Thursday, July 3, 2025

सुप्रिया तोंडे


 

#PulaFridayReview


नमस्कार🙏🏻 

मी सुप्रिया तोंडे, मी एक शिक्षिका आहे.

             लग्न, गरोदरपणानंतर माझे वजन 15 किलोने वाढले. योगा-खाण्यामध्ये बदल असे खूप प्रयोग करून पाहिले पण वजन काही केल्या कमी होत नव्हते. फेसबुक वर अनेक nutritionist  चे reels पाहत होते त्यात PULA ग्रुपवर रेश्मा मॅडम यांचे  positive review वाचण्यात आले. आणि निश्चिय केला आता वजन कमी करायचेच.

          शाळेला नुकतीच सुट्टी लागणार होती सगळा योगा योग जुळून आला होता आणि त्यातच रेश्मा मॅडम आणि टीम सोबत बोलणं सुरु झालं. रेश्मा मॅडमची टीम देखील खूप co-operative आहे. आपल्या सर्व शंका ते मॅडमसोबत share करून solve करतात.

       Diet  सुरु करण्यापूर्वी रेश्मा मॅडमने  सर्व समजावून सांगितले आणि ८ मे २०२५ पासून मी Diet सुरु केलं. Diet म्हणजे  खूप  खर्चिक असं वेगळं काही नाही, घरातीलच खाद्य पदार्थ पोटभर खाऊन  वजन कमी करणे.

      सुट्टी असल्यामुळे गावाला जाण येणं झालं. सुट्टीत २ लग्न attain केले. घरचे आंबे होते पण निश्चय पक्का होता त्यामुळे गावाला जाऊन देखील वजन वाढू दिल नाही. माझ्या शरीरातील बदल पाहून घरातल्यांनी देखील खाण्यासाठी force केला नाही.

     Weight loss मध्ये diet plan बरोबर Exercise हा एक महत्वाचा भाग आहे.रेश्मा मॅडमने दिलेले exercise या फार अवघड नाहीत घरात सहज करता येतील अशाच आहेत.

              आधी वाजनामुळे लाईटचे बटण बंद करण्यासाठी उठण्याचा देखील कंटाळा येत होता, परंतु पहिल्या आठवड्यापासूनच वजन कमी झाल्यामुळे अशी अनेक कामे आता सहज होत आहेत. वजनामुळे  full फोटो काढायला मी टाळायचे परंतु आता  वजन कमी झाल्यामुळे फोटो काढायला छान वाटत आहे. फक्त वजनचं कमी झाले नाही तर body measurment इंचमध्ये  देखील कमी झाले असून कपड्यांची  size XL वरून L झाली आहे हि माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.

             एक ते दीड महिन्यानंतर 🏬 शाळेत गेल्यावर काही शिक्षकांनी मला ओळलंखच नाही🙄. खूप छान, चांगला बदल झाला हा feedback एकूण मानला खूप समाधान वाटले. यापेक्षाही इतरवेळेसारखा   थकवा यावेळी म्हणजे वजन कमी झाल्यामुळे जाणवला नाही 🙂.

              मला महिन्यातून २-३ वेळा acidity हमखास होत असत तसेच गरोदरपंणानंतर थोड्याफार प्रमाणात piles चा त्रास देखील जाणवू लागला होता परंतु रेश्मा मॅडमचा सकस diet plan सुरु केल्यापासून या दोन्ही व्याधी कोठे पळून गेल्या समजलच  नाही🤔.

         वजन  कमी झाल्यामुळे आता खूपच energetic feel💃 होत आहे. त्याबरोबरच confidence level देखील वाढली आहे. माझे ध्येय सध्या करण्यात नक्कीच रेश्मा मॅडमचा सिंहाचा वाटा आहे असेच मी मानते.त्याबद्दल रेश्मा दोरके मॅडम आणि टीमला खूप खूप धन्यवाद..🙏🏻😊👍🏻

Radhika Khare


 #PulaFridayReview 


माझं नाव राधिका. रेशमा मॅम बद्दलची माहिती मला   Pula  लेडीज ग्रुप मधून मिळाली. मग पहिल्यांदा असं वाटलं की आपण पण हे आता रेश्मा मॅम चे डायट घेऊन बघूयात का? पण तरी भीती वाटत होती की याच्या आधी पण मी एक दोन डायट प्लॅन फॉलो केले होते. पण असं व्हायचं की एक दोन महिने खूप छान डायट फॉलो व्हायचं, पण त्याच्यानंतर मला आजारपण यायचं काही ना काहीतरी आणि ते ब्रेक व्हायचं. 

                   पण मी रेशमा मॅम चे खूप सारे रिव्ह्यूज वाचले पुल ग्रुप वरचे. त्याच्यामुळे असं वाटलं की आपण एकदा तरी यांचं डायट प्लॅन घेऊन बघूयात. 

