Thursday, June 12, 2025

सुनिता शिंदे

 


नमस्कार, मी सुनिता विनोद शिंदे, माझ् वय 40, आणि मी एका नामांकित स्कूल मध्ये टीचर आहे.

                 मी पहिल्यांदाच असा रिव्ह्यू देत आहे. कारण तशीच विशेष गोष्ट माझ्या आयुष्यात फक्त रेश्मा मॅडम आणि त्यांच्या टीम मुळे घडली आहे. 

                तर झाले असे कि माझ वजन मागच्या 8 ते 9 वर्षांपासून हळूहळू खूपच वाढले होते.  त्यामुळे मला खूपच थकवा येणे, सतत आळस, पायदुखी, शरीरात जडपणा निर्माण झाला होता. म्हणून मी वजन कमी करण्यासाठी हर्बल प्रोडक्ट पण घेतले होते. पण त्याचा फक्त तात्पुरता फायदा झाला आणि जास्त वजन कमी झाले नाही. आणि झाले ते परत लगेच वाढले.


                    त्यानंतर मी रेश्मा मॅडमला Pula वर पाहिले आणि जानेवारी 2024 ला फोन केला. पण मनात शंका होती कि नुसतं घरचं खाऊन कस काय वजन कमी होईल? कमी खावं लागेल कि काय, म्हणून वर्षभर त्यांना  फक्त फॉलो केले, आणि पुन्हा जानेवारी 2025 ला कॉल केला. आणि माझ्या शंका च निरसन करून घेतलं. आणि चार महिन्याचा प्लॅन सुरु केला.

            पहिल्याच आठवड्यात रिझल्ट यायला सुरु झाला.मला जो कंटाळा थकवा यायचा तो कमी झाला. त्यात महत्वाचं म्हणजे माझा चेहऱ्यावरील वांगाचे डाग ही कमी झाले. चेहऱ्यावर चकाकी आली. त्यामुळे माझा उत्साह वाढला. 

       

                  जे लोक मला म्हणत होते कि डायट करून आजारी पडत, चेहऱ्यावर तेज राहत नाही, तीच लोक मला बघून म्हणायला लागले चांगल आहे तुमचं डाएट. सगळे बघून आश्चर्य व्यक्त करतात.

 

                वजन कमी करण्याचा हा प्रवास मला कंटाळवाना किंवा जाचक वाटला. 15 किलो चा प्लॅन असून माझं 12 किलो वजन चार  महिन्यात कमी झालं. रेश्मा मॅडम साठी हा रिझल्ट जरी 80% असला तरी माझ्यासाठी 100% आहेत त्यासाठी धन्यवाद रेश्मा मॅडम आणि फिटनेस न्याचरो टीम 😊💐💐

No comments:

Post a Comment