Friday, December 19, 2025

निषाद रमेश कोंडे


 जवळपास साडेतीन वर्षांपूर्वी – जून 2022 मध्ये मी.

सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. निषाद रमेश कोंडे

यांनी Fitness Naturo by Reshma कडे वेट लॉससाठी सुरुवात केली.


खास सांगायचं तर –

👉 कुठलीही पावडर, शेक, फॅन्सी डाएट नाही

👉 फक्त घरचं जेवण खाऊन


अवघ्या 4.5 महिन्यांत त्यांनी 19 किलो वजन कमी केलं.


वजन कमी झालं आणि त्याचबरोबर

✔️ कोलेस्टेरॉलचा त्रास गेला

✔️ हायपर ॲसिडिटी पूर्ण बंद झाली

✔️ बीपी कंट्रोलमध्ये आला


आज या सगळ्या गोष्टींना साडेतीन वर्ष झाली आहेत,

पण सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे –

रेश्मा मॅम यांनी दिलेल्या Maintainance Tips मुळे आजही माझं वजन तसंच आहे.


ना वजन वाढलं, ना त्रास परत सुरू झाला.

हेच खरं यश आहे असं मला वाटतं.


म्हणून हा रिव्ह्यू फक्त वेट लॉससाठी नाही,

तर मेंटेनन्ससाठी आहे –

कारण वजन कमी करणं सोपं असतं,

पण ते टिकवणं खरी कसरत असते.


आज मी खूप आनंदात, एनर्जेटिक आणि हेल्दी आहेत.

त्यांच्या या हेल्दी आयुष्याबद्दल

रेश्मा मॅम यांचे मनापासून आभार आणि कौतुक व्यक्त करण्यासाठी

मी हा रिव्ह्यू देत आहे

मनिषा शिंदे


 माझं नाव मनिषा शिंदे. मी MS Cleaning Services ची owner आहे.

मला Fitness Naturo बद्दल माहिती PULA (Pune Ladies Association) या फेसबुक ग्रुपवरच्या पोस्टमधून आणि काही सदस्यांनी दिलेल्या पॉझिटिव्ह रिव्ह्यूजमधून मिळाली. सुरुवातीला मनात थोडी शंका होती – “हे खरंच माझ्यासाठी काम करेल का?” पण पेजवरचे रिझल्ट्स आणि Before–After फोटो पाहिल्यावर मनात एक आशा निर्माण झाली की मी सुद्धा हे करू शकते.


आता माझी चाळीशी जवळ येत होती आणि पुढे कोणतेही आजारपण नको म्हणून मला वेट लॉस करायचा होता. Reshma ma’am च्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी जे अगदी सोप्या आणि सहज भाषेत समजावून सांगितलं, ते मला खूप भावलं. त्याच क्षणी मी Fitness Naturo जॉईन करण्याचा निर्णय घेतला.


जॉईन केल्यानंतर पहिल्याच फॉलो-अपनंतर मला खूप हलकं आणि पॉझिटिव्ह वाटू लागलं. त्यांनी माझ्या रोजच्या दिनचर्येनुसार जे बदल सुचवले, त्यामुळे मला जाणवलं की हे केवळ “डाएट” नसून एक जीवनशैली बदलण्याची प्रक्रिया आहे.


या संपूर्ण प्रवासात मला नेहमीच उत्तम रिस्पॉन्स, योग्य गाईडन्स आणि सातत्यपूर्ण सपोर्ट मिळाला. कधीही काही शंका आली, तर लगेच रिप्लाय मिळायचा. माझ्या प्रत्येक प्रश्नाला संयमाने आणि प्रेमाने उत्तर देण्यात आलं, त्यामुळे मी हा प्रवास सातत्याने पुढे नेऊ शकले.


आता वजन कमी झाल्यानंतर मला स्वतःबद्दल खूप छान वाटतंय. शरीर हलकं झालं आहे, उत्साह वाढला आहे आणि आत्मविश्वास तर प्रचंड वाढलाय. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे माझे जुने, लग्नावेळचे कपडे पुन्हा मला फिट यायला लागले आहेत.


Reshma ma’am या फक्त कोच किंवा मेंटॉर नाहीत, तर त्या एक मैत्रीणसारखी साथ देतात. कुठेही ओरड न करता, चूक झाली तर प्रेमाने समजावून सांगण्याची त्यांची पद्धत मला खूप आवडली.


या प्रवासात अनेक खास क्षण आले. पहिल्या महिन्याच्या शेवटी जेव्हा वजनकाटा खाली गेलेला दिसला, तो आनंद शब्दात सांगता येणार नाही असा होता. आणि जेव्हा ओळखीच्या व्यक्तीने विचारलं, “तू बारीक झाली आहेस का?” तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता.


