Thursday, August 21, 2025

इस्टर अस्वले

 मी इस्टर अस्वले, प्रोफेशनने नर्स आहे. खरं सांगायचं तर मला अजिबात अपेक्षा किंवा खात्री नव्हती की मी वजन कमी करू शकेन. पण एका दिवशी PULA वर रेश्मा मॅडमची पोस्ट पाहिली आणि त्यांच्याशी कॉल करून सर्वात आधी हाच प्रश्न विचारला – “मी खरंच वजन कमी करू शकणार ना?”


त्यांच्या प्रेरणादायी आश्वासनानंतर मनात हुरूप आला आणि कुठेतरी थोडीशी आशा निर्माण झाली. पहिला कॉल खूपच आशादायी होता – मॅडम इतक्या छान समजावून सांगत होत्या की मनापासून पटले, “आपणही नक्की बारीक होऊ शकतो.”


मॅडमने चार डाएट प्लॅन दिले – ते सगळे अगदी घरगुती जेवणावर आधारित, कोणतेही शेक, गोळ्या किंवा औषधं नाहीत. माझं सुरुवातीचं वजन 102.6 किलो होतं. काही हेल्थ इश्यू आणि अपघातामुळे मी डाएट पूर्णपणे फॉलो करू शकले नाही, तरीसुद्धा फक्त मॅडमच्या मार्गदर्शनामुळे मी 11 किलो वजन कमी करू शकले.


मनःपूर्वक आभार रेश्मा मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे ❤️🙏

No comments:

Post a Comment