Thursday, August 21, 2025

प्रसन्ना कबाडे

 ही माझी काकी आहे U.S ला राहते. रेश्मा मॅम च कॉन्टॅक्ट मी तिला दिला होता आणि U.S वरून Online Program फॉलो करून आज तिचे 9 वीक मधे 10kg weight loss झाला आहे. तिचा अनुभव मी तिच्या शब्दांत इथे देत आहे.. 


रेश्मा आणि तिच्या टीमचे मी मनापासूनचं आभार मानते 🙏❤️


माझं वजन कमी करण्याचं स्वप्न खूप दिवसांपासून होतं… पण खरं सांगायचं तर मला कधी वाटलंच नव्हतं की मी इतकं achieve करू शकेन. ते शक्य झालं फक्त आणि फक्त रेश्मामुळे. 🌸


रेश्मा फक्त dietician नाही तर ती एक खरी guide आहे. तिचं मार्गदर्शन फक्त वजन कमी करण्यापुरतं नसतं, तर निरोगी आणि टिकून राहणारी lifestyle घडवण्यासाठी असतं. तिच्या प्रत्येक फॉलो-अप कॉलमध्ये ती माझ्याशी इतक्या प्रेमाने बोलायची, विचारपूस करायची की मला नेहमी वाटायचं — मी एकटी नाही, कुणीतरी माझ्यासोबत आहे! 🤗


मी अमेरिकेत राहते. इथलं हवामान, थंड वातावरण आणि व्यस्त दिनक्रमामुळे मी exercise नीट करू शकले नाही. पण तरीसुद्धा फक्त तिच्या diet plan मुळे माझं १० किलो वजन कमी झालं आणि बरेच इंचेसही कमी झाले. 💪✨


सगळ्यात मोठी खूशाली म्हणजे — या diet मध्ये फक्त साधं, घरगुती जेवण होतं. कुठलेही शेक्स, पावडर, गोळ्या किंवा fancy पदार्थ नव्हते. वजन कमी होत असतानाही मला कधी भूक लागली नाही, कधी अशक्तपणा आला नाही आणि कुठलंही craving झालं नाही. उलट मी नेहमीच active, fresh आणि energetic वाटत होते. 🌟


रेश्माची team पण खूपच supportive आहे. कुठलीही शंका असो, छोटा प्रश्न असो — त्यांनी नेहमी ताबडतोब उत्तर दिलं आणि मला प्रोत्साहन दिलं. 🥰


आज जेव्हा मी आरशात स्वतःकडे बघते तेव्हा मला अभिमान वाटतो. हे फक्त माझं नाही, तर रेश्मा आणि तिच्या टीमचं यश आहे. 🌸


मनापासून धन्यवाद रेश्मा… आणि तुला व तुझ्या टीमला माझ्याकडून पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. ❤️✨

इस्टर अस्वले

 मी इस्टर अस्वले, प्रोफेशनने नर्स आहे. खरं सांगायचं तर मला अजिबात अपेक्षा किंवा खात्री नव्हती की मी वजन कमी करू शकेन. पण एका दिवशी PULA वर रेश्मा मॅडमची पोस्ट पाहिली आणि त्यांच्याशी कॉल करून सर्वात आधी हाच प्रश्न विचारला – “मी खरंच वजन कमी करू शकणार ना?”


त्यांच्या प्रेरणादायी आश्वासनानंतर मनात हुरूप आला आणि कुठेतरी थोडीशी आशा निर्माण झाली. पहिला कॉल खूपच आशादायी होता – मॅडम इतक्या छान समजावून सांगत होत्या की मनापासून पटले, “आपणही नक्की बारीक होऊ शकतो.”


मॅडमने चार डाएट प्लॅन दिले – ते सगळे अगदी घरगुती जेवणावर आधारित, कोणतेही शेक, गोळ्या किंवा औषधं नाहीत. माझं सुरुवातीचं वजन 102.6 किलो होतं. काही हेल्थ इश्यू आणि अपघातामुळे मी डाएट पूर्णपणे फॉलो करू शकले नाही, तरीसुद्धा फक्त मॅडमच्या मार्गदर्शनामुळे मी 11 किलो वजन कमी करू शकले.


