माझं वजन जास्त नव्हते पण ते माझ्यासाठी जास्त होते ५५ किलो.. लॉकडाउन नंतर वजन वाढत गेले.
थोडस फॅट आणि पोटावरील फॅट कमी करण्यासाठी मी २_३ वर्ष प्रयत्न करत आहे पण झालं नाही.योग्य मार्गदर्शन नव्हते. जिन्स टीशर्ट हा माझा नेहमीचा कॉस्टुम असल्यामुळे पोट कमी असणे गरजेचे होते.
एका लग्न फोटोग्राफी ऑर्डर ला मी गेली होती तेव्हा Reshma Jadhav मॅडम ची ओळख झाली.
काही महिने गेले आणि आम्ही चांगल्या मैत्रिणी झालो. मी त्यांच्याकडून डाएट प्लॅन घेतला आणि फक्त १५ दिवसात माझं वजन ६ किलो ने कमी झाले. आता माझे वजन ४९ किलो आहे.
महत्वाच म्हणजे कामासाठी जागरण करायची त्यामुळे माझं खाणे हे दिवसा कमी आणि रात्री जास्त असायचे अशा मध्ये सुद्धा माझं वजन कमी झाले.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही किती खाता हे महत्वाच नाही तर तुम्ही काय खाता हे महत्वाच आहे. योग्य आहार महत्वाचा असतो.
इतर डाएटिशियन प्रमाणे इथे गोळ्या पावडर वगैरे काहीच नव्हत फक्त होता तो घरचा आहार आणिd त्याचे मार्गदर्शन. एकदा काय आपल्याला ह्या रूटीन ची सवय झाली की आपले वजन स्थिर राहते हे मला खूप आवडलं.
जानेवारी महिन्यात मी वजन कमी केले आणि अजूनही तेवढेच आहे. मी शूट साठी बाहेर जाते त्यावेळी योग्य आहार मिळेलच अस नसतं पण आपण कधीतरी वेगळा आहार घेतला तरी चालतो पण घरी आल्यावर परत आपले रूटीन चालू करावे.
रेश्मा मॅडम जे सांगतात तेच लक्ष देऊन केले की तुम्हाला अस वाटणारच नाही की तुम्ही उपाशी राहताय.
तुम्ही बिनधास्त पणे मॅडम कडून डाएट प्लॅन घेऊ शकता.
मला तर रेश्मा मॅडम जादुवाल्या वाटतात😄 लगेच वजन कमी केले.
ज्या गोष्टीसाठी मी काही वर्षे प्रयत्न करत होती ते १५ दिवसात झालं.
धन्यवाद🙏 रेश्मा मॅडम🥰
No comments:
Post a Comment