होते.. जे की मला स्वतःला खूपच परवडणारे वाटले, आणि या सर्व घरगुती गोष्टींवरच अगदी natural पद्धतीने result पण इतक्या लवकर आला.. जो की मला वाटत होतं माझ्या #VegDiet मध्ये शक्य होईल की नाही. त्यांनी माझं टार्गेट पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी मार्गदर्शन, प्रत्येक Week ला follow up.. हे सर्व चालू ठेवलं. त्यामुळे 23 March 2021 ला सुरू केलेला प्लॅन 4 july 2021 ला माझं टार्गेट पूर्ण झालं, आणि माझं वजन 72kg वरून 57kg वर आलं. टोटल 15किलो कमी झालं आणि आता ते 55 kg वर maintain आहे. 




खरंतर माझं हे वजन कमी व्हायला 8Weeks लागले होते, ज्याची weekly नोंद मी स्वतः माझ्या body measurement chart वर करून ठेवली आहे.. पण मधल्या काळातील काही सण, घरचे कार्यक्रम, वाढदिवस, बाहेर फिरायला गेलेल्या सुट्ट्या, अस सर्व पकडून त्याला 3 महिने लागले.. पण यासर्वतही रेश्मा मॅम ने वेळोवेळी आठवण करून माझं ब्रेक झालेलं डाएट मला पुन्हा सुरू करायला लावलं, आणि माझं टार्गेट पूर्ण होईपर्यंत माझा पिच्छा सोडला नाही. त्यानंतर त्यांनी काही ठराविक tips वापरून weight कसं manitain ठेवायच हेही सांगितलं. आज माझं टार्गेट पूर्ण होऊन जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आलंय , आणि आता मी डाएट सुद्धा करत नाही.. पण त्यांच्या tips मुळे अजूनही माझं वजन mainitain आहे. आणि हो माझे पूर्वीचे टी शर्ट, कुर्तीज पण मला आता अगदी परफेक्ट फिटिंग मध्ये बसत आहेत.



याचे सर्व श्रेय मी Reshma Jadhav तुम्हालाच देईन. खरंच Thank u very much. मला हे करणं खूप impossible होत जे जे तुम्ही घडवून आणलं. मला या फिटनेस मध्ये आणण्यासाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार..😊🙏

दीपिका बाडगुजर

Anita Shelake



 
आज माझं आवर्जून इथे येऊन लिहिण्याच कारण म्हणजे Reshma Jadhav मॅम..

हा माझ्याकडून #SuperPositiveReview फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच आहे.