सुरुवातीला घरच्यांना वाटायचं की आम्ही foodie family असल्यामुळे डाएट फॉलो करणं मला कठीण जाईल. पण आता माझा बदललेला लूक, वाढलेली एनर्जी आणि आत्मविश्वास पाहून सगळेच खूप खुश आहेत आणि मनापासून कौतुक करत आहेत.


पूर्वी मला कारण नसताना खूप जास्त घाम यायचा, पण वजन कमी झाल्यानंतर त्याचं प्रमाण नक्कीच कमी झालं आहे असं मला स्पष्टपणे जाणवतंय.


आजचा मी आणि पूर्वीची मी – यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. केवळ वजनच नाही, तर संपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि सौंदर्य बदललेलं मला स्वतःला जाणवत आहे.


👉 4 महिन्यात 17 किलो वजन कमी हा माझ्यासाठी केवळ आकडा नाही, तर एक नवीन, आरोग्यदायी आयुष्याची सुरुवात आहे 💚


Dear Reshma Mam


I wanted to take a moment to express my heartfelt gratitude for all your guidance and support. Your expertise and personalized advice have made a significant difference in my health and well-being. Thank you for being an amazing dietitian and for helping me achieve my goals!

It’s my life time memories bcoz of you❤️

Thank you is really very small word for you as you changed my life style forever❤️


Thanks a lottt for everything😘


With Best Regards,

Manisha

Sangita Bhalerao


 #PULAFridayReview


I had been reading reviews of Pula for almost a year, but I was hesitant to join. I had tried so many diets in the past, and the fear of “What if I fail again?” always held me back.


In March 2025, I decided to take a small step toward discipline by eating only twice a day. It helped me lose around 2-3 kgs, but soon enough, the weight loss stopped.


By August, I finally gathered the courage to at least speak to someone—and that’s when I reached out to Reshma Ma’am. I told her very honestly that the timing felt impossible: I had festivals coming up, office workload, home responsibilities… everything. And I kept postponing because I wasn’t sure it was the “right time.”


She calmed me down beautifully and said, “You’ll know when it’s the right time. Just start.”

That reassurance stayed with me, and I began my journey just before the Ganesh Festival.


A big thanks to my daughter too—she encouraged me and reminded me that starting during the busiest, most festive month was actually a brave decision.


What surprised me the most was how quickly I started seeing change. The first week itself showed results, and that was my biggest motivation! The diet was simple, practical, and perfectly manageable even with a hectic work–home schedule. And most importantly—I never felt starved.


Of course, the journey wasn’t without challenges: festivals, fasting, office dinners, travel, Diwali… and more! 😊 But every time I slipped or worried, Reshma Ma’am guided me with tips, motivation, and constant support. That made all the difference.


One of the happiest moments came last month when I fit into a trouser from 10 years ago—two sizes smaller! I can’t express how good that felt.


I’m not just happy about the way I look now. The real win is how I feel: lighter, fitter, with more energy—and a lot less pain. It’s like getting a newer, happier version of myself.


This journey has been transformative for me, and I’m truly gratefulto fitness Naturo for the guidance, encouragement, and the push I needed at the right time.


Sangita Bhalerao

Friday, December 12, 2025

अमृता वरवडेकर


नमस्कार,

माझं नाव सौ. अमृता अभिजित वरवडेकर.


रोजची धावपळ, बिझी शेड्युल यामुळे स्वतःकडे खूप दुर्लक्ष झालं आणि वजनाचा काटा कधी सत्तरीपर्यंत पोहोचला तेच कळलं नाही. यूट्यूब, गुगलवरून डाएटचे व्हिडिओ बघून, वाचून अनेक वेळा डाएट करण्याचा प्रयत्न केला, पण फारसं यश आलं नाही आणि ते प्लॅन व्यवस्थित फॉलोही झाले नाहीत.


सुमारे वर्षभरापूर्वी, जानेवारी महिन्यात, मला PuLA वर रेश्मा मॅम यांच्या Fitness Naturo बद्दल वाचायला मिळालं. खूपच Impressive वाटलं. No powder, no shakes, only homemade food हे वाचताच वाटलं – “हे तर मी करू शकेन!” पण लगेचच विचार आला की ऑनलाईन प्लॅन आहे, कितपत खरं आहे कोण जाणे! घरच्यांकडूनही ऑनलाईन डाएटला आधी नकार होता.