मनःपूर्वक आभार रेश्मा मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे ❤️🙏

सुनिता लिगाडे


 मी सुचेता लिगाडे.. "मी स्वतः रेश्मा मॅडमचा डाएट प्लॅन घेऊन मागच्या वर्षी 10 किलो वजन कमी केलं होतं ⚖️✨ आणि मला खूप छान परिणाम मिळाले होते. म्हणून मला खात्री होती की माझ्या 55 वर्षाच्या आईलाही 👩‍🦳 जर हा प्लॅन दिला तर तिचं वजन कमी होईल आणि तिचं health सुधारेल 💪.


आईचं वजन जास्त असल्यामुळे तिला उठबस करताना खूप त्रास व्हायचा 😣, प्रवासात पायाला खूप सूज यायची 🦵… हे सगळं बघून मला वाईट वाटायचं 💔.


मग मी आईसाठी रेश्मा मॅडमचा प्लॅन सुरू केला 📋🥗. खरं सांगायचं तर पहिल्याच आठवड्यात 1 किलो वजन कमी झालं ✅ आणि आईला हलकं वाटायला लागलं 🌸. तिच्या चेहऱ्यावर confidence आला 😍, आणि मला पण खूप आनंद झाला 😊.


आठवड्याला होणारे रेश्मा मॅडमचे calls 📞 हा एक मोठा आधार ठरला 🙌. कारण त्यातून guidance 📖 मिळायचं, appreciation 👏 मिळायचं आणि त्यामुळे आई डाएट अजून चांगल्या पद्धतीने follow करायची 👍.


आजच्या घडीला आईचं 10किलो वजन कमी झालं आहे 🎉. तिला थकवा नाही वाटत 😌, उठबस करणं सोपं झालं 🪑, प्रवासात पाय सुजत नाहीत 🚶. सर्वात छान म्हणजे तिचा ऍक्टिव्हनेस खूप वाढला आहे ⚡.


घरच्यांना 🏠, शेजाऱ्यांना 👫, नातेवाईकांना 👨‍👩‍👦 लगेच फरक जाणवला 👀. सगळे कौतुक करतात 🌟, कपडे loose झाले आहेत 👗 हे बघून आईच्या चेहऱ्यावर हसू येतं 😊.


रेश्मा मॅडम खरंच खूप supportive आहेत 🤗. त्यांच्या प्रत्येक कॉलमधून आम्हाला motivation मिळालं 🚀. खरं सांगायचं तर हा प्रवास आईसाठी तर बदल घडवून आणणारा आहे 🌈, पण माझ्यासाठीही खूप emotional होता 🥹.


कारण मी तिला असं हलकं 🌸, आत्मविश्वासाने भरलेलं 💃 आणि happy 😄 बघतेय, हे माझ्यासाठी खूप मोठं achievement 🏆 आहे.


आज मी मनापासून म्हणू शकते


रेश्मा मॅडमचं guidance, support आणि योग्य direction नसतं, तर आईच्या आयुष्यात हा बदल घडला नसता. 🙏❤️

आम्ही दोघींच्या transformation मागे Fitness Naturo by Reshma 🌿💚 यांचा खूप मोठा वाटा आहे.”

विविधा माने


 नमस्कार, मी विविधा माने, पुण्यात IT professional आहे.

PULA group वर बऱ्याचदा रेश्मा मॅमचे positive reviews पाहिले होते. ते पाहून मनात विचार यायचा की आपण पण try केलं पाहिजे.


Delivery नंतर weight वाढतच गेलं होतं. त्यात officeचं बैठे काम. वजन कमी करण्याचा विचार केला पण या-ना-त्या कारणाने राहून जायचं. थोडे घरगुती उपाय केले, पण फक्त 2-3 kg कमी झाले आणि तेही routine change झालं की पुन्हा वाढायचे.


मुलाचा 2nd birthday आणि घराची वास्तुपूजा पार पडली, मग ठरवलं – "अभी नहीं तो कभी नहीं!" कारण घराचं shifting वगैरे सगळं पार पडलं होतं, डोकं शांत झालं होतं, आता कोणताही stress नव्हता.