मी एक साधारण मध्यमवर्गीय गृहिणी आहे. माझं नाव सौ.अनिता राम शेळके. तर रेश्मा मॅमशी माझी ओळख झाली ती म्हणजे 2 ते अडीच वर्षांपूर्वी.. साधारणपणे इतर सर्व स्त्रियांना जे डिलीव्हरी नंतरचे प्रॉब्लेम येतात तेच मलाही येत होते. दोन मुलांचा जन्म, त्यांच्यापाठी आणि नवऱ्यापाठी धावपळ करता करता माझं स्वतःकडे प्रचंड दुर्लक्ष झाल होत. आणि त्यामुळेच वजन खूपच वाढलं होत. लग्नापूर्वी माझं वजन फक्त 45kg होत, आणि आता ते 65kg पर्यंत गेलं होतं, म्हणजे जवळपास 20kg ने वाढलं होत. वजन कमी करण्याची खूप इच्छा होती, त्यासाठी मी योगाचा कोर्से पण केला होता, तसेच रोज सकाळी गार्डनमध्ये चालायला पण जात होते, पण यासर्व प्रयत्नात माझे वजन 2-3 किलो च्या पुढे कमी होऊ शकले नाही.. त्यावेळी मग जिम चा विचार मनात यायला लागला.. आणि जिम शोधायला पण सुरवात केली, पण आमच्या एरिया मध्ये जिम खूपच कॉस्टली होत्या, जवळपास 20 ते 25 हजारपर्यंत मेम्बरशीप होती. आणि हे सर्व माझ्या बजेटच्या बाहेर होत. काहींनी मला हर्बल, आयुर्वेदीक पावडर पण सुचवल्या, पण ते सर्व मला करायचं नव्हतं, मला नैसर्गिकरित्या weight loss करायचा होता.. ना की unhealthy पद्धतीने कोणताही शॉर्टकट मारून .. अशावेळीच सकाळी जेव्हा गार्डन मध्ये walk ला जायचे तेव्हा माझी नजर एका व्यक्तीवर गेली. एक अशी व्यक्ती जी न चुकता रोज पहाटे 5 ला तिथे येऊन स्वतःच्या धुंदीतच Exercise करत असायची. तीच कोनाकडेच लक्ष नसायच, ती फक्त स्वतः मध्येच exercise करण्यात रमलेली असायची.. जिथे आम्ही इतर ladies walking च्या नावावर गप्पा मारत असायचो, तिथे ती मुलगी ??.. हो मुलगीच .. म्हणजे मला तरी ती प्रथमदर्शनी 20-22 वर्षाची कॉलेज गोइंग तरुणीच वाटत होती.. तिची एकंदरीतच फिगर आणि ज्या सहजरित्या परफेक्ट फॉर्म्स मध्ये ती exercise करत होती ते पाहून मला ती मुलगीच वाटली, आणि अस वाटत होतं की ती कुणीतरी professional आहे.. तिच्या देहबोलीतुनच ते लक्षात येत होतं. म्हणून एक दिवशी तिच्याशी बोलायच ठरवलं. आणि तिच्याशी बोलल्यानंतर मी एवढी आश्चर्यचकित झाले😮.. 

म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे ती खरोखरच #Professional and #Certified #Fitness Coach + #Fitness Consultant + #Nutritionist होतीच.. पण सर्वात मोठं आश्चर्य या गोष्टीच होत की ती माझ्य एव्हढीच वयाने होती, म्हणजे 34 वर्षाची, 15 वर्षांपासून married आणि तिला 12 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे, जो की आता 14 वर्षाचा आहे, आणि तिच्या लग्नाला आता यशस्व रित्या 17 वर्ष पूर्ण झालीत.. तर हे ऐकून मी खुपच आश्चर्यचकित झाले.. कारण ती अक्षरशः 20 वर्षाची College going student दिसत होती. तिच्याकडे आणि तिच्या स्वतःच्या फिटनेस कडे पाहून मी खूपच खुश झाले, मला मनापासून आशा वाटली की हिच्यात काहीतरी आहे, आणि ही आपलं weight loss करवून देऊ शकते.. आणि तिची सर्वात छान गोष्ट मला ही वाटली की तिचा प्लॅन हा #NoProtein #NoAyurvedic #NoHerbalProducts #NoSteroids #NoTablets असा होता.. ती फक्त #Diet and #Exercise वर #WeightLoss घडवून आणत होती. आणि खरं सांगायचं तर मी तिच्या कोणत्याही clients चे results पाहायला मागितले नाहीत, चौकशी पण फार केली नाही. मी फक्त आणि फक्त तिला पाहूनच तिच्यापासूनच प्रेरणा घेऊन तिच्याकडे जॉईन केलं. जॉईन करण्यापूर्वी पण मला डाएट म्हणजे उपाशी राहणं अस वाटत होतं. पण Reshma Jadhav मॅम ने मला खूप छान प्रकारे डाएट म्हणजे Healthy Eating हे समजावून सांगितलं. त्यानुसार मी त्यांच्याकडे जॉईन केलं होतच की lockdown पडला.. तरीही त्यांनी हार न मानता मला घरी करण्यासाठी काही exercise पाठवले आणि डाएट चार्ट पण पाठवला.. आणि प्रत्येक 8-8 दिवसानी माझं फॉलो अप घेत होत्या. त्यांच्या डाएट प्लॅन मुळे पाहता पाहता माझं lockdown काळात 2.5 ते 3 महिन्यात #17किलो ने वजन कमी झालं. 