त्यामुळे मी रेशमा मॅम ला फोन केला. आणि फर्स्ट कन्सल्टेशन त्यांचं जे होतं त्याच्यामध्येच त्यांच्याशी बोलल्यावर मला एकदम पॉझिटिव्ह फील झालं. त्यांनी मला asurance दिला की मी हा डायट प्लानमुळे आजारी पडणार नाही. कारण याच्यामध्ये कुठलाही प्रकारच्या पावडर नव्हत्या कुठल्याही प्रकारच्या ज्या सीड्स असतात किंवा जे फॅन्सी डायट असतं ते काहीच नव्हतं. सगळं काही घरातलंच  खान होतं त्याच्यामुळे इनफॅक्ट माझी इम्युनिटी वाढेल. सो मी यांचं डायट जॉईन केलं. 

                     जॉईन केल्यानंतर जो पहिला फॉलोअप होता. त्यावेळेला असं वाटलं की हा काहीतरी आपल्या शरीरामध्ये आता चांगला बदल घडतोय. 

तुमच्याकडचा जो रिस्पॉन्स होता तो खूपच छान होता. रेशमा मॅम शी नेहमी जेव्हा जेव्हा बोलणं व्हायचं कन्सल्टेशन च्या वेळेला, त्यावेळेला त्या एकदम पॉझिटिव्हली सांगायच्या आणि तोच पॉझिटिव्हनेस माझ्यामध्ये पण येऊन मला पण इन्स्पिरेशन मिळायचं की नाही आपल्याला हे करायलाच पाहिजे. 

                   रेशमा मॅम बरोबरच त्यांचा स्टाफही तितकाच खूप छान आहे. जर कधी एखाद्या वेळेला वजन तेवढं नाही कमी झालं तर त्या सुद्धा खूप छान पॉझिटिव्हली सांगायच्या की "मॅम टेन्शन नका घेऊ असं काहीतरी घडलं असेल" एक दोन ऑप्शन सांगायचा, आणि बरोबर त्यातलंच काही ना काही तरी झालेला असायचं, त्याच्यामुळे वजन नसेल झालं कमी आणि नेक्स्ट follow up la मात्र बरोबर ते वजन कमी झालेलं यायचं. आता वजन कमी झाल्यावर तर खूपच छान वाटतंय. जे काही माझे health प्रॉब्लेम्स होते ते आता सगळे रिझल्ट छान आले.

                     इनफॅक्ट मी आत्ताच सगळ्या ब्लड टेस्ट करून घेतल्या तर माझे डॉक्टर तर खूपच खुश झाले आहेत. माझं एचबी कधी नव्हे ते बाराच्या पुढे गेले. जे नेहमी दहा ते अकराच्या  रेंजमध्येच असायचं. आणि जे बाकीचे  सगळे रिपोर्ट्स होते तेही खूप छान झालेत. म्हणजे मी फक्त घरचंच खाऊन एकदम छान हेल्दी झाली आहे.

                  रेशमा मॅम तर खूप पॉझिटिव्ह आहेत. आणि त्यांची हीच पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये पण येते. आणि आपोआप आपण ते डायट फॉलो करायला लागतो. काहीही  न करता म्हणजे ते डायट चालू केल्यानंतर पहिला एक दोन दिवस वाटतं हे खावं ते खावं. पण ज्यावेळेला रेश्मा मॅम बोलतात त्यावेळेला असं वाटायला लागतं की नाही हे आपल्याला नाही खाल्लं पाहिजे. 

                  इनफॅक्ट स्वतःहून कधी कधी मला ओरडल्या तेही प्रेमाने, जेव्हा जेव्हा चुकीचं काही खाण्यात आलं माझ्या  . असं मी म्हणेन त्यामुळे मला माझं वजन कमी व्हायला नक्कीच मदत झाली. 

                   मी जेव्हा डायट प्लॅन चालू केला त्यावेळेला माझ्या फॅमिली मेंबर्सला असं वाटायचं की हे डायट करून मी पुन्हा आजारी पडेल. पुन्हा काही ना काहीतरी डेफिशियन्सी निर्माण होईल. असं त्यांना भीती वाटायची. पण ज्यावेळेला माझं वजन कमी व्हायला लागलं आणि जशी जशी मी फिट दिसायला लागले, तसं तसं आता सगळ्यांना हे कळलंय की नाही राधिका पुन्हा पहिल्यासारखी फिट झाली आहे. आणि हेल्दी झाली आहे. इनफॅक्ट माझ्या घरातले म्हणजे माझ्या नवऱ्याने मला कॉम्प्लिमेंट दिले की गेले सहा महिने ही डॉक्टरांचे बिल भरायलाच गेलेली नाहीये. सो ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट मला मिळाली आहे. 

