Thursday, August 21, 2025

स्वरदा निफाडकर


 नमस्कार 🙏 माझे नाव स्वरदा निफाडकर (IT Professional)


माझ्या दुसऱ्या डिलिव्हरीनंतर माझे वजन खूप वाढले होते आणि त्याचबरोबर मला BP ची गोळीही घ्यावी लागत होती. ही गोळी लवकरात लवकर सोडायची होती, पण मी IT प्रोफेशनल असल्याने सतत Work From Home मुळे वजन काही केल्या कमी होत नव्हते. अनेक उपाय करूनही समाधानकारक परिणाम दिसत नव्हते.


अशा वेळी मला आशेचा किरण मिळाला तो Reshma Ma’am यांच्या रूपाने. त्या फक्त एक उत्तम dietician नाहीत, तर खर्‍या अर्थाने एक मोटिवेशनल Mentor आहेत. योग्य वेळी दिलेलं त्यांचं मार्गदर्शन, सतत केलेला प्रोत्साहनाचा वर्षाव, आणि सातत्याने केलेलं follow-up यामुळे माझा हा प्रवास सोपा व आनंददायी झाला.


आज अशी वेळ आली आहे की मला लोक आणि माझ्या मुलाचे मित्र मला पाहून “तुझी बहीण आहे का?” 😅 असे विचारतात, आणि यापेक्षा मोठं compliment मला मिळूच शकत नाही.


Reshma Ma’am यांच्यासोबतच त्यांची संपूर्ण टीमही अतिशय सहकार्य करणारी आहे. प्रत्येक गोष्ट समजावून सांगणं, वेळोवेळी योग्य सल्ला देणं – या सगळ्यामुळे माझा confidence खूप वाढला आहे.


मनःपूर्वक Reshma Ma’am आणि संपूर्ण Fitness Naturo टीम चे आभार मानते 🙏💚

No comments:

Post a Comment