Thursday, December 26, 2024

Pooja

 माझं नाव पुजा..

           मला फेसबुक वरून रेश्मा मॅम आणि #FitnessNaturo बद्दल माहिती मिळाली होती. माझ्याच एका मैत्रिणीचा फिडबॅक बघितला होता रेश्मा मॅडम च्या पोस्ट वर.

          मनात पहिल्यांदा विचार आला की आपल्यालाही जमेल का?? ऑफिस, बाळ हे सगळं करून डाएट जमेल का करायला. प्रेगणेन्सी नंतर माझा वजन १० kg एक्स्ट्रा झालं होत. चांगल वाटत नव्हतं की एव्हड वजन वाढलं आहे. जुने कपडे देखील येत नव्हते. कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखं वाटत होता आणि भीती होती की अजून वजन वाढले तर ? त्यामुळे कही पण करून वजन कमी करायचं असं ठरवलं.

                  जॉईन केल्यावर पहिल्याच वीक मधे जवळजवळ २ kg वजन कमी झाले होते. त्यामुळे वजन कमी होऊ शकेल असा कॉन्फिडन्स आला. रेश्मा मॅडम ने देखील खूप गाईडन्स केला.

               यासर्वात रेश्मा मॅडम कडून मिळणारा रिस्पॉन्स हा खूप positive होता. कही प्रश्न असेल तर त्यांची टीम नेहमी असायची तिथे गाईड करायला.

आणि बघता बघता 8 च विक मध्ये माझ जवळपास 10किलो वजन कमी झाले. 

          आता खूप छान वाटत आहे . जुने कपडे परत येतात याच्या पेक्षा जास्त आनंद काय असू शकतो. All thanks to reshma mam and team. त्यांनी खूप छान गाईड केलं आणि डाएट मधे पण घरातल्या पादर्था चा समावेश होता. कोणताही फॅन्सी डाएट नाही.

          g\  Special experience असा की काही फॅन्सी डाएट न करता पण वजन कमी होऊ शकते हे जास्त छान वाटल..

Revati Joshi

 नमस्कार , मी  रेवती जोशी वय 41..., प्रोफेशनली IT Engineer आहे. मी रेश्मा मॅमना तसं त्यांच्या मुलामुळे g\ओळखते. माझ्या लेकीच्या क्लासमेट ची आई  एवढीच काय ती ओळख होती ...त्यांचे  स्टेटस त्यामुळे रोज बघितले जायचे , पण  आपल्याला काय याची गरज ? असा एक काळ होता. 

                 मग हळूहळू काट्यावर मी स्वतः 79 किलो जेव्हा दिसायला लागले, उंची 160 सेंटीमीटर ...त्यामानाने आपण आता वरची पातळी गाठत आहोत असे दिसत असून पण आधी बऱ्या पैकी वेळ मी त्यांच्या स्टेटस च्या  सक्सेस स्टोरीस बघण्यात घालवला... मग एक दिवस आलाच , मॅम शी  बोलून प्लॅनच फिक्स केला . माझे दोनदा सिझर झाले असल्याने थोडं टेन्शन आलं होतं ,पण त्यांच्याशी नीट बोलून घेऊन फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या.

              आता अचानक काय प्लॅन मिळेल आणि आपण खरंच करू शकणार की  खाण्याची आवड असणाऱ्या माझ्याकडून फक्त चिट डेज साजरे होणार अशी पण शंका होती... दोन दिवसात प्लॅन मिळाला आणि आता त्या डाएट चक्रात आपण उतरलो  असे  पण वाटले. 

         मी शुद्ध शाकाहारी  असल्याने मला तर SOYA पण खायला अवघड जात होते. '0101h'10जेव्हा रेश्मा आणि माझा कॉल झाला तेव्हा एकदम हलकं वाटायला लागलं . सुरु झाला डाएट चा पहिला आठवडा , फॉल्लो उप मीटिंग मध्ये रेश्मा मॅम ने  अजून छान समजावून सांगितले. 

                2 आठवड्यात  4किलो  कमी पाहून मी खूष झाले .. 

हळूहळू आत्मविश्वास निर्माण होत गेला की YES I CAN DO IT!

