Saturday, November 19, 2022

Poonam Patil



(These Feedback are given by Client on various groups, WhatsApp or other Social Media platforms. All these Original Feedback are Copied Here)

Client ID :-

Client Name:- Poonam Patil

Age:- NA


Job :- Service 


Target Achieved of Weight Loss:- 10Kg (70 Kg To 60 Kg)


Feedback given Facebook Group :-


#WeightLossReview

#Positive

#Motivated


आज मला तुम्हाला काही तरी share करायचं आहे, म्हटलं तर review, म्हटलं तर एक प्रवास  #Fat पासून #Fit कडे,..फेसबुक वर पुणे पूला च्या ग्रुप वर #Reshma मॅडम च्या #Fitness #Naturo #Review वाचल्यावर मी त्यांना लगेचच संपर्क केला.  बरीच चौकशी, चर्चा आणि शेवटी खात्री झाल्यावरच मी अखेर अगदी निर्धास्तपणे माझ्या या #Reshma_Jadhav मॅडम सोबत च्या  #Weightloss च्या प्रवासाला सुरुवात केली. 


ABCD म्हणजे Any Body Can Dream नुसार मी सुद्धा हे करू शकते हे स्वप्न पाहिलं आणि जर #Reshma मॅडम सारख कुणी शिक्षक, मार्गदर्शक, #Dietitian सोबत असेल तर नक्कीच प्रत्येकजण हे स्वप्न पाहू शकतो. खरं तर हा डायट प्लॅन घेण्यामागे माझा मुख्य उद्देश होता तो माझा #BMR योग्य प्रमाणात आणणे. आज रेश्मा मॅडम च्या डायट नंतर माझं वजन फक्त #7week मध्ये ७० किलो वरून #१०_किलो_वजन_कमी होऊन ६० वर आलय जे की आता नॉर्मल आणि स्थिर आहे.  आज फॉर्मल आणि वेस्टर्न कपडे घालूनही फिट दिसण्याच माझ स्वप्न पूर्ण झालय. कारण डिलिव्हरी नंतर माझं पोट फार कमी झालं नव्हतं त्यामुळे मला जे इन करून trosuer, shirt घालावेसे वाटत होते ते माझ्या पोटामुळे मला कधीही घालता आले नाही. पण आज मी कुठेही फिरायला जाताना मला कधी ही न होणारे आणि फिट बसल्यामुळे अवघडल्या सारखे वाटणारे कपडे पण अगदी व्यवस्थित बसायला लागलेत तेव्हा होणारा आनंद शब्दांत न मांडता येणारा आहे. एखाद्या स्त्रीला जेव्हा तिच्या मनासारखा ड्रेसिंग करता येत तेव्हां एक वेगळं सुख असत. मला असं कायम मॉडर्न कपड्यात राहायला आवडत, पण स्वतः च्या शरीराच्या ठेवणी कडे पाहिलं की सगळा उत्साहच निघून जायचा आणि जरी ते कपडे घातले तरी सतत स्वतः बद्दल एक नकारात्मकता निर्माण व्हायची . या संपूर्ण Weightloss च्या प्रवासात नुसतं वजन कमी झाल नाही तर ही एक नकारात्मकता माझ्यात होती एका वेगळ्याच आत्मविश्वासात बदलली. कुठल्या कार्यक्रमात किंवा ऑफीस च्या कामासाठी बाहेर गेल्यावर माझ्यातला हाच बदल पाहून ज्या compliments यायच्या त्यानें तो आत्मविश्वास अजून वाढायचा. एक वेगळी एनर्जी निर्माण व्हायची. कुठल्या गोळ्या पावडर घेऊन weightloss करण्यापेक्षा ह्या सगळ्या प्रोसेस मधून आपला जो सर्वांगीण विकास होतो तो कायम आपल्या सोबत असतो.