त्यामुळे जवळपास वर्षभर मी फक्त त्यांचे reviews, पेज आणि रोजचे स्टेटस पाहत राहिले. पण Fitness Naturo चे सातत्यपूर्ण अपडेट्स, ट्रान्सफॉर्मेशन्स आणि मॅम यांचा confidence पाहून शेवटी खात्री पटली.


नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा त्यांना कॉन्टॅक्ट केला. घरच्यांनाही त्यांचे पेज आणि स्टेटस दाखवून convince केलं, आणि अखेर पहिल्या आठवड्यात डाएट सुरू केलं.


खरंच सांगायचं तर, रोजच्या घरगुती जेवणापलीकडे या डाएटमध्ये अजिबात काहीच नाही.

योग्य प्रमाणात आहार + योग्य व्यायाम = Fitness Naturo चं खूप साधं पण प्रभावी सूत्र.


मी मुळात फूडी असल्याने पहिला आठवडा थोडा कठीण गेला. पण आठवड्याच्या शेवटी जेव्हा वजन काट्यावर २ किलो कमी दिसले, तेव्हा आनंदाला पारावार उरला नाही!


रेश्मा मॅम आणि त्यांची टीम अतिशय सपोर्टिव्ह आहे. माझे असंख्य प्रश्न त्यांनी नेहमीच संयमाने सोडवले. दर आठवड्याच्या फॉलोअपमध्ये मॅमनी दिलेलं प्रोत्साहन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.


मी Fitness Naturo आणि रेश्मा मॅम यांची मनापासून आभारी आहे.

त्यांच्या मार्गदर्शन आणि सपोर्टमुळेच मी फक्त ५ आठवड्यात माझं टार्गेट पूर्ण करू शकले.

३ महिन्यांचा प्लॅन केवळ १–१.५ महिन्यातच पूर्ण झाला.


Thank you so much Reshma Ma'am for all the support. ❤️

I will always recommend Fitness Naturo to everyone who wishes to shed extra kilos with only homemade food and home workouts.


Once again, Thank You Reshma Ma'am and Fitness Naturo. 🙏

 

स्मिता जैन


हॅलो, मी स्मिता जैन.

आज मी माझा खूप प्रामाणिक अनुभव तुमच्यासमोर शेअर करते आहे — माझा रेशमा मॅमसोबतचा वेट लॉस प्रवास.


मी याआधी अनेक वेळा वजन कमी करण्याचा प्रयत्न केला होता. ३-४ किलो कमी व्हायचं, पण काही महिन्यांत ते पुन्हा वाढायचं. आणि सर्वात मोठी प्रॉब्लेम म्हणजे —

मला ना डाएटची आवड, ना एक्सरसाइजची इच्छा.

त्यामुळे सगळं करताना कंटाळा यायचा, आणि मनातून वाटायचं की “हे माझ्याकडून शक्यच नाही!”


पण मनात बारीक व्हायची इच्छा खूप होती.

शॉपींगला गेले की सुंदर सुंदर ड्रेसेस आवडायचे, पण माझ्या साईझचे मिळत नसत… mood off व्हायचा.

घरचे सगळे “वजन कमी कर” म्हणायचे, आणि मनातून तर अजूनच वाईट वाटायचं.

मनात मात्र एकच विचार — स्लिम व्हायचं आहे… छान dresses घालायच्या आहेत!

पण त्यासाठी मेहनत करण्याची इच्छाच नव्हती.


याच दरम्यान फॅटमुळे शरीरात त्रास सुरू झाला —

नेहमी थकवा, काही काम करण्याची इच्छा नाही… त्यामुळे टेस्ट केल्या तर

माझं कोलेस्टेरॉल हाय होतं आणि मी प्री-डायबेटिक असल्याचं कळलं.

तेव्हा मला जाणवलं — “आता काहीही करून वजन कमी करायलाच हवं!”


मी रेशमा मॅमबद्दल पुला ग्रुपमध्ये reviews वाचले होते.

म्हणून एकदा तरी कॉल करायचं ठरवलं.

जेव्हा मी त्यांच्याशी बोलले… माझे सर्व प्रॉब्लेम सांगितले…

तेव्हा मॅमशी बोलून मला एकदम positive, hopeful आणि safe वाटलं.

आणि तेव्हाच मी त्यांचा 3-Month Plan जॉइन केला.

माझी weight loss journey अशी सुरू झाली…


पहिल्याच आठवड्यात माझं 2 kg वजन कमी झालं!

पण फक्त वजन नाही —

शरीर हलकं वाटायला लागलं, थकवा कमी झाला, energy वाढली!


