#PULAFridayReview
नमस्कार, मी तेजल पवार.
लग्नाआधी 46 किलोवरून सुरु झालेला माझा स्वतःच्या वजनाचा प्रवास दोन डिलिव्हरीनंतर 76 आणि त्यानंतर menopause मध्ये सुरू झालेला हा प्रवास, "आता थांबायचं नाय" असे करत ८४ किलोवर येऊन कधी पोहोचला, हे समजलेच नाही... 😄
आता घरातले म्हणायला लागले, "वजन कमी कर, कारण वजना बरोबर आजारपण येतात!" पण मी "खात्यापित्या घरची सून वाटली पाहिजे" असे म्हणून हसण्यावारी नेत होते.
बराच वेळा वजन कमी केले पाहिजे असे वाटायचे परंतु ऐकिवात असलेले बरेचसे प्लॅन काहीतरी सप्लीमेंट घेऊन वजन कमी करायचे, या प्रकारातले होते ज्याला माझ्या मिस्टरांचा साईड इफेक्टची शक्यता असल्याने पूर्ण विरोध होता.
यानंतर पुल पुणे लेडीज ग्रुप वर रेश्मा मॅमच्या या प्लॅनच्या बद्दल एक positive review वाचला ज्यात मला समजलं की हा डायट प्लॅन पूर्णपणे घरगुती आहे. यासाठी कुठलेही सप्लीमेंट लागत नाही यानंतर मी रेश्मा मॅम ला contact केला आणि मी हा प्लॅन घ्यायचा विचार करतेय याबाबत घरात सगळ्यांना कल्पना दिली. पण माझ्या इतिहासानुसार मी हे करू शकणार नाही यावर माझ्या मुलीने शिक्कामोर्तब केले आणि मला ही वाटले खरंच आपल्याकडून नाही झालं तर... कारण आमच्या घरामध्ये आम्ही सर्वजण खाण्याच्या बाबतीमध्ये खूप foodie आहोत आम्हा सर्वांना मसालेदार, चमचमीत पदार्थ आणि बेकरी प्रॉडक्ट्स खूप आवडतात. हे खाणे शरीरासाठी चांगलं नाही हे कळतं पण वळत नाही...
परंतु एका routine blood check up report मधील माझ्या HBA1C ची रेंज प्री-डायबेटिक या कॅटेगरीमध्ये आल्यामुळे मात्र मी वजन कमी करण्याबाबत गांभीर्याने विचार करू लागले आणि "रेश्मा मॅमच्या इतर clients ला जमतं तर मला का नाही जमणार?" असा विचार करून मी मॅमचा प्लॅन घेऊन वजन कमी करण्याचा निश्चय केला आणि रेश्मा मॅमच्या दिसणाऱ्या स्टेटस मूळे माझा निश्चय आणखी दृढ झाला.
जुलै महिन्यापासून रेश्मा मॅम कडून प्लॅन घेऊन माझी नवीन प्रवासाला सुरुवात झाली. या प्रवासात पहिल्याच आठवड्यात माझे वजन दीड किलोने कमी झाले तेही घरच्या आहारात...
माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता. मला जसं आठवतं तसं माझं वजन पहिल्यांदाच कमी होत होतं, नाहीतर वजनाचा आलेख कायम चढता असायचा... 😄
मी खूप खुश झाले आणि मॅडमने सुद्धा कौतुक केलं त्यामुळे मी आणखी उत्साहाने मॅमच्या टिप्स follow करायला लागले.
या प्रवासात वजन खूप लवकर कमी होत होतं. परंतु मध्येच मला गोचीड तापामुळे पाच-सहा दिवस ऍडमिट व्हायची वेळ आली. त्यावेळेस मला आजारी आहे, यापेक्षा आता माझं वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये विलंब होईल याचं वाईट वाटत होतं. या काळात सुद्धा रेश्मा मॅम आणि त्यांचा स्टाफ यांनी खूप सपोर्ट केला.
"सध्या तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तुम्हाला बरं वाटलं की आपण परत सुरुवात करू". असा धीर दिला.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मी पुन्हा सुरुवात केली. यानंतरही प्रत्येक वेळेस मॅडमने प्रोत्साहन दिले आणि माझ्या अनंत शंकांचं निरसन केलं फक्त त्यांच्यामुळेच मी माझं टार्गेट पूर्ण करू शकले.
पूर्वी मला थोडं चाललं तरी दम लागायचा तो आता लागत नाही. हा अशक्यप्राय वाटणारा प्रवास पूर्ण झाल्यामुळे माझा आत्मविश्वास पण वाढला आहे. खरं सांगायचं तर मी आतून बाहेरून पूर्ण बदलले आहे. आता मी जेव्हा बाहेर जाते तेंव्हा प्रत्येकाला माझ्यात झालेला बदल लगेच जाणवतो. त्यांच्या प्रतिक्रियांनी मन सुखावते.
हे सर्व रेश्मा मॅम मुळे शक्य झाले.
त्यांनी माझ्या पूर्ण प्रवासात मला दीपस्तंभ प्रमाणे मला दिशा आणि मार्ग दाखवला आणि मला माझ्या इच्छित स्थळी पोहोचवले. त्याबद्दल रेशमा मॅम आणि त्यांच्या स्टाफ यांचे मनःपूर्वक आभार... 🙏🏻🌹

No comments:
Post a Comment