रेश्मा मॅडम ना जेव्हा मी फोटोमध्ये पहायचे तेंव्हा लग्नाच्या १७ वर्षांनंतर आणि १४ वर्षाचा मुलगा असताना त्या एवढया लहान दिसतात वयाने तर मला अस वाटायचं की या दिसू शकतात तर मी का नाही, माझं motivation खरतर त्या स्वतःच होत्या. त्यांनी त्यांच्या Fitness Naturo च्या नावाप्रमाणे स्वतः ठेवलेला फिटनेस हाच मला स्वतः मध्ये हे अमुलाग्र बदल घडवायला कारणीभूत ठरला होता.


मला तर वाटत मी रेश्मा मॅडम ची सगळ्यात आळशी मेंबर मीच असेन.  अगदी सुरुवातीलाच मी रेश्मा मॅडम ला बोलले होते की Diet सोबत कायम मला सतत Push करत राहायची गरज लागणार आहे आणि रेश्मा मॅडमनी कायम मला प्रोत्साहन दिलं. कित्येकदा मी नियमित #Follow_Up द्यायला विसरायचे पण रेश्मा मॅडम न विसरता Follow घेत होत्या. म्हणजे पैसे घेतले डाएट दिल की हिशोब संपला अस नाही जे इतर ठिकाणी बहुतांशी आढळत. या संपूर्ण प्रवासात रेश्मा मॅडम नी माझा हात कधीच सोडला नाही कायम एक मोटिवेशन देत राहिल्या.  अगदी साध सोप्प आणि रोजच्या वापरातल डाएट प्लॅन करून मी माझ हे #Weightloss च ध्येय्य पूर्ण केलंय. 












या डाएट दरम्यान च्या काळात मी घरच्या काही कार्यक्रमांमुळे किंवा ऑफिस च्या कामामुळे ब्रेक घेतला त्यामुळे डाएट Strict फॉलो करता आल नाही पण त्याकाळात सुद्धा काय खावं किंवा काय टाळावं याच्या छोट्या छोट्या टिप्स दिल्या त्याही खूप उपयोगी पडल्या.  माझ हे फिटनेस च ध्येय्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही जे काही सहकार्य केलात त्याबद्दल खुप खूप Thank you रेश्मा मॅम Fitness Naturo❤️


Sarika Konde


Client ID :-  

Client Name:- Sarika Nishad Konde

Age:- 42

Job :- Housewife 

Target Achieved(Till Date) of Weight Loss:- 15Kg (75 Kg To 60 Kg)


Feedback given Facebook Group :-


#SuperPositiveReview
#WeightlossReview

नमस्कार 🙏..