सगळ्यात खास म्हणजे —

त्यांचं डाएट इतकं सोपं, घरगुती आणि practical होतं

की बनवण्याची झंझटच वाटली नाही.


2 months मध्ये माझं टार्गेट almost complete झालं असतं…

पण दिवाळीमुळे 20-25 दिवस डाएट properly follow करता आलं नाही.

तरीसुद्धा मी एक मोठी गोष्ट नोटिस केली —

इतका मोठा ब्रेक असूनही माझं वजन फक्त 1.3 kg वाढलं!

हे पाहून मला कळलं की रेशमा मॅमचे plans sustainable आणि long-lasting आहेत.


नंतर मी प्लान परत सुरू केला आणि माझं टार्गेट पूर्ण केलं.

आता मला शरीरात खूप freshness, energy आणि confidence वाटतोय.

आणि माझा 8 वर्ष जुना आवडता टॉप मला पुन्हा फिट बसतोय —

हे feeling words मध्ये सांगता येणार नाही! 💖


रेशमा मॅम आणि संपूर्ण Fitness Naturo टीमला खूप खूप BIG THANK YOU!

माझं जीवन बदललं, health सुधारली आणि मला माझं जुनं हसतं-खिदळतं version परत दिलं!

 

Thursday, December 4, 2025

तेजल पवार


 

#PULAFridayReview


नमस्कार, मी तेजल पवार.


         लग्नाआधी 46 किलोवरून सुरु झालेला माझा स्वतःच्या वजनाचा प्रवास दोन डिलिव्हरीनंतर 76 आणि त्यानंतर menopause मध्ये सुरू झालेला हा प्रवास, "आता थांबायचं नाय" असे करत ८४ किलोवर येऊन कधी पोहोचला, हे समजलेच नाही... 😄


                 आता घरातले म्हणायला लागले, "वजन कमी कर,  कारण वजना बरोबर आजारपण येतात!" पण मी "खात्यापित्या घरची सून वाटली पाहिजे" असे म्हणून हसण्यावारी नेत होते. 


             बराच वेळा वजन कमी केले पाहिजे असे वाटायचे परंतु ऐकिवात असलेले बरेचसे प्लॅन काहीतरी सप्लीमेंट घेऊन वजन कमी करायचे, या प्रकारातले होते ज्याला माझ्या मिस्टरांचा साईड इफेक्टची शक्यता असल्याने पूर्ण विरोध होता.


           यानंतर पुल पुणे लेडीज ग्रुप वर रेश्मा मॅमच्या या प्लॅनच्या बद्दल एक positive review वाचला ज्यात मला समजलं की हा डायट प्लॅन पूर्णपणे घरगुती आहे. यासाठी कुठलेही सप्लीमेंट लागत नाही यानंतर मी रेश्मा मॅम ला contact केला आणि मी हा प्लॅन घ्यायचा विचार करतेय याबाबत घरात सगळ्यांना कल्पना दिली. पण माझ्या इतिहासानुसार मी हे करू शकणार नाही यावर माझ्या मुलीने शिक्कामोर्तब केले आणि मला ही वाटले खरंच आपल्याकडून नाही झालं तर... कारण आमच्या घरामध्ये आम्ही सर्वजण खाण्याच्या बाबतीमध्ये खूप foodie आहोत आम्हा सर्वांना मसालेदार, चमचमीत पदार्थ आणि बेकरी प्रॉडक्ट्स खूप आवडतात. हे खाणे शरीरासाठी चांगलं नाही हे कळतं पण वळत नाही...


                  परंतु एका routine blood check up report मधील माझ्या HBA1C ची रेंज प्री-डायबेटिक या कॅटेगरीमध्ये आल्यामुळे मात्र मी वजन कमी करण्याबाबत गांभीर्याने विचार करू लागले आणि "रेश्मा मॅमच्या इतर clients ला जमतं तर मला का नाही जमणार?" असा विचार करून मी मॅमचा प्लॅन घेऊन वजन कमी करण्याचा निश्चय केला आणि रेश्मा मॅमच्या दिसणाऱ्या स्टेटस मूळे माझा निश्चय आणखी दृढ झाला.


          जुलै महिन्यापासून रेश्मा मॅम कडून प्लॅन घेऊन माझी नवीन प्रवासाला सुरुवात झाली. या प्रवासात पहिल्याच आठवड्यात माझे वजन दीड किलोने कमी झाले तेही घरच्या आहारात...

                 माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता. मला जसं आठवतं तसं माझं वजन पहिल्यांदाच कमी होत होतं, नाहीतर वजनाचा आलेख कायम चढता असायचा... 😄


                  मी खूप खुश झाले आणि मॅडमने सुद्धा कौतुक केलं त्यामुळे मी आणखी उत्साहाने मॅमच्या टिप्स follow करायला लागले.


