Thursday, July 3, 2025

पल्लवी वाघोले

 

#PulaFridayReview 


Hello..

                मी पल्लवी वाघोले. मी एक गृहिणी आहे. माझ मागील एका वर्षात वजन खूप वाढल होत. त्यांच कारण माझा गुडघा twist झाला आणि ligament injury झाली. त्यामुळे मला फिरणे, जमिनीवर बसणे, या सगळ्या वर बंधन आले. माझा पाय थोडे चालले तरी खूप दुखायला लागला. आणि त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर झाला. हळूहळू माझ वजन १० ते १५ किलो वाढल. 

                  एक दिवस अचानक माझी  एक मैत्रीणी खूप दिवसांनी मला दिसली. तीच After pregnancy वजन वाढले होते. आणि आत्ता ती खूप बारीक आणि यंग दिसत होती. मला तिला पाहून खूप आनंद झाला. आणि छान पण वाटल. तिला मी विचारले की तू काय केलं ईतकी बारीक कशी झाली काय केलं. तेव्हा मला@ Reshma ma'am बद्दल माहिती दिली. 

               मला सर्व समजल्यावर खूप आश्चर्य वाटले की कोणत्या प्रकारचे शेक, गोळ्या महागड्या पावडर अस काही न घेता फक्त आणि फक्त आपल्या घरगुती वापरातील पदार्थ घेऊन आपण वजन कमी करू शकतो हे समजले.

                 मी आगोदर Herbal life केल होत. Lockdown मध्ये त्याचा उपयोग मला झाला. पण तो रोज रोज शेक पिण्याचा मला कंटाळा आला.त्यामुळे मला असं काही हव होत कि आपल्या ला सहज उपलब्ध होईल. अशा गोष्टी हव्यात कि जेणेकरून आपले वजन परत परत वाढणार नाही. आणि मला @Reshma Jadhav ma'am बद्दल माहिती नोव्हेंबर २०२४ मध्ये मिळाली. पण मी काही फोन केला नाही. ते म्हणतात ना की..तहान लागली की आपली पावले आपोआप पाण्याजवळ जातात!! तसचं काहीसं माझ्या बाबतीत झाल. 

                         मैत्रीणींनो आपल्या सर्वांना छान दिसायला आणि सर्व टाईपचे कपडे घालावेत असे वाटते किंवा आवडते असे म्हणाणा..... पण वाढलेले वजन आपल्याला तस करू देत नाही. आणि दुसरे म्हणजे xxl, xxxl size मध्ये फार कमी choice असतो. 

                   मी या  कॉल वर येण्याच कारण पण तेच आहे. मला अचानक xl  वरून xxxl  size घ्यावी लागली. आणि तेव्हाच मला कळले की आत्ता हिच ती योग्य वेळ आहे. मी त्या क्षणी माझ्या मिस्टरांना सांगितले . आणि माझ्या या वेट लॉस जरनीला सुरूवात झाली.


      @Reshma ma'am बरोबर पहिला फोन फेब्रुवारी २०२५ ला केला आणि पहिल्याच कॉल वर त्या खूप positive वाटल्या. मी  4 months चा plan घेतला त्यांनी जे जे सांगितले ते सर्व केले आणि अवघ्या एका आठवड्यात 2kg कमी झाले..... 🤗 खूप आनंद झाला.

                   आत्ता मात्र पक्की खात्री झाली आपण योग्य निर्णय घेतला आहे. मॅडम ची दर आठवड्याला follow ups आणि काळजीपूर्वक कशा आहात तुम्ही!! असे म्हटले कि खूप आपले पणा वाटतो...

                     या प्रवासात काही अडचणी पण आल्या. आपल्या कडे काही सण, कार्यक्रम आले तरी पण अशा वेळी काय खायचे हेही अगदी योग्य पध्दतीने समजून सांगितले. त्यामुळे  कधी डायटचा कंटाळा आला नाही. मध्ये मध्ये वजन स्टक झाल. तेव्हा पण  @ Reshma ma'am ने खूप छान पध्दतीने समजावून सांगितले. 😊 

                        यामध्ये अनेक जणांचे खूप छान छान comments मिळाली . आगोदर घरच्यांनी सांगितले छान दिसते आहे, शेजारी, मैत्रीणी यांनी सांगितले !!

                       माझ्या साठी सगळ्यात मोठी comment म्हणजे माझ्या आईने केलेली..... मी आणि माझ्या दोन मुली आम्ही मिळून एक फोटो काढला. आणि तो नेमका आईने पाहीला आणि माझ्या मुलीला म्हणाली मधली तूझी मैत्रीण आहे का? तीने सांगितले मैत्रीण नाही नीट बघ तुझीच मुलगी आहे... 😃 हे मला समजल्या वर खूप खूप आनंद झाला.

                  Reshma ma'am याचे सर्व श्रेय फक्त आणि फक्त तुम्हांला आहे. आत्ता सर्व प्रकारचे ड्रेस (मुलींचे पण)  घालू शकते आहे XXXL  वरून L size झाली.... 🤗  माझ वजन कमी झाल्याने आत्ता गुडघा पण बरा आहे. मी मांडी घालून बसू शकते. सर्व व्यायाम करू शकते. खूप छान वाटते आहे.त्यामुळे मॅडम चे खूप खूप आभार मानते. 🙏🏻🙏🏻😊Thank you so much Reshma ma'am  and Fitness team. 🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment