माझ नाव प्रज्ञा दळवी. वय वर्ष 58. मी एक रिटायर्ड व्यक्ती आहे. मी फेसबुक वर पुल वर रेश्मा च्या डाएट प्लॅनमुळे झालेल्या फायद्याबद्दल वाचत होते.
माझं वजन थायरॉईड मुळे खूप वाढलं होतं. एक दोनदा डाएट चा प्रयत्न करुन पाहिला होता पण फार काही फरक पडत नव्हता.
असंच एकदा मनात आले की रेश्मा शी बोलून बघूया.
रेश्मा ने माझ्या सगळ्या शंकांचे निरसन करून मला विश्वास दिला की ५८ व्या वर्षी ही थायरॉईड असूनही वजन कमी होवू शकते.
५ नोव्हेंबर पासून माझं डाएट सुरू झाले.रेशमा आणि तिच्या टिमने योग्य मार्गदर्शन केले. आश्चर्य म्हणजे पहिल्याच आठवड्यात २ किलो वजन कमी झाले.माझा आत्मविश्वास खूपच वाढला.
डाएट पाळून आणि व्यायाम करुन ३ महिन्यांचं माझ टार्गेट अगदी 6 आठवड्यात पूर्ण झाले. १० किलो वजनाचे माझं टार्गेट डिसेंबर महिन्यात पूर्ण झाले.
याचं सगळं श्रेय रेश्मा ला जाते. दर आठवड्याला फॉलोअप मध्ये रेश्मा ने खूप प्रोत्साहन दिले.
या काळात लग्नात जेवून ही मी वजन कमी करु शकले.
जेवणाची योग्य पद्धत रेश्मा च्या डाएट मुळे कळली.या पुढे वजन वाढू न देण्यासाठी काळजी कशी घ्यावी हे कळल्यामुळे मला पुढेही फायदा होणार आहे.
रेश्मा तुला खूप खूप धन्यवाद.
No comments:
Post a Comment