Wednesday, November 2, 2022

Chaitanya Kulkarni




Chitanya Kulkarni

(These Feedback are given by Client on various groups, WhatsApp or other Social Media platforms. All these Original Feedback are Copied Here)

Client ID :- 124

Client Name:- Chaitanya Kulkarni

Age:- 23

Job :- TCS

Other Skill:- Japanese Language Instructor

Target Achieved of Weight Loss:- 17Kg (70 Kg To 52 Kg)

Feedback given Facebook Group :-

#SuperPositiveReview

#WeightlossReview
खर तर मला लिहायला जमत नाही पण आज हा Review लिहितीये #Nutritionist + #FitnessConsultant + #Fitness coach #ReshmaJadhav यांच्या साठी, ज्यांनी माझ स्वप्न पूर्ण केलं. मी Chaitanya Vijay Kulkarni, Age 23 जन्म झाला तेव्हा मी #underweight होते आणि २-४ दिवस मला Incubator मध्ये ठेवले होते. त्या नंतर पण कॉलेज ला १२ वीत (२०१६) असे पर्यंत माझं वजन नियंत्रणात होते पण २०१८ पासून वजनात थोडा फरक पडायला लागला, थोडाफार फरक असल्याने २०१९ पर्यंत मी लक्ष दिले नाही. २०२० ला कोरोना आला आणि संपूर्ण जगच बंद पडले आणि तेव्हा पासून माझे वजन लक्षणिय प्रमाणात वाढू लागलं. त्यातच मला #PCOS असल्याचे डॉक्टरांनी निदान केलं. वजनाचा काटा #70.6KG वर जाऊन पोहोचला पण अभ्यास, करियर या गोष्टी तेव्हा जास्त महत्वाच्या वाटल्याने शरीर देत असलेल्या वॉर्निंगकडे मुळीच लक्ष दिले नाही. हा दुर्लक्षितपणा मी ऑक्टोबर २०२१ पर्यंत केला… शिक्षण संपल चांगली नोकरी मिळाली आणि शिक्षण, करियर च्या दृष्टीने थोडंफार स्थिरस्थावर झाल्यावर मात्र या वाढलेल्या वजनाकडे लक्ष जायला लागलं... पूर्वी जसे आपण #स्लिम_ट्रिम होतो तसे पुन्हा होण्यासाठी माझे प्रयत्न चालू झाले. माझा हा शोध जानेवारी २०२२ मध्ये #Fitness_Naturo च्या *Reshma Jadhav* यांच्या इथे येऊन संपला. फेसबुकवर त्यांच्या क्लायंटचे एक दोन आठवड्यातच झालेल्या #Weightloss चे #reviews बघितले असल्याने जास्त चौकशी न करता माझा #Pure_Veg_Diet_Plan चालू केला.
पण खरं सांगायचं तर माझं वजन कमी होईल आणि मी पुन्हा #slim and #trim दिसेन इतका आत्मविश्वास नव्हता. रेश्मा मॅडम सोबत सुरुवातीला जुजबी बोलणं झालं तेव्हा त्यांच्या बोलण्यातून जाणवलं कोणतीही गोष्ट करण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी, काहितरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते याची धमक गरजेची असते. मी स्वतः ला निक्षुन सांगितले मला हे करायचेच आहे. मला काहीही करून आयुष्यातल हे आव्हान स्वीकारायलाच हवं आणि जिंकालायच हवं. आजवर शिक्षण आणि करियर बाबतीत मी जशी मेहनत घेतली तशी आताही मेहनत घेतली तर हे "कठीण ध्येय्य" साध्य करणे "अशक्य" नक्कीच नाहीय.डाएट सुरू झालं आणि बघता बघता पहिला आठवडा संपला आणि वजन 70.6 वरून 67.4 वर आलं. जवळपास 3kg #weightloss मी 10 दिवसांत केलं होतं. वजन काट्यावर मी माझं वजन पाहिलं आणि 10 दिवसांत झालेले बदल पाहून मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. या पहिल्याच Result ने मला खूप प्रोत्साहित केले. एक वेगळा आत्मविश्वास मला मिळाला. आता या #Weightlossjourney मध्ये मी एक पाऊल पुढे टाकलं होतं.
पुढे प्रत्येक दिवशी डाएट follow करत दर आठ दिवसाला रेश्मा मॅडम ना #Followup देत होते. त्यांचं मार्गदर्शन घेत होते. बघता बघता एप्रिल महिना संपत आला आणि माझं वजन एकूण #18kg वजन कमी झालं. वजनाचा काटा #70.6 वरून #52.9 वर आला आणि माझा जीव भांड्यात पडला. 5 महिने केलेला #Strict Diet, रोज न चुकता केलेला #व्यायाम, माझे लाडके पदार्थ, Chinese, Pasta, Biryani, Cake ,samosa आणि Vada pav ची दिलेली कुर्बानी , Reshma ma'am चा खंबीर #support व #valuable #guidance , Last but not the least माझ्या घरच्यांनी दिलेला पाठिंबा, प्रेम या सगळ्या मुळेच हे यश मी मिळवू शकले.
या #Weightloss मुळे मी *PCOS reverse* करण्यात यशस्वी ठरले आहे. नुकतेच नात्यातल्या एका लग्नासाठी मी कपडे खरेदी केले पण एरवी मला XL, XXL कुर्ती लागत होती आता L आणि M अगदी व्यवस्थित होतात हे पहिले तेव्हामाझा आनंद गगनात मावत नव्हता. लग्नात तर प्रत्येकजण हा माझ्यातला लक्षणीय बदल पाहून मला विचारत होता. माझी तर एक कायम सुप्त इच्छा होती की माझे सुद्धा आलीया भट्ट सारखे "Collar Bone" दिसावेत आणि आता ते चक्क दिसतायत...