मी सारिका निषाद कोंडे राहणार शनिवारपेठ पुणे. मी पहिल्यांदाच याठिकाणी काहीतरी लिहित आहे, त्यामुळे कुठुन सुरवात करावी हे कळत नाहीय. माझे वय वर्ष 42 आहे आणि माझ्या लग्नाला 23 वर्ष पूर्ण झाली आहेत. मला 21 वर्षांची मुलगी आणि 19 वर्षांचा मुलगा आहे. मी एक मध्यमवर्गीय गृहिणी आहे. माझी उंची 4ft 7in आहे. लग्नावेळी माझे वजन 50 किलो होतं. माझ्या दोन्ही मुलांवेळी माझं सिजर झालं होतं आणि त्यानंतर कुटुंब नियोजनाच operation ही झालं होतं. हळूहळू माझं वजन वाढत गेलं, गेल्या 23 वर्षात ते इतकं वाढलं की मला जिने चढायला, उतरायला त्रास होऊ लागला. आधीच माझी उंची कमी आणि उंचीच्या मानाने वजन खूपच जास्त झालं होत. जवळपास 73 ते 75 किलो वर वजन गेल्यावर मला त्याची जाणीव झाली. मला खुपच थकवा जाणवू लागला आणि कोणतेही काम करायला पूर्वीसारखा उत्साह राहिला नव्हता. वाढत्या वजनाचे दुष्परिणामही हळूहळू दिसायला लागले होते. मला #Thyroid चा त्रास सुरू झाला होता, काही दिवसातच माझ्या गर्भाशयात पण गाठ आली, त्यामुळे गर्भाशयाची शस्त्रक्रिया करावी लागली. Operation नंतर तर माझं वजन ,चरबी झपाट्याने वाढू लागली. मला तर काही कळेना काय करावं.जो तो भेटायला यायचा ते सर्वजण माझ्या वजनाविषयी बोलू लागले. वेगवेगळे सल्ले देऊ लागले.बोलू लागले वजन कमी कर. गर्भाशयाची पिशवी काढल्यानंतर वजन वाढतं पण मला काही कळेना वजन कमी कसं करावे. दिवसातून एकदा जेवायला सुरुवात केली. पण या उपासमारीने पण वजन काही कमी होईना. मी रोज #5km चालायला सुरुवात केली. काही दिवस #जिम पण लावली, #Herbal_Powders पण try करून झाल्या, पण कोणत्याच उपायांनी माझं वजन कमी होत नव्हतं.. दुसऱ्या बाजूने शरीराचे एक एक त्रास वाढतच होते. एवढया कमी उंचीला एवढं जास्त वजन घेऊन फिरण मला खूप त्रासदायक होत होतं.. मग शेवटी एका क्षणाला मला पटलं की #सिजर_2, #कुटुंबनियोजनाची_शस्त्रक्रिया, #थायरॉईड, आणि #गर्भाशय काढले, शरीरावर #एवढ्या_सर्व_शस्त्रक्रिया झाल्यावर आपलं वजन असंच वाढत राहणार आणि आयुष्यभर हे असं दुखणं घेऊनच जगायचं हा नकारात्मक विचार करून मी माझ्या मनाची समजूत घातली. एवढे 4 -4 ऑपरेशन झाल्यानंतर आपलं वजन काही कमी होणार नाही. आता आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही, हेच वजन घेऊन जगायचं आणि ते अजुन वाढत असताना फक्त पाहत राहण्याशिवाय आणि आयुष्यभर हा त्रास सहन करण्यापलीकडे माझ्या हातात काही नाही, अस वाटत असतानाच मला अस वाटलं की देवाने माझी हाक कुठूनतरी ऐकली, आणि त्यालाही माझ्या परिस्थितीची दया आली असावी, कारण मला Reshma Jadhav यांची माहिती मिळाली. ती ही मुंबईतुन..


कसं आहे ना....काखेत कळसा आणि गावाला वळसा..... मी पुण्यात शनिवार पेठेत आणि रेश्मा मॅडम च ऑफिस पिंपरी चिंचवड मध्ये पण मला माहिती शेकडो किलोमीटरवर दुरवरून मुंबईतुन मिळाली. माझे मिस्टर श्री. निषाद रमेश कोंडे हे पुणे शहर पोलीस मध्ये आहेत, त्यांचे काही बालमित्र हेही पोलीस मध्येच आहेत.. त्यातील एक #PSI_HARISHCHANDRA_THOMBARE जे सध्या #Mumbai_Police मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी रेश्मा मॅडम कडून pure veg डाएट प्लॅन घेतला त्यांचं वजन #95किलो वरून #84किलो पर्यंत आलं होतं, तेही #1महिना मध्ये आणि पुढच्या अजून अर्धा महिना मध्ये अजून 5किलो वजन कमी झालं, त्यांचं टोटल #15किलो वजन जवळपास दीड दोन महिन्यात कमी झालं होतं, तेही कोणतेही Herbal, Ayurvedic, Protein पावडर न वापरता फक्त रोजच्या #HomeMadeFood आणि काही #HomeWorkout मधून. मला तर आधी विश्वास नाही बसला, की फक्त रोजच्या घरगुती डाएट प्लॅन मधून आणि घरीच व्यायाम करून एवढा फरक कसा पडू शकतो.. पण त्यांना फरक पडल्यामुळे त्यांचा मुलगा #Omkar_Thombare यानेही #Nutritionist + Fitness Coach Reshma Jadhav यांच्याकडून प्लॅन घेतला, त्याचेही #3week मध्ये #7kg_loss झाले होते, त्यांच्या वहिनी #Vidya_Thombare हिचेही 2 महिन्यात #10kg_loss झाले होते, तसेच त्यांचे अजून एक मित्र #PSI_RAVINDRA_SHINGTE .. यांची दोन मुले #Vishal_Shingate याचे 6 महिन्यात 117kg to 87kg असे जवळपास #30kg loss झाले होते, मुलगी #Aishwarya_Shingate हिचे #15kg_loss, आणि मिस्टरांची बालमैत्रिण #Shalan_Jagatap हिचे #12kg_loss आणि तिची मुलगी Tanya Jagtap हिचे 10kg loss झाले होते.. डोळ्यासमोर एवढे सर्व refrence असताना मलाही पुन्हा एकदा माझ्या वजनाविषयी आशा निर्माण झाली होती. वाढत्या वजनामुळे नकारात्मक भावनेत असताना सर्वांकडून एक नाव आशेचा किरण म्हणून दिसत होत तो म्हणजे, None other than Reshma Jadhav.



