नमस्कार मी डॉ. अस्मिता कुलकर्णी.
मला फेसबुक वरून #FitnessNaturo च्या रेश्मा मॅम बद्दल माहिती मिळाली होती...
खूप दिवसापासून ठरवत होते की वजन कमी करायचे पण कळतं पण वळत नाही अशी गोष्ट होती... मग आपल्याला गुरू हवा तरच मनावर घेऊ आपण आणि मग चौकशी केली रेश्मा मॅडम कडे...
4 वर्षा पूर्वी पण मी हर्बल लाईफ चे product वापरून वजन कमी केले होते पण ते परत वाढले ... म्हणून मी सस्टेनेबल प्रोग्राम शोधत होते... त्यात #FitnessNaturo चे विविध क्लायंट चे review वाचून वाटले इथे नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतील...
जॉईन झाल्यावर पहिल्याच आठवड्यात माझे जवळपास 2 किलो ने वजन कमी झालेले होते आणि माझी मान दिसायला लागली होती 😄.. म्हणून मी फार खुश होती.. आणि माझा उत्साह वाढला..
टीम फिटनेस Naturo ने रेश्मा मॅडमचे मार्गदर्शनाखाली कायमच वेळेआधी फॉलो अप कॉल ची आठवण करून देणे व कॉल अरेंज करणेचे काम अत्यंत चोखपणे केले आहे... काही कारणास्तव शक्य नसेल तर आधी किंवा नंतर कॉल schedule करणे हे ही केले आहे ...
आता मला काय फील होतंय...
हे सांगण्यासाठी शब्द कमी पडतील....😊
खरच खूप खूप हलके वाटते आणि सर्वात महत्वाचे खूप आत्मविश्वास वाढला आहे, जो की बेढब दिसत असल्याने फार कमी झाला होता ... मला आता जगण्यात उत्साह वाटू लागला आहे आणि मी माझ्या मैत्रिणी आणि बहिणी ना पण healthy असावे याबाबत आग्रह करत आहे...
सुरुवातीला अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाल्याने खूप आनंद आहे.
शेवटी अथक परिश्रम, दृढ निश्चय आणि योग्य मार्गदर्शन असेल तर हे कठीण काम सोपे वाटू लागते हे मात्र निश्चित...
रेश्मा मॅडम त्याच्या कामाशी अत्यंत प्रामाणिक आहेत, अनेक फॉलो अप कॉल दरम्यान हे जाणवत होते मला कारण माझा एखादा चांगला अनुभव किंवा माझी जिद्द इतर कोणाला प्रेरणा देऊन जाईल हे कायमच वाटत राहते त्यांना...
मॅडम नेहमीच समजून सांगतात पण विद्यार्थी मागे पडत आहे हे लक्षात आले की त्या कडक पवित्रा घेतात जे अत्यंत आवश्यक असते..
वजन कमी करणे खर तर मी आणि माझा नवरा दोघेही ठरवत होतो पण मी मनावर घेतले आणि सुरू केले ... सण वार चे दिवस होते तर पाहुणे आणि मित्र मंडळी येत जात होतीच... सतत compliment मिळतच होते पण माझा नवरा कमी होत जाणाऱ्या माझ्याकडे बघून जाम खुश होता ... आणि माझा भाऊ जो मला नेहमी वजनावरून बोलत असे त्याने तर मला परत कॉलेज मधेच पाठवले ... हे दोन खास अभिप्राय होते माझ्यासाठी..
मी प्लान सुरू केला तेव्हा श्रावण महिना सुरू झाला होता ... माझे घरी सर्व सण वार सोवळे रीतसर पाळले जातात आणि ते सर्व मालच करावे लागते .. माझ्या सासूबाई म्हणाल्या अगं रोज घरात गोड धोड होणार आणि तू खाणार नाही ... कसे वाटेल ते... मी म्हटले आता मुळीच नाही ..यावेळी मला थांबवू नका ... मग त्या शांत बसल्या पण त्यांना वाईट वाटायचे ... आता वजन कमी झाले आहे तेव्हा खूप खुश आहेत त्या...
पूर्वी वाढलेल्या वजनामुळे दम खूप लागायचा , शारीरिक हालचालींना मर्यादा आल्या होत्या. . त्या नक्कीच कमी झाल्या आणि दम लागणे ही कमी झाले...
पहिला कॉल जेव्हा माझा रेश्मा मॅडम सोबत झाला तेव्हा मी वाढलेल्या वजनामुळे खूप कमीपणा फिल करत होते समाजात वावरताना पद प्रतिष्ठा सर्व काही असूनही कायम एक पाऊल मागेच आहोत आपण असे सतत जाणवत असे....
पण....
आता मात्र....
मी खूप उत्साही झाले आहे, माझा आत्मविश्वास ही वाढला आहे आणि मुख्य म्हणजे मी स्वतः वर प्रेम करायला लागले आहे 💓 आणि या वयात (४० शी चे पुढे ) हे सर्व खरच किती आवश्यक आहे हे सर्वजण जाणतात च...
Finally Thanks a Ton to Reshma mam and Team for achieving this Target 🎯
Note: खरं तर मी ९ ते १० आठवड्यात हे साध्य करू शकले असते पण सन वार, घरगुती अडचणी तसेच नोकरी करताना येणारे challanges यामुळे ते शक्य झाले नाही पण असो... काही हरकत नाही 😄
माझ्या चिकाटीचे रेश्मा मॅडम नेहमीच कौतुक करायच्या पण गौरी गणपती चे वेळी माझे वजन एक किलो ने वाढले आणि दसऱ्या नंतर दिवाळी आधी टार्गेट पूर्ण केलं च पाहिजे म्हणून ... २ वेळा मॅडमचा ओरडा मी खाल्ला.... पण तो खरच फार आवश्यक होता 🫣
मला motivate करण्या साठी...
योग्य मार्गदर्शनखाली सातत्याने केलेले प्रयत्न फळाला आले म्हणून खूप आनंदी आहे 😊🙏🏻🙏🏻🙏🏻