#PulaFridayReview
माझं नाव राधिका. रेशमा मॅम बद्दलची माहिती मला Pula लेडीज ग्रुप मधून मिळाली. मग पहिल्यांदा असं वाटलं की आपण पण हे आता रेश्मा मॅम चे डायट घेऊन बघूयात का? पण तरी भीती वाटत होती की याच्या आधी पण मी एक दोन डायट प्लॅन फॉलो केले होते. पण असं व्हायचं की एक दोन महिने खूप छान डायट फॉलो व्हायचं, पण त्याच्यानंतर मला आजारपण यायचं काही ना काहीतरी आणि ते ब्रेक व्हायचं.
पण मी रेशमा मॅम चे खूप सारे रिव्ह्यूज वाचले पुल ग्रुप वरचे. त्याच्यामुळे असं वाटलं की आपण एकदा तरी यांचं डायट प्लॅन घेऊन बघूयात.
त्यामुळे मी रेशमा मॅम ला फोन केला. आणि फर्स्ट कन्सल्टेशन त्यांचं जे होतं त्याच्यामध्येच त्यांच्याशी बोलल्यावर मला एकदम पॉझिटिव्ह फील झालं. त्यांनी मला asurance दिला की मी हा डायट प्लानमुळे आजारी पडणार नाही. कारण याच्यामध्ये कुठलाही प्रकारच्या पावडर नव्हत्या कुठल्याही प्रकारच्या ज्या सीड्स असतात किंवा जे फॅन्सी डायट असतं ते काहीच नव्हतं. सगळं काही घरातलंच खान होतं त्याच्यामुळे इनफॅक्ट माझी इम्युनिटी वाढेल. सो मी यांचं डायट जॉईन केलं.
जॉईन केल्यानंतर जो पहिला फॉलोअप होता. त्यावेळेला असं वाटलं की हा काहीतरी आपल्या शरीरामध्ये आता चांगला बदल घडतोय.
तुमच्याकडचा जो रिस्पॉन्स होता तो खूपच छान होता. रेशमा मॅम शी नेहमी जेव्हा जेव्हा बोलणं व्हायचं कन्सल्टेशन च्या वेळेला, त्यावेळेला त्या एकदम पॉझिटिव्हली सांगायच्या आणि तोच पॉझिटिव्हनेस माझ्यामध्ये पण येऊन मला पण इन्स्पिरेशन मिळायचं की नाही आपल्याला हे करायलाच पाहिजे.
रेशमा मॅम बरोबरच त्यांचा स्टाफही तितकाच खूप छान आहे. जर कधी एखाद्या वेळेला वजन तेवढं नाही कमी झालं तर त्या सुद्धा खूप छान पॉझिटिव्हली सांगायच्या की "मॅम टेन्शन नका घेऊ असं काहीतरी घडलं असेल" एक दोन ऑप्शन सांगायचा, आणि बरोबर त्यातलंच काही ना काही तरी झालेला असायचं, त्याच्यामुळे वजन नसेल झालं कमी आणि नेक्स्ट follow up la मात्र बरोबर ते वजन कमी झालेलं यायचं. आता वजन कमी झाल्यावर तर खूपच छान वाटतंय. जे काही माझे health प्रॉब्लेम्स होते ते आता सगळे रिझल्ट छान आले.
इनफॅक्ट मी आत्ताच सगळ्या ब्लड टेस्ट करून घेतल्या तर माझे डॉक्टर तर खूपच खुश झाले आहेत. माझं एचबी कधी नव्हे ते बाराच्या पुढे गेले. जे नेहमी दहा ते अकराच्या रेंजमध्येच असायचं. आणि जे बाकीचे सगळे रिपोर्ट्स होते तेही खूप छान झालेत. म्हणजे मी फक्त घरचंच खाऊन एकदम छान हेल्दी झाली आहे.
रेशमा मॅम तर खूप पॉझिटिव्ह आहेत. आणि त्यांची हीच पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये पण येते. आणि आपोआप आपण ते डायट फॉलो करायला लागतो. काहीही न करता म्हणजे ते डायट चालू केल्यानंतर पहिला एक दोन दिवस वाटतं हे खावं ते खावं. पण ज्यावेळेला रेश्मा मॅम बोलतात त्यावेळेला असं वाटायला लागतं की नाही हे आपल्याला नाही खाल्लं पाहिजे.
इनफॅक्ट स्वतःहून कधी कधी मला ओरडल्या तेही प्रेमाने, जेव्हा जेव्हा चुकीचं काही खाण्यात आलं माझ्या . असं मी म्हणेन त्यामुळे मला माझं वजन कमी व्हायला नक्कीच मदत झाली.
मी जेव्हा डायट प्लॅन चालू केला त्यावेळेला माझ्या फॅमिली मेंबर्सला असं वाटायचं की हे डायट करून मी पुन्हा आजारी पडेल. पुन्हा काही ना काहीतरी डेफिशियन्सी निर्माण होईल. असं त्यांना भीती वाटायची. पण ज्यावेळेला माझं वजन कमी व्हायला लागलं आणि जशी जशी मी फिट दिसायला लागले, तसं तसं आता सगळ्यांना हे कळलंय की नाही राधिका पुन्हा पहिल्यासारखी फिट झाली आहे. आणि हेल्दी झाली आहे. इनफॅक्ट माझ्या घरातले म्हणजे माझ्या नवऱ्याने मला कॉम्प्लिमेंट दिले की गेले सहा महिने ही डॉक्टरांचे बिल भरायलाच गेलेली नाहीये. सो ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट मला मिळाली आहे.
आणि आता सगळे फ्रेंड सुद्धा म्हणायला लागले आहेत की तू पुन्हा पहिल्यासारखी छान आणि फिट दिसायला लागली आहे.
पूर्वी मला काही जण बाहेर गेल्यानंतर काकू काकू म्हणायचे पण आता मला तीच लोक पुन्हा ताई ताई म्हणून म्हणतात. त्यावेळेला खूपच मज्जा येते. आणि खूपच छान वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे जे सगळे आधीचे कपडे होते जे की मी ठेवून दिले होते की हे कधी ना कधीतरी आपल्याला येतील. ते आता मला सगळेच यायला लागले आहेत. त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे. सो थँक्यू सो मच रेशमा मॅम.. तुमच्यामुळे मला हे साध्य करता आलं. आणि माझा हा जर्नी बघून मी जे स्टेटसला फोटो ठेवते माझे आता तर ते माझ्या फ्रेंड्स नी बघितलेत. आणि बऱ्याच फ्रेंड्स नि तुम्हाला कॉन्टॅक्ट केलेला आहे ऑलरेडी . आणि काहीजणांना मी नंबर्स पण दिलेले आहेत. माझ्या लंडनच्या मैत्रिणीने पण माझं स्टेटस बघून तुमचा डायट प्लान चालू केलेला आहे. सो मी सगळ्यांना एवढेच म्हणेन की "कंट्रोल के आगे वेट है सो कंट्रोल करा. आणि रेश्मा मॅम जे काही तुम्हाला फॉलो करायला सांगतात ते मनापासून करा" तुम्हाला रिझल्ट 100% मिळेल थँक्यू सो मच रेश्मा मॅम.
No comments:
Post a Comment