                 आणि आता सगळे फ्रेंड सुद्धा म्हणायला लागले आहेत की तू पुन्हा पहिल्यासारखी छान आणि फिट दिसायला लागली आहे. 



पूर्वी मला काही जण बाहेर गेल्यानंतर काकू काकू म्हणायचे पण आता मला तीच लोक पुन्हा ताई ताई म्हणून म्हणतात. त्यावेळेला खूपच मज्जा येते. आणि खूपच छान वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे जे सगळे आधीचे कपडे होते जे की मी ठेवून दिले होते की हे कधी ना कधीतरी आपल्याला येतील. ते आता मला सगळेच यायला लागले आहेत. त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे. सो थँक्यू सो मच रेशमा मॅम.. तुमच्यामुळे मला हे साध्य करता आलं. आणि माझा हा जर्नी बघून मी जे स्टेटसला फोटो ठेवते माझे आता तर ते माझ्या फ्रेंड्स नी बघितलेत. आणि बऱ्याच फ्रेंड्स नि तुम्हाला कॉन्टॅक्ट केलेला आहे ऑलरेडी . आणि काहीजणांना मी नंबर्स पण दिलेले आहेत. माझ्या लंडनच्या मैत्रिणीने पण माझं स्टेटस बघून तुमचा डायट प्लान चालू केलेला आहे. सो मी सगळ्यांना एवढेच म्हणेन की "कंट्रोल के आगे वेट है सो कंट्रोल करा. आणि रेश्मा मॅम जे काही तुम्हाला फॉलो करायला सांगतात ते मनापासून करा" तुम्हाला रिझल्ट 100% मिळेल थँक्यू सो मच रेश्मा मॅम.

भक्ती कवठेकर


 #PulaFridayReview

मी भक्ती कवठेकर…
मला Fitness Naturo ची माहिती फेसबुकवर मिळाली. पोस्ट वाचल्यावर मनात पहिला विचार आला – गोळी, पावडर किंवा डब्यांशिवाय वजन कमी कसं होईल?
कारण काही वर्षांपूर्वी मी हर्बलाइफचे डबे वापरले होते आणि वजन कमी झालेही होते… पण नंतर ते भराभर वाढले! त्यामुळे शंका वाटणं साहजिकच होतं.
               मग जेव्हा Reshma Ma'am शी बोलले, तेव्हा लक्षात आलं की इथे काही वेगळंच आहे –
घरचं खाणं, नैसर्गिक मार्ग आणि कोणतीही औषधं न घेता वजन कमी करणं!
त्या क्षणी मला वाटलं, "हो, यावेळी खरंच वजन कमी होणार!" अशी खात्री निर्माण झाली. 🙏🏻
                 Fitness Naturo चा स्टाफ अतिशय प्रोफेशनल आणि प्रॉम्प्ट आहे.
ते वेळोवेळी follow-up घेतात, आठवण करून देतात, तुमचा डाएट कसा चालू आहे, काय खावं, काय टाळावं हे समजावतात.

                 Reshma Ma’am चा मोटिवेशनल कॉल तर धमाकेदार असतो!
कधी थोडं चुकलं, चीट झालं तर अगदी हक्काने ओरडतात… पण त्या ओरडीतही त्यांची काळजी आणि तळमळ दिसते – आणि त्यामुळे आपल्यालाही अजून जिद्द येते! 💯🔥
                फक्त 12 वीक मधे मी १५ किलो वजन कमी केलं आहे – आणि हे सगळं फक्त Fitness Naturo आणि त्यांच्या टीमच्या सततच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालं!

आज कुठेही बाहेर गेले की लोक म्हणतात – "अरे वा! किती बारीक झालीस!"
हे ऐकून खरंच खूप छान वाटतं… आत्मविश्वास वाढतो.

Thank you so much Reshma Ma’am आणि Team Fitness Naturo – तुमच्यामुळेच माझं हे रूपांतर शक्य झालं! 🙏🏻❤️

पल्लवी वाघोले

 

#PulaFridayReview 


Hello..

                मी पल्लवी वाघोले. मी एक गृहिणी आहे. माझ मागील एका वर्षात वजन खूप वाढल होत. त्यांच कारण माझा गुडघा twist झाला आणि ligament injury झाली. त्यामुळे मला फिरणे, जमिनीवर बसणे, या सगळ्या वर बंधन आले. माझा पाय थोडे चालले तरी खूप दुखायला लागला. आणि त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर झाला. हळूहळू माझ वजन १० ते १५ किलो वाढल. 