मग मी ही त्याना संपर्क साधायच ठरवलं.. तरीही माझ्या मनात धाकधूक ही होती की गर्भाशयाची पिशवी काढल्यानंतर अवघ्या 3 महिन्यात मी व्यायामाला सुरवात करु शकेन का नाही? केला तर काही त्रास होईल का? माझ्या डॉ नि मला हलका व्यायाम करायला परवानगी दिली होती. Reshma Jadhav मॅम ने मला काही घरगुती व्यायाम सांगितले आणि डाएट प्लॅन दिला, आणि मला त्या व्यायाम आणि डाएट प्लॅन ने काहीही त्रास झाला नाही. मला त्यांच्यामध्ये सर्वात जास्त हे आवडलं की त्यांचं #Friendly बोलणं, आणि #Down_to_earth असणं.. कुठेही त्यांच्या वागण्या बोलण्यात बडेजावपणाचा आव नाही, अगदी आत्मीयतेने त्या आपलं म्हणणं ऐकून घेतात आणि आपल्याला होणारा त्रास प्रामाणिकपणे त्यांच काम करून कमी करण्याचा प्रयत्न करतात. एकदा डाएट आणि exercise प्लॅन देऊन सोडून दिलं, अस होत नाही त्यांच्याबाबतीत प्रत्येक 8-8 दिवसानी फॉलो अप घेणं, #PersonalAttention देणं. जर आपल्याला डाएट करण्याचा कंटाळा आला कधी demotivate झालो तर सतत #,Motivation देण्याचं काम त्यांनी केलं, अजूनही करत आहेत. मी जेव्हा डाएट प्लॅन सुरू केला तेव्हा आमच्या शेजारी , नातेवाईक कितीतरी लोकांनी डाएट करू नको, अशक्तपणा येतो वगैरे अस सर्व सांगून demotivate करण्याचा प्रयत्न केला. पण डाएट सुरू केल्यानंतरचा माझा अनुभव याचा अगदी विरुद्ध होता कारण मला मिळणार जेवण हे घरातीलच होत. कोणताही फॅन्सी डाएट नव्हता. आम्ही नॉनव्हेज जास्त खातो, तर रेशमा मॅम ने मला चिकन, अंडी, फिश अस माझ्या आवडत्या पदार्थां मध्ये डाएट बनवून दिलं, आणि ते मी खरोखर एन्जॉय करत खाल्लं, अजूनही करते आहे. कुठेही उपाशी राहण्याची यात गरज नव्हती उलट जे दिलं आहे तेच डाएट मला संपायच नाही. माझ्या मैत्रिणी म्हणायचंय "अग तू एवढं सर्व खाते आहेस, वजन नक्की कमी करायचं आहे की वाढवायचं आहे..?" पण त्यांना कुठे माहीत होतं रेश्मा मॅडम नी दिलेलं डाएट मी नुसतं "करत" नव्हते "एन्जॉय करत" होते. त्यामुळे माझ्याकडुन ते खाल्लं गेलं आणि व्यायामही केला जात होता. मी प्रत्येक 8-8 दिवसाला फॉलो अप देत होते. प्रत्येक आठवड्यात माझं वजन थोडं तरी कमी होतच होत. वजनाचा काटा जसा हळूहळू मागे सरकत होता, तसा माझा कॉन्फिडन्स वाढत होता. प्रत्येक वीक ला रेशमा मॅम माझे results मला दाखवून द्यायच्या. माझे 4-4 operation झाल्यामुळे अगदी इतरांसारख वेगात वजन कमी होईल ही अपेक्षा नव्हतीच ठेवली मी, पण तरीही रेशमा मॅम ने माझ्यावर घेतलेले efforts वेळोवेळी दिलेले motivation, weight लॉक झाल्यावर ते पुन्हा कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न यासाठी मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहीन.