हे सगळं होता माझ्या Weightloss journey बद्दल,आता थोडं बोलायचं आहे Reshma ma'am बद्दल, ज्यांच्यामुळे हा गड मी सर करु शकले. जेव्हा जेव्हा मी #demotivate झाले तेव्हा तेव्हा तुम्ही मला #motivate करुन "तु हे करू शकतेस" आणि "यशस्वीपणे पूर्ण करू शकतेस" याची जाणीव करून दिली. त्या बोलताना फिटनेस बाबत आणि एकूण सगळ्या परिस्थितीबाबत जेव्हा बोलतात तेव्हा एक वेगळी सकारात्मकता मी कायम अनुभवली आहे. माझ्या या यशात तुमचा सिंहांचा वाटा आहे. पैसे घेऊन #service देणारे खूप असतात पण, क्लायंट च्या मानसिकतेला, आजूबाजूच्या परिस्थितीला आपलेपणाने समजून घेऊन मार्गदर्शन करणे, प्रोत्साहित करणे सगळ्यांना जमत नाही... पण हे कौशल्य तुमच्यात आहे. तुम्ही जेव्हा मार्गदर्शन करता तेव्हा कुणी मोठ्या Dietition आहात वगैरे हा अविर्भाव अजिबात नसतो एक मैत्रीण दुसऱ्या जिवलग मैत्रिणीशी आपलेपणाने बोलतेय अस कायम जाणवतं. या आपलेपणाने कोणतीही गोष्ट share करताना प्रश्न विचारताना मनात कुठलाही किंतु परंतु नसतो. तुमचं मार्गदर्शन आणि आधार त्या प्रत्येकाला मिळो जो माझ्या प्रमाणे weightloss बाबत सिरियसली विचार करत असेल. तुम्ही एक *Best Dietician* म्हणून नावारूपाला येवो अशी मी देवाकडे प्रार्थना करते. माझ्या या weightloss च्या प्रवासात माझ्यासोबत अजून एक व्यक्ती तुमची मोठी फॅन झालीय ती म्हणजे माझी #आई. कोणत्याही आईला तिच्या मुलीच्या आयुष्यात असा अत्यंत आनंदाचा क्षण देणारी व्यक्ती ग्रेटच असते. तिच्याकडून ही तुमचे खूप खूप आभार #Weightloss च्या या प्रवासात माझ्या व्यक्तिमत्वात झालेले लक्षणीय बदल पाहून माझ्याइतकी माझी आई सुद्धा खुश आहे तुमच्यावर... तुमच्या फेसबुक प्रोफाइल वर जेव्हा बरेच जुने फोटो पाहिले तेव्हा कळलं की तुम्ही एक #बेस्ट #डाएटिशियन का आहात ते. तुमच्या जुन्या फोटोत तुमच वजन बऱ्यापैकी वाढलेलं वगैरे दिसलं. जेव्हा तुमच्याशी फोन वर बोलले तेव्हा कळलं तुमचं लग्न झालंय आणि त्याला तब्बल १६-१७ वर्ष झालीत आणि तुम्हाला एक १३-१४ वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर आणि मुलं झाल्यावर अनेक मुलींच्या फिटनेसचे तीन तेरा वाजलेले मी आजूबाजूला पाहिलेत पण तुम्ही तर पूर्वी होतात त्या पेक्षा आत्ताच्या फोटोत अजून तरुण किंबहुना वयाने लहान झालेल्या दिसताय. त्यावरूनच कळलं की फिटनेस तुमच्यासाठी पैसा कमवायचा साधन नाहीय ती एक साधना आहे. फिटनेस तुमच्या रोजच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. तुम्ही स्वतः स्वतःला इतकं फिट ठेवलंय त्यामुळे दुसऱ्यांना फिटनेस चे सल्ले देण्याचा नैतिक अधिकारच तुम्हाला मिळतो. जी व्यक्ती स्वतः इतकी स्लिम ट्रिम आणि फिट आहे तिचा प्रत्येक सल्ला हा योग्यच असणार हे नक्की... खरच रेश्मा मॅडम हे मी सगळं अगदी मनापासून बोलतेय... तसही मी तुम्हाला पैसे पेड केले तुम्ही माझं डाएट दिल मला माझा रिझल्ट आला त्यामुळे असा review वगैरे द्यायची मला तशी फारशी गरज नव्हती. पण तुमच्या डाएट ने मला नुसतं माझं स्लिम ट्रिम आणि आरोग्यपूर्ण शरीर मिळवून दिलं नाहीय तर एक वेगळा आत्मविश्वास सुद्धा मिळवून दिलाय जो मला आयुष्यभर प्रत्येक क्षेत्रात काम करताना उपयोगी पडणार आहे.