                 या प्रवासात वजन खूप लवकर कमी होत होतं. परंतु मध्येच मला गोचीड तापामुळे पाच-सहा दिवस ऍडमिट व्हायची वेळ आली. त्यावेळेस मला आजारी आहे, यापेक्षा आता माझं वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये विलंब होईल याचं वाईट वाटत होतं. या काळात सुद्धा रेश्मा मॅम आणि त्यांचा स्टाफ यांनी खूप सपोर्ट केला.

"सध्या तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तुम्हाला बरं वाटलं की आपण परत सुरुवात करू". असा धीर दिला.


                     काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मी पुन्हा सुरुवात केली. यानंतरही प्रत्येक वेळेस मॅडमने प्रोत्साहन दिले आणि माझ्या अनंत शंकांचं निरसन केलं फक्त त्यांच्यामुळेच मी माझं टार्गेट पूर्ण करू शकले.


               पूर्वी मला थोडं चाललं तरी दम लागायचा तो आता लागत नाही. हा अशक्यप्राय वाटणारा प्रवास पूर्ण झाल्यामुळे माझा आत्मविश्वास पण वाढला आहे. खरं सांगायचं तर मी आतून बाहेरून पूर्ण बदलले आहे. आता मी जेव्हा बाहेर जाते तेंव्हा प्रत्येकाला माझ्यात झालेला बदल लगेच जाणवतो. त्यांच्या प्रतिक्रियांनी मन सुखावते.


                  हे सर्व रेश्मा मॅम मुळे शक्य झाले.

त्यांनी माझ्या पूर्ण प्रवासात मला दीपस्तंभ प्रमाणे मला दिशा आणि मार्ग दाखवला आणि मला माझ्या इच्छित स्थळी पोहोचवले. त्याबद्दल रेशमा मॅम आणि त्यांच्या स्टाफ यांचे मनःपूर्वक आभार... 🙏🏻🌹

Manasi Dixit

 


#PULAFridayReview


Hi, मी मनसी दीक्षित.

मला रेशमा मॅडमबद्दल फेसबुकच्या PU La ग्रुपमधून माहिती मिळाली.

त्यांचे इतके सकारात्मक reviews पाहिले की मनात आलं —

“एकदा आपण पण try करून बघूया.”


मागच्या काही महिन्यांत माझं वजन खूप वाढलं होतं आणि त्यामुळे मला स्वतःलाच जड वाटत होतं. शेवटी ठरवलं, बस्स! आता स्वतःसाठी काहीतरी करायचंच… आणि तेव्हाच मी Fitness Naturo join केलं.


🟩 फक्त पहिल्याच आठवड्यात माझं वजन 2.5 kg ने कमी झालं!

तेही कुठलीही powder, tablet किंवा shake न घेता…

फक्त घरच्या साध्या, रोजच्या जेवणातून.

त्या दिवशी खरंच खूप आनंद झाला.


Follow-up नंतर मला कळलं की रेशमा मॅडम किती supportive आणि encouraging आहेत.

कोणते पदार्थ avoid करायचे?

काय खायचं आणि किती प्रमाणात?

सगळं त्यांनी अगदी सोप्या भाषेत, practical way ने समजावलं.


🧳 माझा एक आठवड्याचा travelling होता.

मला वाटलं की वजन वाढेल…

पण मॅडमने travelling कसं manage करायचं ते नीट सांगितलं, आणि माझं वजन travelling नंतरही stable राहिलं.

याहून मोठं motivation काय असणार!


आजपर्यंत almost 11 kg weight loss झालाय.

आता मी आधीपेक्षा खूप fresh, energetic आणि active वाटते.

जुन्या कपड्यांमध्ये फिट होते आहे… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—

माझा आत्मविश्वास परत आला आहे!


Family members आणि friends सगळेच मला compliments देतायत.

त्यांचं “तू खूप slim दिसतेस” हे ऐकून मनात किती आनंद होतो ते सांगूच शकत नाही.


एक guide म्हणून रेहशमा मॅडम अप्रतिम आहेत.

त्यांचं knowledge, guidance आणि continuous follow up यामुळेच हे शक्य झालं.


🙏 Thank you Reshma Ma’am and your entire Fitness Naturo team.

तुमच्या consistent support आणि नैसर्गिक diet planning मुळेच माझी ही journey इतकी सुंदर आणि यशस्वी झाली.

खूप खूप धन्यवाद! 😇💛