मॅमना contact केला, सगळे details घेतले, reviews go through केले. परत विचार आला – एवढी fees आपण भरणार आणि diet follow करायला नाही जमलं तर? नवरा चिडवणार जमलं नाही तर? पण मॅम आणि त्यांच्या team ने सगळ्या शंका दूर केल्या.


पहिल्याच आठवड्यात 1 kg पेक्षा जास्त weight कमी झालं. Weekly follow-ups असल्यामुळे cheating चा प्रश्नच नव्हता. खरंतर diet plan एवढा मस्त होता की "diet करतोय" असं कधी वाटलंच नाही. Exercise आणि walk पण करत होते, जमेल तसं.


90 days चा plan 9 week मध्ये complete झाला. Friends, family सगळेच खूप compliments देतायत – "आता छान दिसतेस" आणि "अजून young वाटतेस" म्हणतात. नवरा पण खुश आहे result पाहून – "आता काहीही घातलंस तरी suit होतं" म्हणतो.


आधी photos काढायचीही लाज वाटायची. Face वरच्या fat मुळे close-up photo काढणं बंद केलं होतं. आता बिनधास्त photo काढते. जुने ठेवून दिलेले कपडे आता वापरायला येतायत.


Health issues as such काही नव्हते, पण obesity मुळे आळस यायचा. आता full day खूप fresh & energetic वाटतंय. Healthy routine ची सवय झाली आहे.


Mam, you are the magician! माझं weight एवढ्या लवकर कमी होईल असं वाटलंच नव्हतं.

Thanks a lot Reshma Mam and team for all your guidance & motivation throughout this journey.

स्वरदा निफाडकर


 नमस्कार 🙏 माझे नाव स्वरदा निफाडकर (IT Professional)


माझ्या दुसऱ्या डिलिव्हरीनंतर माझे वजन खूप वाढले होते आणि त्याचबरोबर मला BP ची गोळीही घ्यावी लागत होती. ही गोळी लवकरात लवकर सोडायची होती, पण मी IT प्रोफेशनल असल्याने सतत Work From Home मुळे वजन काही केल्या कमी होत नव्हते. अनेक उपाय करूनही समाधानकारक परिणाम दिसत नव्हते.


अशा वेळी मला आशेचा किरण मिळाला तो Reshma Ma’am यांच्या रूपाने. त्या फक्त एक उत्तम dietician नाहीत, तर खर्‍या अर्थाने एक मोटिवेशनल Mentor आहेत. योग्य वेळी दिलेलं त्यांचं मार्गदर्शन, सतत केलेला प्रोत्साहनाचा वर्षाव, आणि सातत्याने केलेलं follow-up यामुळे माझा हा प्रवास सोपा व आनंददायी झाला.


आज अशी वेळ आली आहे की मला लोक आणि माझ्या मुलाचे मित्र मला पाहून “तुझी बहीण आहे का?” 😅 असे विचारतात, आणि यापेक्षा मोठं compliment मला मिळूच शकत नाही.


Reshma Ma’am यांच्यासोबतच त्यांची संपूर्ण टीमही अतिशय सहकार्य करणारी आहे. प्रत्येक गोष्ट समजावून सांगणं, वेळोवेळी योग्य सल्ला देणं – या सगळ्यामुळे माझा confidence खूप वाढला आहे.


मनःपूर्वक Reshma Ma’am आणि संपूर्ण Fitness Naturo टीम चे आभार मानते 🙏💚

अक्षता कोंडे


नमस्कार मी अक्षता कोंडे.. 
हा review Fitness Naturo by Reshma Dorke साठी आहे.
मी रेश्मा मॅमकडून 3 महिन्यांचा डाएट प्लॅन घेतला आणि मला खूप छान परिणाम मिळाले.

त्यांचा डाएट खूप सोपा आहे आणि त्यासाठी लागणारे सगळे पदार्थ सहज मिळतात. या डाएटमध्ये कोणत्याही गोळ्या किंवा शेक्स नाहीत. भूक लागली की कितीही वेळा खाता येतं, उपाशी राहावं लागत नाही.