So Finally, ही ५ महिन्यांची weightloss journey संपत असली , तरी आता खूप मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे एवढी केलेली मेहनत टिकवण्याची, ती पण मी नक्कीच पेलवू शकेन असा विश्वास मला वाटतो.. खरतर आजच मी माझ्या सगळ्यात आवडता पदार्थ चायनीज खाल्लाय. जवळपास ५ महिने हे खाण मी टाळलं होत. जोवर माझं वजन ५५ पर्यंत जात नाही तोवर चायनीज खायचच नाही असा प्रण केला होता. आणि माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच चांगला म्हणजे #52kg वर वजन आलं आहे.. आता एक मोठं challenge पूर्ण केल्याच्या आनंदात एक Cheat Day तर बनतोच ना. पण हो पुढेही चॅलेंज पूर्ण झाल्यानंतरही तुम्ही दिलेल्या टिप्स कायम लक्षात ठेवीन कारण शेवटी *शरीर हीच संपत्ती आहे आणि ती आपल्याला कायम जपायलाच हवी* हे तुमचं वाक्य मी डोक्यात कायमच फिक्स केलंय. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद रेश्मा मॅडम. मला तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीय. जे weightloss च स्वप्न डिसेंबर २०२१ पर्यंत मला अशक्य वाटत होतं ते २०२२ वर्ष अर्ध होईपर्यंत मी पूर्ण करू शकले. कोणत्याही संकटात सापडल्यावर देव मदतीला धावून येतो तसे तुम्ही आहात माझ्यासाठी. जरी weightloss टार्गेट संपत असलं तरी तुमच्या सारखी मैत्रीण मला कायम माझ्या आयुष्यात हवीय. शेवटी जपानी भाषेतून आभार मानते " 本当にありがとうございました " Onec again Thank You So Much Reshma Jadhav Ma'am & Fitness Naturo







No comments:

Post a Comment