रेश्मा मॅडम च्या प्रयत्नांमुळे मुळे आज 6 महिन्यात माझं वजन 73किलो वरून 60किलो वर आलं आहे. रेश्मा मॅडम च्या इतर क्लायंट चे result पाहता १२ किलो वजन कमी करण्यासाठी इतरांना अगदी एक दीड महिना ही पुरेसा होता. पण माझं अधून मधून काही कार्यक्रमानिमित्त गावी जाणं व्हायचं. त्यामुळे डाएट ब्रेक होत होत.. मे मध्ये तर महिनाभर गावी राहिल्याने महिनाभर "डाएट ब्रेक" झाला पण तरीही पुन्हा येऊन जेव्हा माझं वजन केलं ते जैसे थे राहत होतं. मग पुन्हा जोमाने डाएट, exercise सुरू केलं आणि आज माझं वजन 60किलो आहे, माझं वजन कमी झाल्याने माझ्या मुलीने नुकताच मला हा टी शर्ट आणि जीन्स गिफ्ट केला. साडीवरून जीन्स पर्यंत हा प्रवास आला याच श्रेय पूर्णपणे रेशमा मॅडमचच आहे. माझ्यातला हा बदल पाहून माझं मन आता उडू उडू उडू झालंय. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझ्यात एवढा बदल या वयात आणि शरीरावर एवढे सर्व प्रयोग झाल्यावर घडून येईल. रेश्मा मॅडम नी माझं वजनच कमी केलं नाहीय तर एक वेगळा आत्मविश्वासही दिलाय. काही महिन्यांपूर्वी मी स्वतः ला म्हातारी आपलं कसं होणार याबाबत समजावत होती आणि आज स्वतःला रोमॅंटीक गाण्यांवर झुलताना पाहतेय. अगदी घरातूनच नातेवाईकांकडून तर अगोदरची बेडौल "सैराट ची आर्ची" वरून आत्ताची सुडौल "आर्ची" दिसतेस ही कंमेंट ऐकायला मिळालीय. आता हे वजन येत्या दिवाळीपर्यंत 60 वरून 50 वर आलं पाहिजे हा आत्मविश्वास ही मला रेश्मा मॅम ने दिला आहे, आणि त्यादृष्टीने माझी वाटचाल ही सुरू झाली आहे, Thank you Reshma mam, Thank you Fitness Naturo Thank you so much... 




