Wednesday, April 23, 2025

पंकज मुळे




 माझे नाव पंकज मुळे असून माझं वय ३४ वर्षं आहे. मी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो, त्यामुळे माझं काम पूर्णपणे बसून करणं म्हणजे "sedentary" आहे. कोरोना काळात हे प्रमाण आणखी वाढलं आणि त्याच दरम्यान माझं वजनही झपाट्याने वाढून जवळपास १०० किलोपर्यंत गेलं.


कोरोनानंतर मी स्वतः काही घरगुती उपाय आणि हलक्याफुलक्या व्यायामांनी वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. पण नियमितपणा आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे काही फारसा फरक पडला नाही.


माझ्या wife ne काही महिन्यांपूर्वी Reshma Ma'am यांच्याकडे weight loss program सुरू केला. तिचि progress बघुन मलाही motivation मिळाल. मीही मग same weight loss program सुरू केला


पहिल्याच आठवड्यात माझं ४ किलो वजन कमी झालं आणि मला खरंच खूप आश्चर्य वाटलं! विशेष म्हणजे यासाठी मी कोणताही कठीण व्यायाम, महागडे सप्लिमेंट्स किंवा डाएट शेक्स घेतले नाहीत. रेश्मा मॅडम यांनी सांगितलेल्या साध्या आणि घरच्या diet and light exercise मुळे हा बदल शक्य झाला.


फक्त ११ आठवड्यांत मी १५ किलो वजन कमी केलं. दरम्यान मी २ आठवड्यांसाठी Kashmir la सुट्टीसाठी गेलो होतो, जिथे रोज हॉटेलचा खाणं होतं, तरीही रेश्मा मॅडम यांनी दिलेल्या टिप्समुळे मी माझं वजन टिकवून ठेवलं.


माझी युरिक अ‍ॅसिडचा problem देखील होता. तो लक्षात घेऊन त्यांनी diet इतक्या बारकाईने तयार केला की त्यामुळे युरिक अ‍ॅसिडवर नियंत्रण मिळालं आणि तब्येतही सुधारली.


या प्रवासामुळे माझं वजनच नव्हे तर माझी ऊर्जा, स्टॅमिना, आत्मविश्वास आणि एकूणच ताजेपणा वाढला आहे. हलक्याफुलक्या भाषेत सांगायचं झालं तर आता मला नवीन कपडे घ्यावे लागले आणि पट्ट्यालाही नवीन holes करवावी लागली!



रेश्मा मॅडम यांच्याबद्दल कृतज्ञतेचे शब्द अपुरे आहेत. त्यांनी केवळ आमचं शरीरच नव्हे तर आमचं संपूर्ण आयुष्य positively बदलून टाकलं. त्यांचं मार्गदर्शन आणि वैयक्तिक लक्ष यामुळे आमचा संपूर्ण lifestyle change झालं.


ज्यांना वजन, तब्येतीच्या तक्रारी किंवा आळशीपणा वाटतो – त्यांनी अजिबात वेळ वाया घालवू नये. हा केवळ वजन कमी करण्याचा प्रवास नसून स्वतःचं आयुष्य पुन्हा उभारण्याची opportunity आहे.


Reshma Madam, तुमचे मनापासून आभार. तुम्ही आम्हाला नव्याने जगायला शिकवलंत.


No comments:

Post a Comment