#PulaFridayReview
मी अभिलाषा ढोकणे, वारजे, पुणे (Banker) आहे.
माझ्या सोसायटीतच राहणारी अश्विनीने मला Reshma madam यांच्याबद्दल सांगितलं. ती स्वतः त्यांच्या डाएटवर होती, आणि तिला खूप फरक जाणवला होता. त्यामुळे मीही विचार केला की एकदा भेटून तर बघूया.
सुरुवातीला वाटलं होतं आपल्याकडून होईल का? पण जेव्हा त्यांचं काम, क्लायंटचे रिझल्ट आणि रिव्ह्यू पाहायला लागले, तेव्हा वाटलं नक्की प्रयत्न करून बघायला हवा.
Reshma madam खूप शांत आणि समजून घेणाऱ्या आहेत. त्यांनी सुरुवातीपासूनच माझ्या लाईफस्टाईलनुसार डाएट दिलं जे अगदी घरचं होतं. कुठलाही पावडर, शेक, गोळी नाही. घरचं जेवण आणि घरचा व्यायाम, एवढंच सगळं केलं.
पहिल्या follow-up नंतरच एक पॉझिटिव्ह energy जाणवली. लहान फरक दिसत होता, पण तोच खूप मोठा वाटत होता. 14 आठवड्यांत 15 किलो कमी झालं! शरीर हलकं झालं, एनर्जी वाढली, आणि सगळ्यात महत्त्वाचं.. आत्मविश्वास वाढला.
मला PCOD चा त्रास होता. पाळी नियमित नव्हती, खूप चिडचिड व्हायची. पण आता सगळं खूप सुधारलं आहे.
Reshma madam फक्त डाएटिशियन नाहीत, त्या खरंच एक मोटिवेट करणाऱ्या मार्गदर्शक आहेत. त्यांनी मला वेळोवेळी समजावून सांगितलं, प्रोत्साहन दिलं, आणि माझ्यावर विश्वास ठेवायला शिकवलं.
आता लोक म्हणतात , "तू खूप बदललीस!" आणि हो, मीही आतून खूप बदलले आहे.
हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे – आणि तो शक्य झाला फक्त Reshma madam आणि Fitness Naturo टीममुळे.
धन्यवाद मनापासून! 💖
No comments:
Post a Comment