तुमच्यामुळे आमच्यासारख्या जाड बायकांना आत्मविश्वास आणि प्रोत्साहन मिळते. तुमच्या motivation मुळे diet and exercise वेळेवर होते, यापुढेही तुमच्या साथीने पुढचा 10 किलो चा डोंगर मी सहज पार करेन असा विश्वास वाटतो. मी कायम तुमच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या या ग्रेट कामासाठी तुम्हाला शुभेच्छा देईन, आणि माझे फिटनेस गुरू आणि मार्गदर्शक म्हणून गुरुपौर्णिमेच्या तुम्हला खूप खूप शुभेच्छा..💐🙏 आणि स्वामी चरणी प्रार्थना करते की माझ्यासारख्या निराश झालेल्या अनेक बायकांच्या चेहऱ्यावरचे हास्य फुलविण्याचे सामर्थ्य आणि भाग्य तुम्हास मिळो.. Fitness Naturo 😊🙏❤️

Wednesday, November 2, 2022

Chaitanya Kulkarni




Chitanya Kulkarni

(These Feedback are given by Client on various groups, WhatsApp or other Social Media platforms. All these Original Feedback are Copied Here)

Client ID :- 124

Client Name:- Chaitanya Kulkarni

Age:- 23

Job :- TCS

Other Skill:- Japanese Language Instructor

Target Achieved of Weight Loss:- 17Kg (70 Kg To 52 Kg)

Feedback given Facebook Group :-

#SuperPositiveReview

#WeightlossReview
खर तर मला लिहायला जमत नाही पण आज हा Review लिहितीये #Nutritionist + #FitnessConsultant + #Fitness coach #ReshmaJadhav यांच्या साठी, ज्यांनी माझ स्वप्न पूर्ण केलं. मी Chaitanya Vijay Kulkarni, Age 23 जन्म झाला तेव्हा मी #underweight होते आणि २-४ दिवस मला Incubator मध्ये ठेवले होते. त्या नंतर पण कॉलेज ला १२ वीत (२०१६) असे पर्यंत माझं वजन नियंत्रणात होते पण २०१८ पासून वजनात थोडा फरक पडायला लागला, थोडाफार फरक असल्याने २०१९ पर्यंत मी लक्ष दिले नाही. २०२० ला कोरोना आला आणि संपूर्ण जगच बंद पडले आणि तेव्हा पासून माझे वजन लक्षणिय प्रमाणात वाढू लागलं. त्यातच मला #PCOS असल्याचे डॉक्टरांनी निदान केलं. वजनाचा काटा #70.6KG वर जाऊन पोहोचला पण अभ्यास, करियर या गोष्टी तेव्हा जास्त महत्वाच्या वाटल्याने शरीर देत असलेल्या वॉर्निंगकडे मुळीच लक्ष दिले नाही. हा दुर्लक्षितपणा मी ऑक्टोबर २०२१ पर्यंत केला… शिक्षण संपल चांगली नोकरी मिळाली आणि शिक्षण, करियर च्या दृष्टीने थोडंफार स्थिरस्थावर झाल्यावर मात्र या वाढलेल्या वजनाकडे लक्ष जायला लागलं... पूर्वी जसे आपण #स्लिम_ट्रिम होतो तसे पुन्हा होण्यासाठी माझे प्रयत्न चालू झाले. माझा हा शोध जानेवारी २०२२ मध्ये #Fitness_Naturo च्या *Reshma Jadhav* यांच्या इथे येऊन संपला. फेसबुकवर त्यांच्या क्लायंटचे एक दोन आठवड्यातच झालेल्या #Weightloss चे #reviews बघितले असल्याने जास्त चौकशी न करता माझा #Pure_Veg_Diet_Plan चालू केला.