                  एक दिवस अचानक माझी  एक मैत्रीणी खूप दिवसांनी मला दिसली. तीच After pregnancy वजन वाढले होते. आणि आत्ता ती खूप बारीक आणि यंग दिसत होती. मला तिला पाहून खूप आनंद झाला. आणि छान पण वाटल. तिला मी विचारले की तू काय केलं ईतकी बारीक कशी झाली काय केलं. तेव्हा मला@ Reshma ma'am बद्दल माहिती दिली. 

               मला सर्व समजल्यावर खूप आश्चर्य वाटले की कोणत्या प्रकारचे शेक, गोळ्या महागड्या पावडर अस काही न घेता फक्त आणि फक्त आपल्या घरगुती वापरातील पदार्थ घेऊन आपण वजन कमी करू शकतो हे समजले.

                 मी आगोदर Herbal life केल होत. Lockdown मध्ये त्याचा उपयोग मला झाला. पण तो रोज रोज शेक पिण्याचा मला कंटाळा आला.त्यामुळे मला असं काही हव होत कि आपल्या ला सहज उपलब्ध होईल. अशा गोष्टी हव्यात कि जेणेकरून आपले वजन परत परत वाढणार नाही. आणि मला @Reshma Jadhav ma'am बद्दल माहिती नोव्हेंबर २०२४ मध्ये मिळाली. पण मी काही फोन केला नाही. ते म्हणतात ना की..तहान लागली की आपली पावले आपोआप पाण्याजवळ जातात!! तसचं काहीसं माझ्या बाबतीत झाल. 

                         मैत्रीणींनो आपल्या सर्वांना छान दिसायला आणि सर्व टाईपचे कपडे घालावेत असे वाटते किंवा आवडते असे म्हणाणा..... पण वाढलेले वजन आपल्याला तस करू देत नाही. आणि दुसरे म्हणजे xxl, xxxl size मध्ये फार कमी choice असतो. 

                   मी या  कॉल वर येण्याच कारण पण तेच आहे. मला अचानक xl  वरून xxxl  size घ्यावी लागली. आणि तेव्हाच मला कळले की आत्ता हिच ती योग्य वेळ आहे. मी त्या क्षणी माझ्या मिस्टरांना सांगितले . आणि माझ्या या वेट लॉस जरनीला सुरूवात झाली.


      @Reshma ma'am बरोबर पहिला फोन फेब्रुवारी २०२५ ला केला आणि पहिल्याच कॉल वर त्या खूप positive वाटल्या. मी  4 months चा plan घेतला त्यांनी जे जे सांगितले ते सर्व केले आणि अवघ्या एका आठवड्यात 2kg कमी झाले..... 🤗 खूप आनंद झाला.

                   आत्ता मात्र पक्की खात्री झाली आपण योग्य निर्णय घेतला आहे. मॅडम ची दर आठवड्याला follow ups आणि काळजीपूर्वक कशा आहात तुम्ही!! असे म्हटले कि खूप आपले पणा वाटतो...

                     या प्रवासात काही अडचणी पण आल्या. आपल्या कडे काही सण, कार्यक्रम आले तरी पण अशा वेळी काय खायचे हेही अगदी योग्य पध्दतीने समजून सांगितले. त्यामुळे  कधी डायटचा कंटाळा आला नाही. मध्ये मध्ये वजन स्टक झाल. तेव्हा पण  @ Reshma ma'am ने खूप छान पध्दतीने समजावून सांगितले. 😊 

                        यामध्ये अनेक जणांचे खूप छान छान comments मिळाली . आगोदर घरच्यांनी सांगितले छान दिसते आहे, शेजारी, मैत्रीणी यांनी सांगितले !!

                       माझ्या साठी सगळ्यात मोठी comment म्हणजे माझ्या आईने केलेली..... मी आणि माझ्या दोन मुली आम्ही मिळून एक फोटो काढला. आणि तो नेमका आईने पाहीला आणि माझ्या मुलीला म्हणाली मधली तूझी मैत्रीण आहे का? तीने सांगितले मैत्रीण नाही नीट बघ तुझीच मुलगी आहे... 😃 हे मला समजल्या वर खूप खूप आनंद झाला.

                  Reshma ma'am याचे सर्व श्रेय फक्त आणि फक्त तुम्हांला आहे. आत्ता सर्व प्रकारचे ड्रेस (मुलींचे पण)  घालू शकते आहे XXXL  वरून L size झाली.... 🤗  माझ वजन कमी झाल्याने आत्ता गुडघा पण बरा आहे. मी मांडी घालून बसू शकते. सर्व व्यायाम करू शकते. खूप छान वाटते आहे.त्यामुळे मॅडम चे खूप खूप आभार मानते. 🙏🏻🙏🏻😊Thank you so much Reshma ma'am  and Fitness team. 🙏🏻🙏🏻