Saturday, November 19, 2022

Poonam Patil



(These Feedback are given by Client on various groups, WhatsApp or other Social Media platforms. All these Original Feedback are Copied Here)

Client ID :-

Client Name:- Poonam Patil

Age:- NA


Job :- Service 


Target Achieved of Weight Loss:- 10Kg (70 Kg To 60 Kg)


Feedback given Facebook Group :-


#WeightLossReview

#Positive

#Motivated


आज मला तुम्हाला काही तरी share करायचं आहे, म्हटलं तर review, म्हटलं तर एक प्रवास  #Fat पासून #Fit कडे,..फेसबुक वर पुणे पूला च्या ग्रुप वर #Reshma मॅडम च्या #Fitness #Naturo #Review वाचल्यावर मी त्यांना लगेचच संपर्क केला.  बरीच चौकशी, चर्चा आणि शेवटी खात्री झाल्यावरच मी अखेर अगदी निर्धास्तपणे माझ्या या #Reshma_Jadhav मॅडम सोबत च्या  #Weightloss च्या प्रवासाला सुरुवात केली. 


ABCD म्हणजे Any Body Can Dream नुसार मी सुद्धा हे करू शकते हे स्वप्न पाहिलं आणि जर #Reshma मॅडम सारख कुणी शिक्षक, मार्गदर्शक, #Dietitian सोबत असेल तर नक्कीच प्रत्येकजण हे स्वप्न पाहू शकतो. खरं तर हा डायट प्लॅन घेण्यामागे माझा मुख्य उद्देश होता तो माझा #BMR योग्य प्रमाणात आणणे. आज रेश्मा मॅडम च्या डायट नंतर माझं वजन फक्त #7week मध्ये ७० किलो वरून #१०_किलो_वजन_कमी होऊन ६० वर आलय जे की आता नॉर्मल आणि स्थिर आहे.  आज फॉर्मल आणि वेस्टर्न कपडे घालूनही फिट दिसण्याच माझ स्वप्न पूर्ण झालय. कारण डिलिव्हरी नंतर माझं पोट फार कमी झालं नव्हतं त्यामुळे मला जे इन करून trosuer, shirt घालावेसे वाटत होते ते माझ्या पोटामुळे मला कधीही घालता आले नाही. पण आज मी कुठेही फिरायला जाताना मला कधी ही न होणारे आणि फिट बसल्यामुळे अवघडल्या सारखे वाटणारे कपडे पण अगदी व्यवस्थित बसायला लागलेत तेव्हा होणारा आनंद शब्दांत न मांडता येणारा आहे. एखाद्या स्त्रीला जेव्हा तिच्या मनासारखा ड्रेसिंग करता येत तेव्हां एक वेगळं सुख असत. मला असं कायम मॉडर्न कपड्यात राहायला आवडत, पण स्वतः च्या शरीराच्या ठेवणी कडे पाहिलं की सगळा उत्साहच निघून जायचा आणि जरी ते कपडे घातले तरी सतत स्वतः बद्दल एक नकारात्मकता निर्माण व्हायची . या संपूर्ण Weightloss च्या प्रवासात नुसतं वजन कमी झाल नाही तर ही एक नकारात्मकता माझ्यात होती एका वेगळ्याच आत्मविश्वासात बदलली. कुठल्या कार्यक्रमात किंवा ऑफीस च्या कामासाठी बाहेर गेल्यावर माझ्यातला हाच बदल पाहून ज्या compliments यायच्या त्यानें तो आत्मविश्वास अजून वाढायचा. एक वेगळी एनर्जी निर्माण व्हायची. कुठल्या गोळ्या पावडर घेऊन weightloss करण्यापेक्षा ह्या सगळ्या प्रोसेस मधून आपला जो सर्वांगीण विकास होतो तो कायम आपल्या सोबत असतो.







रेश्मा मॅडम ना जेव्हा मी फोटोमध्ये पहायचे तेंव्हा लग्नाच्या १७ वर्षांनंतर आणि १४ वर्षाचा मुलगा असताना त्या एवढया लहान दिसतात वयाने तर मला अस वाटायचं की या दिसू शकतात तर मी का नाही, माझं motivation खरतर त्या स्वतःच होत्या. त्यांनी त्यांच्या Fitness Naturo च्या नावाप्रमाणे स्वतः ठेवलेला फिटनेस हाच मला स्वतः मध्ये हे अमुलाग्र बदल घडवायला कारणीभूत ठरला होता.


मला तर वाटत मी रेश्मा मॅडम ची सगळ्यात आळशी मेंबर मीच असेन.  अगदी सुरुवातीलाच मी रेश्मा मॅडम ला बोलले होते की Diet सोबत कायम मला सतत Push करत राहायची गरज लागणार आहे आणि रेश्मा मॅडमनी कायम मला प्रोत्साहन दिलं. कित्येकदा मी नियमित #Follow_Up द्यायला विसरायचे पण रेश्मा मॅडम न विसरता Follow घेत होत्या. म्हणजे पैसे घेतले डाएट दिल की हिशोब संपला अस नाही जे इतर ठिकाणी बहुतांशी आढळत. या संपूर्ण प्रवासात रेश्मा मॅडम नी माझा हात कधीच सोडला नाही कायम एक मोटिवेशन देत राहिल्या.  अगदी साध सोप्प आणि रोजच्या वापरातल डाएट प्लॅन करून मी माझ हे #Weightloss च ध्येय्य पूर्ण केलंय. 












या डाएट दरम्यान च्या काळात मी घरच्या काही कार्यक्रमांमुळे किंवा ऑफिस च्या कामामुळे ब्रेक घेतला त्यामुळे डाएट Strict फॉलो करता आल नाही पण त्याकाळात सुद्धा काय खावं किंवा काय टाळावं याच्या छोट्या छोट्या टिप्स दिल्या त्याही खूप उपयोगी पडल्या.  माझ हे फिटनेस च ध्येय्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही जे काही सहकार्य केलात त्याबद्दल खुप खूप Thank you रेश्मा मॅम Fitness Naturo❤️


No comments:

Post a Comment