थोडासा challenge यायला लागला गौरी गणपती मध्ये...पण मॅम सोबत आधीच झालेल्या कॉल मध्ये त्यांनी मला वेळेपूर्वीच सावध करून ठेवले होते की घरच्यांना 'नाही' म्हणून गोड खाणे टाळून टार्गेट कडे पुढे कसे जायचे आहे ... फूड कंट्रोल केला कसा बसा ...पण  घरात पाहुणे , मुलं , व्यायामाला थोडा आराम पडला होता. पण  पुन्हा मॅम चा कॉल होणार आणि आपल्याला रागावणार त्या या भीतीने थोडा थोडा करत व्यायाम चालू ठेवला. रेश्मा मॅडम ची  टीम पण कोणतीही शंका पोस्ट केली कि त्वरित रिस्पॉन्ड करतात , हे विशेष !त्यामुळे शंका लगेच दूर होतात आणि एवढेच नाही तर  WEIGHT LOSS का नाही झाला असे हक्काने विचारतात पण!

               दिवाळी पूर्वीच माझे वजन 10 किलोने कमी झाले होते आनंद तर होत होताच पण काही काळाने मात्र त्याच त्याच डाएट चा आलेला कंटाळा पण मी व्यक्त केला आणि मॅम ने मला चालणार असा प्लॅन देखील बदलून दिला ,छान वाटलं... 

               79kilo पासून आत्ता 66 किलोवर येऊन अजूनच कॉन्फिडन्ट , हलकं  वाटत आहे , माझ्या आवडीची अनेक आसने मी पुन्हा नव्या उत्साहाने करते , घरी करता येणारे सर्व exercise आता आधी पेक्षा चांगले जमतात मला . 


                पूर्वी घरातल्यांना वाटायचं कि काय हे डाएट वगैरे ची गरज काय , असा काही होत नसतं ...पण  आता समोरून जेव्हा बदल दिसतो तेव्हा तेच सगळे  छान झालं , छान दिसतेस असं कौतुक करत आहेत!

रेश्मा मॅम ने मला आता  हेल्दी कसं राहायचंय , व्यायाम का महत्वाचा आहे असा permanently पटवूनच दिलंय ! जे  कधीही न सोडण्याचा मी नेहेमी प्रयत्न करणार आहे . 

         Thank you so much रेश्मा  and Fitness Naturo TEAM!!!  पुढे पण असेच सहकार्य आणि मार्गदर्शन  कायम असू द्या!



Monday, December 2, 2024

Rahul Sawant



 माझं नाव राहुल सावंत. मी IT Engineer आहे. वाकडला राहतो.

           मला रेश्मा मॅम आणि #FitnessNaturo बद्दल माझ्या बायकोकडून कळलं, तिने facebook वर PULA group वर तुमचे reviews वाचले होते. मी या आधीही बरेच diet follow केले पण पाहिजे तसे result नाही मिळाले. तर मला वाटल असच काहीतरी असेल. पण माझी बायको मला convince करत राहिली. आणि मग मी डाएट करण्याचा निर्णय घेतला. मला अजिबातही खात्री वाटत नव्हती माझं वजन कमी करण्याचं स्वप्न साकार होईल की नाही याची.

पण रेश्मा मॅम चे  पूर्वीच्या क्लायंट्सचे यशस्वी अनुभव आणि बायकोचा आग्रह यामुळे मी त्यांच्याकडे जॉईन व्हायचं ठरवलं.

             पहिल्या फॉलोअपला म्हणजे पहिल्या 8 दिवसातच माझं वजन डायरेक्ट 4किलो ने कमी झालं. त्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळालं आणि  मी अधिक आत्मविश्वासाने फिटनेस चा प्रवास सुरू करण्याचं ठरवलं.

              रेश्मा मॅम आणि Fitness Naturo कडून मिळणारा प्रतिसाद खूप सकारात्मक होता. त्यांनी वेळोवेळी मला प्रेरणा दिली आणि योग्य मार्गदर्शन केलं.

            त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली मी डाएट आणि exercise अगदी काटेकोरपणे पाळल. आणि त्यामुळे 11 वीक मध्ये माझे वजन 92 किलो वरून 77 किलो असे टोटल 15किलो लॉस झाले. आता वजन कमी झाल्यानंतर शरीर आणि मन दोन्ही हलके वाटतंय. माझा आत्मविश्वास वाढलाय आणि फिटनेसच्या बाबतीत खूप चांगलं वाटतंय.

                रेश्मा मॅम एक प्रेरणादायक, positive आणि समर्पित फिटनेस कन्सल्टंट, कोच आणि ट्रेनर आहेत. त्याचं मार्गदर्शन प्रत्येक क्लायंटच्या गरजेनुसार असतं, ज्यामुळे प्रत्येकाला अपेक्षित यश मिळतं.