पहिल्याच follow-up मध्ये माझं 2 किलो वजन कमी झालं, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. फक्त 8 आठवड्यांत मी 10 किलो वजन कमी केलं.

रेश्मा मॅम आणि त्यांची टीम खूप मदत करणारी आणि सहकार्य करणारी आहे.

धन्यवाद Team Fitness Naturo, मला निरोगी आणि चांगली जीवनशैली शिकवल्याबद्दल.


 

Saturday, August 9, 2025

कृष्णकांत मानगुट्टे



 


#PulaFridayReview 


माझं नाव गायत्री मनगुटे, मी 2 वर्षापूर्वी रेश्मा मॅम कडे माझा एकूण 17kg वेट लॉस केला होता. जो 2 वर्षानंतर अजूनही मेन्टेन आहे. त्यामुळे माझ्या मिस्टरांनी सुद्धा माझ्याकडे पाहून डायट सुरू केले. आणि त्यांचेही 11 आठवड्यात 12 किलो लॉस झाले.. यासाठी त्यांचा रिव्ह्यू हा मी त्यांच्याच शब्दांत इथे देत आहे.


माझं नाव कृष्णाकांत मनगुट्टे आहे. आमच्या फिटनेस प्रवासाची सुरुवात माझ्या पत्नीने केली… रेशमा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तिचं वजन कमी झालं आणि तब्बल दोन वर्षांपासून ती ते यशस्वीपणे टिकवूनही ठेवते आहे 💪✨


तिच्या बदलाने प्रेरित होऊन मी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं ठरवलं. घरचं साधं आणि पौष्टिक खाणं 🍲, नियमित व्यायाम 🏃 आणि एक सकारात्मक दृष्टीकोन – एवढंच केलं... आणि आज मी १२ किलो वजन कमी केलं आहे! 💥


ना कुठले महागडे डाएट, ना प्रोटीन शेक्स... फक्त घरचं प्रेमाने बनवलेलं जेवण ❤️ आणि योग्य सवयींनी आमचं आयुष्यच बदललं.


रेशमा मॅडमच्या डाएट टिप्समुळे आमचं संपूर्ण कुटुंबच आता हेल्दी झालं आहे. आमचा लहान मुलगाही आता सलाड्स आणि हेल्दी फूड आवडीने खातो 🥗  आणि याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो!


आज आमचं कुटुंब जास्त निरोगी, आनंदी आणि फिटनेसबाबत जागरूक आहे.

या सुंदर बदलासाठी मी रेशमा मॅडम आणि माझ्या पत्नीचा मनापासून आभारी आहे 🙏💚


धन्यवाद 🙌 एक चांगलं, फिट आणि आरोग्यदायी आयुष्य दाखवण्यासाठी!

Friday, August 1, 2025

अभिलाषा ढोकणे


#PulaFridayReview 


मी अभिलाषा ढोकणे, वारजे, पुणे (Banker) आहे.

माझ्या सोसायटीतच राहणारी अश्विनीने मला Reshma madam यांच्याबद्दल सांगितलं. ती स्वतः त्यांच्या डाएटवर होती, आणि तिला खूप फरक जाणवला होता. त्यामुळे मीही विचार केला की एकदा भेटून तर बघूया.

सुरुवातीला वाटलं होतं आपल्याकडून होईल का? पण जेव्हा त्यांचं काम, क्लायंटचे रिझल्ट आणि रिव्ह्यू पाहायला लागले, तेव्हा वाटलं नक्की प्रयत्न करून बघायला हवा.

Reshma madam खूप शांत आणि समजून घेणाऱ्या आहेत. त्यांनी सुरुवातीपासूनच माझ्या लाईफस्टाईलनुसार डाएट दिलं जे अगदी घरचं होतं. कुठलाही पावडर, शेक, गोळी नाही. घरचं जेवण आणि घरचा व्यायाम, एवढंच सगळं केलं.