काही महिन्यानी lockdown शिथिल झाल्यावर जेव्हा सर्व हळूहळू घराबाहेर पडू लागले तेव्हा मला #65kg वरून #48kg वर पाहून सर्वांनी आश्चर्यने तोंडात बोटं घातली.. सर्वजण म्हणायला लागले lockdown काळात आमचं घरात बसून बसून वजन वाढलं आणि तुझं कसं काय कमी झालं , ते ही एवढा #DrasticChange त्यांच्या समजण्यापालिकडे होता. तिच्या स्वतः प्रमाणे आता मलाही लोक #CollegeGoingGirl दिसते अस म्हणू लागले.. सोसायटी मधली छोटी मुलं जी पूर्वी #aunty म्हणत होती ती अचानक #Didi म्हणू लागली. यामुळे मी खूपच खुश झाले. माझा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्यातला हा बदल 2 वर्षपूर्वी घडला आहे, तो हि पहिल्या lockdown मध्ये घरात बसून. आणि अजूनही 2 वर्षांनंतरही माझं वजन maintain आहे, कारण डाएट बंद केल्यावरही ते manitain कस ठेवायच हे Reshma jadhav मॅम ने मला सांगितलं, त्यामुळेच अजूनही ते maintain आहे. याच सर्व श्रेय फक्त आणि फक्त Reshma Jadhav मॅम यांनाच जात.. त्यामुळे या Review च्या रुपात माझी तुमच्या बद्दलची कृतज्ञता आणि आभार मी व्यक्त करत आहे. तुम्ही त्याचा स्वीकार करावा ही मनापासून विनंती आहे.. 😊🙏🙏🙏🏼
Highly recommended to Reshma Jadhav mam
--Anita Shelake