                त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक वेगळे व्यायाम प्रकार आणि healthy आहाराच्या सवयी अंगीकारता आल्या. मी मधेमधे regular diet follow नाही करू शकलो. पण त्यांनी पुन्हा पुन्हा मला track वर आणत होत्या. त्याबद्दल त्यांचे खूप कौतुक ..😊

                 फॅमिली, मित्र मंडळी यांना सुरुवातीला काहींना शंका होती, "काही नाही होत वजन कमी... आणि झाल तरी लगेच वाढेल".  पण आता त्यांनीही माझ्या मेहनतीचं आणि बदललेलं रूप पाहून कौतुक केलं. आणि माझं वजन constant राहिले.. normal diet सुरू झाल्यावरही... माझ्या खूप साऱ्या मित्रांना मी त्यांचा फिटनेस प्लॅन जॉइन करण्याचा सल्ला दिला. 

                 आता वजन कमी झाल्यामुळे माझी एनर्जी लेव्हल वाढली आणि काही जुने आरोग्याचे त्रासही कमी झाले. पूर्वी मी माझ्या क्षमतांबद्दल थोडा साशंक होतो पण आता मला माझ्यावर विश्वास आहे आणि फिटनेसच्या बाबतीत मी स्वतःला खूप स्ट्रॉंग समजतो. आणि मी नेहमी फिट आणि healthy राहण्यासाठी तुमच्या सर्व tips follow करेन.😊

Priyanka Raut



माझं नाव प्रियांका राऊत.

         मी बाणेरला राहते आणि IT मध्ये जॉब करते. Fitness Naturo आणि रेश्मा मॅम बद्दल मला फेसबुक च्या पुल ग्रुप वरून माहिती मिळाली.

       त्यांच्या डाएट मध्ये कोणतेही सप्लिमेंट, टॅब्लेट्स नव्हते. सो मला वाटल हे ट्राय करायला हरकत नाही. आणि माझं वेट खूपच वाढत होत. त्यामुळे डाएट सुरू करण गरजेच होत. 

सो मी जॉईन केलं. आणि बघता बघता 8 वीक मध्ये माझं 10किलो लॉस झालं.. 

            10किलो लॉस झाल्याने आता मला खूपच energetic फिल होत आहे. पूर्ण शरीरात बदल जाणवत आहे. पूर्वी lower back pain खुप होत आता कमी झालं आहे. स्वतःबद्दल आत्मविश्वास वाढला आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि मित्रपरिवार मध्ये वावरताना कॉन्फिडन्स फील होतो

       रेश्मा मॅम चां डाएट प्लॅन खूपच सोपा वाटला आणि फॉलो करण पण खूप सोपं वाटल.. त्यांची डाएट explain करण्याची पद्धत पण खूप आवडली.. खूप छान फ्रेंडली आणि हेल्पफुल नेचर आहे त्याचं. Overall experience was very good 👍

Apeksha Shivare

 


Facebook वरील Pula ग्रूप वर मी रेश्मा मॅडम च्या weight loss program चे review खूप वेळा वाचले होते.. Pregnancy नंतर माझं वजन खूप जास्त वाढलं होतं.. आधी २ - ३ वेळा मी घरीच इंटरनेट वरून माहिती घेऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न केला होता.. पण हवा तसा फरक दिसत नव्हता...

             Review वाचून मी एकदा रेश्मा मॅडम ना फोन करायचा ठरवला..

फोन वर त्यांना १५ किलो वजन कमी करायचं आहे असं सांगितलं...

त्यांनी त्यांचं डाएट प्लॅन आणि व्यायाम याची माहिती दिली...

कुठलही प्रोटीन पावडर किंवा औषधे न घेता घरीच डाएट करून वजन कमी करणं हे मला genuine वाटलं.. आणि मग त्यांच्याशी बोलून आपण हे करू शकतो असं वाटलं..

            १० ऑगस्ट २०२४ ला मी weight loss सुरू केला आणि पहिल्याच आठवड्यात माझं वजन ३ किलो कमी झालं..

           आपण जर मनाशी ठरवून जिद्दीने सगळं डाएट फॉलो केलं तर नक्कीच फरक जाणवतो हे लक्षात आलं... आणि आपण योग्य दिशेनं वाटचाल करत आहोत हे कळलं...

दर आठवड्याला त्यांची टीम आणि मॅडम फॉलोअप घेतात आणि मग consultation call होतो..

त्यांच्याशी बोलून आपण खूप छान करतोय आणि लवकरच आपला टार्गेट पूर्ण होईल याची आशा वाटते...

           १० नोव्हेंबर २०२४ ला माझं वजन ७५.५ वरून ६० किलो झालं... आणि तेव्हाचा आनंद मी शब्दात खरचं सांगू शकत नाही.. आता माझं वय आणि उंची या प्रमाणे माझं ideal वजन आहे..