पहिल्या follow-up नंतरच एक पॉझिटिव्ह energy जाणवली. लहान फरक दिसत होता, पण तोच खूप मोठा वाटत होता. 14 आठवड्यांत 15 किलो कमी झालं! शरीर हलकं झालं, एनर्जी वाढली, आणि सगळ्यात महत्त्वाचं.. आत्मविश्वास वाढला.

मला PCOD चा त्रास होता.  पाळी नियमित नव्हती, खूप चिडचिड व्हायची. पण आता सगळं खूप सुधारलं आहे.

Reshma madam फक्त डाएटिशियन नाहीत, त्या खरंच एक मोटिवेट करणाऱ्या मार्गदर्शक आहेत. त्यांनी मला वेळोवेळी समजावून सांगितलं, प्रोत्साहन दिलं, आणि माझ्यावर विश्वास ठेवायला शिकवलं.

आता लोक म्हणतात , "तू खूप बदललीस!" आणि हो, मीही आतून खूप बदलले आहे.

हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे – आणि तो शक्य झाला फक्त Reshma madam आणि Fitness Naturo टीममुळे.
धन्यवाद मनापासून! 💖


 

मानसी अमिनभावी



#PulaFridayReview 

नमस्कार, मी मानसी अमिनभावी.
चार महिन्यांपूर्वी मी Fitness Naturo by Reshma बद्दल फेसबुकवर वाचलं...
तिथे बघितलेले अभिप्राय इतके खरेखुरे आणि मनाला भिडणारे होते, की मनात एक आशा निर्माण झाली 
"आपणही हे करू शकतो का?"

माझं वजन दोन प्रेग्नेंसीनंतर बऱ्याच प्रमाणात वाढलं होतं.
वेगवेगळे उपाय, डाएट्स, एक्सरसाईजेस... पण फारसा काही उपयोग झाला नव्हता.
या वेळी देखील मनात संकोच होता . खरंच फरक पडेल का?
आपल्याला नोकरी सांभाळून सगळं जमेल का...?

पण एक क्षण असा आला, जिथे मनाने ठाम निर्णय घेतला –
"आता नाही तर कधीच नाही!"
आणि मी रेश्मा मॅमना कॉल केला...

त्या फोन कॉलमध्ये त्यांनी इतक्या शांतपणे, समजून सांगितलं,
प्रत्येक प्रश्नाचं अतिशय संयमानं समाधान दिलं.
आणि हो... काही गोष्टी फॉलो कराव्याच लागतील, हेही प्रामाणिकपणे सांगितलं.
हीच गोष्ट मला खरी भावली, स्पष्ट बोलणं आणि त्यामागचं प्रेमळ पण ठाम मार्गदर्शन!

फिटनेस नॅचरो चां प्रत्येक आठवड्याचा फॉलोअप कॉल…
हा तर माझ्यासाठी game-changer ठरला!
आपल्याला कुणालातरी रिपोर्ट द्यायचाय, हे लक्षात राहिलं की, आपणही जबाबदारीनं पावलं उचलतो.
डाएट पूर्णपणे घरचं, सोपं…
कोणतेही पावडर, गोळ्या, शेक्स नकोत, याचंच मला खरं समाधान वाटलं.

पहिल्या आठवड्यात २ किलोहून अधिक वजन कमी झालं…
कपाटात पडून राहिलेले जुने कपडे परत फिट व्हायला लागले…
तो आनंद… तो आत्मविश्वास… तो शब्दात सांगता येणारा नाही!

मध्ये काही कारणांनी डाएट थोडं हाताबाहेर गेलं…
पण मॅमने त्यासाठी सुद्धा योग्य प्लान दिला.
त्यांचं आणि त्यांच्या टीमचं एकूण सपोर्ट इतका खूप आहे, की कुठल्याही अडचणीत आपण एकटे नसतो,
हे प्रत्येक वेळी जाणवतं.

रेश्मा मॅमचं पॉझिटिव्ह बोलणं, गरज असेल तर थोडं ठामपणे मार्गदर्शन करणं –
या सगळ्यामुळेच मी चार महिन्यांचा प्लान फक्त १० आठवड्यात पूर्ण करू शकले...
आणि आज मी १५ किलो वजन कमी केलं आहे!

