Friday, January 10, 2025

Samada Sawant

 माझ् नाव संपदा सावंत. 

मी IT Engineer आहे. PULA गृप वर मला रेश्मा मॅडम बद्दल माहिती मिळाली. यापूर्वी मी आधी स्वतःहून डायटिंग करायचा प्रयत्न केलेला, पण दोन दिवसातच ते बंद व्हायचं, त्यामुळे थोडी भीती होती की आपण प्लॅन पूर्ण करू शकू का? नक्की वजन कमी होईल का? घरचं जेवण सांभाळून वेगळं जेवण बनवता येईल का?

               मी रेश्मा मॅम चे खूप रिव्ह्यू पाहिलेत, त्यात सगळेच म्हणत होते की, घरातीलच नेहमीचेच पदार्थ वापरुन जेवण असतं, कुठलेच शेक सप्लीमेंट्स नसतात. नंतर मी मॅम बरोबर कॉल घेतला त्यात त्यांनी समजावले त्यामुळे कॉन्फिडन्स अजून वाढला आणि आम्ही फायनली वेटलॉस प्लॅन घ्यायचा ठरवला.


           पहिल्याच विकमध्ये दोन अडीच किलो वजन कमी झाले होते आणि तेही खाऊन पिऊन, उपाशी न राहता त्यामुळे खूप छान वाटत होतं. 

रेश्मा मॅमचा (@FitnessNaturo) चा सगळा स्टाफ खूप सपोर्ट करत होता.. ते विचारलेल्या क्वेरीचे लगेच उत्तर द्यायचेत. नेहमी मोटिव्हेट करायचेत. 

          माझे 9 आठवड्यात जवळपास 14 ते 15 किलो वजन कमी झाले आहे. आता खुप छान वाटत आहे, पुर्वी चे सगळे कपडे होत आहेत. फीट ॲण्ड  फ्लेक्सिबल झाली आहे.

            रेश्मा मॅम कडे वेटलॉस च्या सगळ्या क्वेश्चन चे उत्तर असते. त्या नेहमीच मोटिव्हेट करत होत्या. 

          डाएट मधील काही ठराविक फूड जे घरच्या जेवणातूनच होते पण मी कधी खाल्ल नव्हत, पण मॅम कडे खूप छान रेसिपीज होत्या, त्यामुळे खाणं खूपच सोप्प झाल.

                 सुरुवातीला फ्रेंड आणि घरातील काळजी मूळे ओरडत होते. तब्येत खराब होइल, जमणार आहे का इतकं, पण आता सर्वजण खूप छान आणि फिट दिसते आहेस अस म्हणतात.

                मला आधी जिने चढून जाताना दम लागत होता. आता त्रास होत नाही. पूर्वी मला, मी स्वतः खूप old असल्यासारखे  वाटत होत,  आता मला स्वतःलाच एकदम छान वाटतं. आणि खूप कौतुक ऐकून तर खूप छान स्माईल येतं..

No comments:

Post a Comment