मी भक्ती कवठेकर…
मला Fitness Naturo ची माहिती फेसबुकवर मिळाली. पोस्ट वाचल्यावर मनात पहिला विचार आला – गोळी, पावडर किंवा डब्यांशिवाय वजन कमी कसं होईल?
कारण काही वर्षांपूर्वी मी हर्बलाइफचे डबे वापरले होते आणि वजन कमी झालेही होते… पण नंतर ते भराभर वाढले! त्यामुळे शंका वाटणं साहजिकच होतं.
मग जेव्हा Reshma Ma'am शी बोलले, तेव्हा लक्षात आलं की इथे काही वेगळंच आहे –
घरचं खाणं, नैसर्गिक मार्ग आणि कोणतीही औषधं न घेता वजन कमी करणं!
त्या क्षणी मला वाटलं, "हो, यावेळी खरंच वजन कमी होणार!" अशी खात्री निर्माण झाली. 🙏🏻
Fitness Naturo चा स्टाफ अतिशय प्रोफेशनल आणि प्रॉम्प्ट आहे.
ते वेळोवेळी follow-up घेतात, आठवण करून देतात, तुमचा डाएट कसा चालू आहे, काय खावं, काय टाळावं हे समजावतात.
Reshma Ma’am चा मोटिवेशनल कॉल तर धमाकेदार असतो!
कधी थोडं चुकलं, चीट झालं तर अगदी हक्काने ओरडतात… पण त्या ओरडीतही त्यांची काळजी आणि तळमळ दिसते – आणि त्यामुळे आपल्यालाही अजून जिद्द येते! 💯🔥
फक्त 12 वीक मधे मी १५ किलो वजन कमी केलं आहे – आणि हे सगळं फक्त Fitness Naturo आणि त्यांच्या टीमच्या सततच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालं!
आज कुठेही बाहेर गेले की लोक म्हणतात – "अरे वा! किती बारीक झालीस!"
हे ऐकून खरंच खूप छान वाटतं… आत्मविश्वास वाढतो.
Thank you so much Reshma Ma’am आणि Team Fitness Naturo – तुमच्यामुळेच माझं हे रूपांतर शक्य झालं! 🙏🏻❤️
No comments:
Post a Comment