आज मी आधीच्या साईजच्या अगदी खाली आहे...
आधी जे ड्रेस नुसते आवडायचे  पण साईज नसल्यामुळे परत ठेवावे लागायचे.
ते आता माझ्यासाठी सहज मिळतात.

सर्व नातेवाईक, मित्रमैत्रिणी, ऑफिसमधील लोकं –
"काय बारीक झालीस गं!"
असं म्हणतात…
ते ऐकून मन भरून येतं , कारण हा प्रवास सोपा नव्हता…
पण नक्कीच अमूल्य होता.

माझ्या नवऱ्याचं खास कौतुकाचं वाक्य,
✨ "Special comment from my husband on this weight loss result which was special gift for me." ✨

आज मला वाटतं, व्यायाम आणि प्रमाणात खाणं हे माझ्या जीवनशैलीचा भाग झालं आहे.
हीच सवय कायम ठेवायची आहे – कारण आता आरोग्य म्हणजेच आत्मसन्मान, हे समजलंय.

रेश्मा मॅम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं
मनापासून आभार…
तुमच्यामुळेच हे शक्य झालं!
आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा! 💖🙏


 

मयूरी कांबळे


#PulaFridayReview


माझं नाव मयूरी कांबळे. मागच्या काही वर्षांत माझं वजन हळूहळू वाढत गेलं होतं. खूप वेळा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या पण काहीच परिणाम होत नव्हता. मला असं काहीतरी हवं होतं जे नैसर्गिक पद्धतीने, घरच्या जेवणातून वजन कमी करून देईल. अशाच वेळेस मला पूलावर रेश्मा जाधव मॅडम यांचे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज वाचायला मिळाले.

रिव्ह्यू वाचल्यावर मी त्यांना कॉल केला. मनात थोडी भीती होती की खरंच फक्त घरचं जेवण खाऊन वजन कमी होईल का? पण रेश्मा मॅडमचा नंबर सेव केल्यानंतर रोज त्यांचे स्टेटस दिसू लागले आणि प्रत्येकजण वजन कमी करताना पाहून माझा आत्मविश्वास वाढू लागला. शेवटी ठरवलं – "एकदा ट्राय करून बघू या!"

मी त्यांना पुन्हा मेसेज करून प्लॅनची माहिती घेतली आणि 20 फेब्रुवारीपासून डाएट सुरू केलं. पहिल्याच आठवड्यात २ किलो वजन कमी झालं आणि मी खुश! तिथून माझी जर्नी सुरू झाली आणि सकस घरच्या जेवणातून अवघ्या १० आठवड्यात "७५ किलो वरून ५९ किलो वर आले!!"

सर्वात खास म्हणजे –
❌ कुठलीही गोळी नाही
❌ कुठलेही सप्लिमेंट्स नाहीत
❌ कुठलाही वेगळा स्वयंपाक नाही
❌ वेळेचं बंधन नाही
✅ फक्त घरचं जेवण आणि मॅडमचं मार्गदर्शन!

आज माझा आत्मविश्वास परत आला आहे, जुने कपडे परत फिट होऊ लागलेत, आणि लोक विचारू लागलेत – "तू काय केलंस एवढं?"
उत्तर एकच – रेश्मा मॅडमचा नैसर्गिक आणि शाश्वत डाएट प्लॅन!

त्यांचा स्टाफही खूप सपोर्टिव्ह आहे, आणि मॅडम प्रत्येक आठवड्याला फॉलोअप घ्यायच्या. माझ्यासाठी ही जर्नी इतकी सोपी आणि सुंदर झाली आहे, की वाटतं ... हे मी खूप आधीच का नाही केलं!

माझा अनुभव सांगतो – जर तुम्हाला खरंच नैसर्गिक पद्धतीने, कुठलाही त्रास न होता वजन कमी करायचं असेल, तर डोळे बंद करून रेश्मा मॅडमचा डाएट प्लॅन फॉलो करा. १००% रिजल्ट मिळतो!

Thank you so much Reshma Madam! ❤️🙏
माझ्या जीवनात इतका मोठा सकारात्मक बदल घडवून आणल्याबद्दल!..