पण खरं सांगायचं तर माझं वजन कमी होईल आणि मी पुन्हा #slim and #trim दिसेन इतका आत्मविश्वास नव्हता. रेश्मा मॅडम सोबत सुरुवातीला जुजबी बोलणं झालं तेव्हा त्यांच्या बोलण्यातून जाणवलं कोणतीही गोष्ट करण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी, काहितरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते याची धमक गरजेची असते. मी स्वतः ला निक्षुन सांगितले मला हे करायचेच आहे. मला काहीही करून आयुष्यातल हे आव्हान स्वीकारायलाच हवं आणि जिंकालायच हवं. आजवर शिक्षण आणि करियर बाबतीत मी जशी मेहनत घेतली तशी आताही मेहनत घेतली तर हे "कठीण ध्येय्य" साध्य करणे "अशक्य" नक्कीच नाहीय.डाएट सुरू झालं आणि बघता बघता पहिला आठवडा संपला आणि वजन 70.6 वरून 67.4 वर आलं. जवळपास 3kg #weightloss मी 10 दिवसांत केलं होतं. वजन काट्यावर मी माझं वजन पाहिलं आणि 10 दिवसांत झालेले बदल पाहून मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. या पहिल्याच Result ने मला खूप प्रोत्साहित केले. एक वेगळा आत्मविश्वास मला मिळाला. आता या #Weightlossjourney मध्ये मी एक पाऊल पुढे टाकलं होतं.
पुढे प्रत्येक दिवशी डाएट follow करत दर आठ दिवसाला रेश्मा मॅडम ना #Followup देत होते. त्यांचं मार्गदर्शन घेत होते. बघता बघता एप्रिल महिना संपत आला आणि माझं वजन एकूण #18kg वजन कमी झालं. वजनाचा काटा #70.6 वरून #52.9 वर आला आणि माझा जीव भांड्यात पडला. 5 महिने केलेला #Strict Diet, रोज न चुकता केलेला #व्यायाम, माझे लाडके पदार्थ, Chinese, Pasta, Biryani, Cake ,samosa आणि Vada pav ची दिलेली कुर्बानी , Reshma ma'am चा खंबीर #support व #valuable #guidance , Last but not the least माझ्या घरच्यांनी दिलेला पाठिंबा, प्रेम या सगळ्या मुळेच हे यश मी मिळवू शकले.
या #Weightloss मुळे मी *PCOS reverse* करण्यात यशस्वी ठरले आहे. नुकतेच नात्यातल्या एका लग्नासाठी मी कपडे खरेदी केले पण एरवी मला XL, XXL कुर्ती लागत होती आता L आणि M अगदी व्यवस्थित होतात हे पहिले तेव्हामाझा आनंद गगनात मावत नव्हता. लग्नात तर प्रत्येकजण हा माझ्यातला लक्षणीय बदल पाहून मला विचारत होता. माझी तर एक कायम सुप्त इच्छा होती की माझे सुद्धा आलीया भट्ट सारखे "Collar Bone" दिसावेत आणि आता ते चक्क दिसतायत...