Jyoti Kale



नमस्कार😊🙏

   मी ज्योती टावरे काळे नाशिकमध्ये राहते. आज #Reshma Jadhav यांच्याबद्दल माझा हा एक #Positive review द्यायला मला खूप आनंद होत आहे. मी फेसबुक वर रेश्मा मॅम च्या weight लॉस प्लॅन ची माहिती पहिली पण तेव्हा मला तितकं खरं वाटलं नाही पण आज मी मॅम मुळे 15 ते 17 kg वजन कमी केले. मी 3 वर्ष सतत मॅम चे व्हाट्सअप्प status रोज न चुकता पहायची मध्यंतरी 2 वेळा मी enquiry पण केली पण मॅमला कॉल केला की त्या बोलायच्या मी पुण्यात असते तुम्हाला वेट लॉस डाएट प्लॅन साठी तुम्हाला पेमेंट ऑनलाइन करावे लागेल, मला वाटायचं ऑनलाइन payment मुळे फसगत नको व्हायला त्यामुळे मी परत विचार सोडून दिला पण कोरोना काळात आणि त्यानंतर माझे वजन झपाट्याने वाढले मग मी एप्रिल 2022 च्या ending ला मॅम ला एक कॉल केला त्यांनी मला छान समजावून सांगितले मग मला ते समजले मी मग मनाचा निश्चय केला की आता काहीही करून आपण पेमेंट करून डाएट प्लॅन घ्यायचा या अगोदरपण मी 2,3 विविध कंपनीचे herbal, ayurvedic powder weight लॉस साठी use केलेले आहे पण ते बंद केल्यानंतर माझे वजन झपाट्याने वाढून गेले. मग मी ठरवलं की आता शेवटचा एक चान्स घेऊ आणि रेश्मा मॅम चा कोणतेही पावडर नसलेला #HomeMadeDietPlan घेऊन पाहू. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व प्रोसेस माझे मिस्टर आणि मी घरच्यांच्या नकळत करणार होतो, थोडं टेंशन होतच पण शेवटी मॅम ला 8 मे ला पेमेंट केले. मग मॅम बोलल्या की मी काही documents पाठवीन ते प्रिंट करून सर्व माहिती फील अप करून आणि फिटींग शर्ट पॅन्ट वर फोटो काढून मला सेंड करा मग मी पुढील 24 तासात तुम्हाला डाएट प्लॅन मिळेल. मी सर्व forms फीलअप करून फोटो काढुन पाठवले पण 24 तास होऊन गेले तरी मॅम चा रिप्लाय येत नव्हता मग माझे मिस्टर मला बोलायला लागले तुझे पैसे बहुतेक गेले आता ते मला रागावले मग मी मॅम ला msg केला नेमके त्यावेळी मॅम त्यांच्या आजीच्या अंत्यविधीसाठी गावी गेल्या होत्या त्यांनी प्रवासातच 12 तारखेला रात्री त्यांनी मला msg करून कळवलं तेव्हा माझ्या जिवात जीव आला मग दुसऱ्या दिवशी मला डाएट प्लॅन मिळाला. मॅम ने मला अर्ध्या तासाच्या कॉल मध्ये सर्व डाएट समजावून सांगितला, काय खाणे टाळायचे,कोणत्या exercise करायच्या सर्व समजावले. वेळोवेळी मॅम follow up घ्यायच्या. कधी कुठे बाहेर जावे लागले तर तिथे काय खावे,काय खाणे टाळावे एकदम बारीक बारीक गोष्टी सहज समजावून सांगायच्या. कधी जर डाएट प्लॅन व्यतिरिक्त काही खाल्ल तर रागावायच्या आणि त्यानंतर वजन वाढू नये म्हणून काय करायला पाहिजे ते समजवायच्या. मॅम ला कधीही फोन केला तर खूप हसून ग्रीट करून मला काही अडचण असेल तर लगेच त्यावर सोल्युशन द्यायच्या त्याबाबतीत त्यांनी कधीच कंटाळा केला नाही. मी या अगोदर weight लॉस साठी खूप खूप व्यर्थ खर्च केला पण मॅम कडून आता जो डाएट प्लॅन घेतला त्याला मला रेश्मा मॅम च्या फीस व्यतिरिक्त एकही रुपया चा extra चा खर्च आला नाही.. कारण त्यांनी मला कोणताही ब्रोकोली, smoothie, shakes, चिआ सीड सारख महागडे पदार्थ माझ्या जेवणात नव्हते, सर्व रोजच्या जेवणातले ठराविक पदार्थ होते, त्यामुळे मला डाएट करतोय असही वाटायचं नाही.. आणि रेश्मा मॅम च्या सपोर्ट आणि प्रयत्नामुळे आज माझे वजन #3month मध्ये #69kg वरून #53kg वर आलं आहे, 


यादरम्यान माझे काही कार्यक्रमासाठी डाएट मध्ये ब्रेक पण झाला पण तरीही वजन वाढले नाही, माझं टार्गेट ऑगस्ट मध्ये पूर्ण झालं आहे , आणि आज नोव्हेंबर ending ला मी review देत आहे, एवढ्या दिवसात डाएट न करूनही रेश्मा मॅम च्या maintainance tips मुळे माझं वजन वाढल तर नाहीच उलट अजून #2किलोकमी झालं आहे, आज ते #51kg आहे. आणि माझा #Bp,PCOD, चे प्रॉब्लेम पण आता खूप कंट्रोल मध्ये आले आहेत आणि backpain चा प्रॉब्लेम solve झाला आहे. त्यामुळे मी खूप खुश होऊन आनंदाने हा review देत आहे.. Thank you so much #Reshma Jadhav 🙏 धन्यवाद