               ४ महिन्याचा प्रोग्रॅम मी काटेकोरपणे आणि चिकाटीने डाएट आणि रोजचा घरीच केलेला व्यायाम यामुळे ३ महिन्यातच १५ किलो वजन कमी करून पूर्ण केला.

               रेश्मा मॅडम कायम शंकाच निरसन करतात.. सर्व उत्तरे देतात.. त्यामुळे छान हुरूप येतो.. वजन कमी व्हायला सुरुवात झाली की एक वेगळा आत्मविश्वास येतो.. जेव्हा लग्ना आधीचे कपडे पुन्हा येतात तेव्हा खूप छान वाटलं.. pregnancy नंतरचा पूर्ण wardrobe मला आता change करावा लागला आहे त्याचा मला खूप आनंद आहे..

             फॅमिली मेंबर, शेजारी, मित्र मैत्रिणी सगळे जण किती छान वजन कमी केलं म्हणून कौतुक करू लागले तेव्हा खूप मस्त वाटलं..  घरच्यांचं पाठींबा होता आणि वजनात दिसणारा फरक पाहून त्यांनी पण प्रोत्साहन दिलं...

                Pregnancy मुळे Diastatsis recti (muscle separation) आणि umbilical hernia अशा काही समस्या असताना मला व्यायाम करताना खूप मर्यादा होत्या.. पण योग्य आहार घेतल्या मुळे या समस्या असताना ही पोटाचा घेर ८ इंच कमी झाला ही माझ्या साठी खूप जास्त गर्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे..

              हा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता .पण मी एकच सांगेन जेवढं जिद्दीने आणि प्रामाणिकपणे आपण डाएट फॉलो करू तेवढं आपल्याला ते कमी दिवसात जास्त छान रिझल्ट्स देतं..

              १५ किलो वजन कमी करताना पूर्ण शरीरात inches मध्ये लॉस दिसून आला हे खूप महत्वाचं आहे.. काही hormonal problems होते तेही बरे झाले..

आता पूर्वी सारखं बारीक झाल्या मुळे खूप उत्साही आणि energetic वाटतं.. स्वतःचा अभिंमान वाटतो..

            मनाशी ठरवलं तर आपण कुठल्याही conditions(वय, वजन, होर्मोनल प्रॉब्लेम, पोस्ट सिजर डिलिव्हरी) मध्ये वजन कमी करू शकतो.. यात मला माझ्या Husband ने खूप प्रोत्साहित केलं.. त्यांच्या motivation मुळे मी dedication ने पूर्ण करू शकले...

यातून आरोग्यदायी आहार आणि व्यायाम याची योग्य सांगड याचं महत्त्व पटलं आहे..

            मी रेश्मा मॅडम आणि त्यांची टीम याची आभारी आहे..

                           अपेक्षा शिवारे

Priyanka Pawar

 


माझं नाव प्रियांका पवार. मी बंगलोर ला राहते. मला #FitnessNaturo बद्दल माहिती Facebook च्या PULA group मधून मिळाली.

मनात हाच विचार सुरू होता की प्रेगनेंसी आणि डिलीवरी नंतर च वाढलेल वजन कमी होत नाही. कस कमी करायचं weight काहीच समजत नव्हत.

            मी काही reviews वाचले PULA group वर. त्यात प्रेगनेंसी आणि डिलीवरी नंतर पण खूप fast weight loss केले होते आणि ते पण without any medicine, shakes and fancy diet. फक्त घरात जे काही आपण रोज जेवतो त्यातूनच weight loss करण possible आणि easy आहे समजल.

               तरी पण मनात कुठे तरी वाटत होत की आपल्या कडून हे सगळ possible नाही होणार पण first follow up नंतर confidence अजून वाढला रेश्मा मॅडम बरोबर बोलून.

           माझ वजन 12 weeks मधे 12kg झाले. खूप amazing वाटत आता आणि confidence पण खूप वाढला आहे.

          रेश्मा मॅडम खूप छान guide करतात आणि support सुद्धा. आर्ध काम तर रेश्मा मॅडम च्या motivational बोलण्यामुळेच होते.

आधी सगळ्यांनाच वाटत होतं की प्रेगनेंसी आणि डिलीवरी नंतर च weight काही केल्या कमी होत नसत. पण आता माझ्या मधला change बघून सगळेच shock झाले आहेत आणि सगळे तेच विचारात आहेत की कस काय possible केलास. खूप compliments पण मिळत आहेत.

आता खूप च confidant आणि छान वाटत आहे.