हे सगळं होता माझ्या Weightloss journey बद्दल,आता थोडं बोलायचं आहे Reshma ma'am बद्दल, ज्यांच्यामुळे हा गड मी सर करु शकले. जेव्हा जेव्हा मी #demotivate झाले तेव्हा तेव्हा तुम्ही मला #motivate करुन "तु हे करू शकतेस" आणि "यशस्वीपणे पूर्ण करू शकतेस" याची जाणीव करून दिली. त्या बोलताना फिटनेस बाबत आणि एकूण सगळ्या परिस्थितीबाबत जेव्हा बोलतात तेव्हा एक वेगळी सकारात्मकता मी कायम अनुभवली आहे. माझ्या या यशात तुमचा सिंहांचा वाटा आहे. पैसे घेऊन #service देणारे खूप असतात पण, क्लायंट च्या मानसिकतेला, आजूबाजूच्या परिस्थितीला आपलेपणाने समजून घेऊन मार्गदर्शन करणे, प्रोत्साहित करणे सगळ्यांना जमत नाही... पण हे कौशल्य तुमच्यात आहे. तुम्ही जेव्हा मार्गदर्शन करता तेव्हा कुणी मोठ्या Dietition आहात वगैरे हा अविर्भाव अजिबात नसतो एक मैत्रीण दुसऱ्या जिवलग मैत्रिणीशी आपलेपणाने बोलतेय अस कायम जाणवतं. या आपलेपणाने कोणतीही गोष्ट share करताना प्रश्न विचारताना मनात कुठलाही किंतु परंतु नसतो. तुमचं मार्गदर्शन आणि आधार त्या प्रत्येकाला मिळो जो माझ्या प्रमाणे weightloss बाबत सिरियसली विचार करत असेल. तुम्ही एक *Best Dietician* म्हणून नावारूपाला येवो अशी मी देवाकडे प्रार्थना करते. माझ्या या weightloss च्या प्रवासात माझ्यासोबत अजून एक व्यक्ती तुमची मोठी फॅन झालीय ती म्हणजे माझी #आई. कोणत्याही आईला तिच्या मुलीच्या आयुष्यात असा अत्यंत आनंदाचा क्षण देणारी व्यक्ती ग्रेटच असते. तिच्याकडून ही तुमचे खूप खूप आभार #Weightloss च्या या प्रवासात माझ्या व्यक्तिमत्वात झालेले लक्षणीय बदल पाहून माझ्याइतकी माझी आई सुद्धा खुश आहे तुमच्यावर... तुमच्या फेसबुक प्रोफाइल वर जेव्हा बरेच जुने फोटो पाहिले तेव्हा कळलं की तुम्ही एक #बेस्ट #डाएटिशियन का आहात ते. तुमच्या जुन्या फोटोत तुमच वजन बऱ्यापैकी वाढलेलं वगैरे दिसलं. जेव्हा तुमच्याशी फोन वर बोलले तेव्हा कळलं तुमचं लग्न झालंय आणि त्याला तब्बल १६-१७ वर्ष झालीत आणि तुम्हाला एक १३-१४ वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर आणि मुलं झाल्यावर अनेक मुलींच्या फिटनेसचे तीन तेरा वाजलेले मी आजूबाजूला पाहिलेत पण तुम्ही तर पूर्वी होतात त्या पेक्षा आत्ताच्या फोटोत अजून तरुण किंबहुना वयाने लहान झालेल्या दिसताय. त्यावरूनच कळलं की फिटनेस तुमच्यासाठी पैसा कमवायचा साधन नाहीय ती एक साधना आहे. फिटनेस तुमच्या रोजच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. तुम्ही स्वतः स्वतःला इतकं फिट ठेवलंय त्यामुळे दुसऱ्यांना फिटनेस चे सल्ले देण्याचा नैतिक अधिकारच तुम्हाला मिळतो. जी व्यक्ती स्वतः इतकी स्लिम ट्रिम आणि फिट आहे तिचा प्रत्येक सल्ला हा योग्यच असणार हे नक्की... खरच रेश्मा मॅडम हे मी सगळं अगदी मनापासून बोलतेय... तसही मी तुम्हाला पैसे पेड केले तुम्ही माझं डाएट दिल मला माझा रिझल्ट आला त्यामुळे असा review वगैरे द्यायची मला तशी फारशी गरज नव्हती. पण तुमच्या डाएट ने मला नुसतं माझं स्लिम ट्रिम आणि आरोग्यपूर्ण शरीर मिळवून दिलं नाहीय तर एक वेगळा आत्मविश्वास सुद्धा मिळवून दिलाय जो मला आयुष्यभर प्रत्येक क्षेत्रात काम करताना उपयोगी पडणार आहे.




So Finally, ही ५ महिन्यांची weightloss journey संपत असली , तरी आता खूप मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे एवढी केलेली मेहनत टिकवण्याची, ती पण मी नक्कीच पेलवू शकेन असा विश्वास मला वाटतो.. खरतर आजच मी माझ्या सगळ्यात आवडता पदार्थ चायनीज खाल्लाय. जवळपास ५ महिने हे खाण मी टाळलं होत. जोवर माझं वजन ५५ पर्यंत जात नाही तोवर चायनीज खायचच नाही असा प्रण केला होता. आणि माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच चांगला म्हणजे #52kg वर वजन आलं आहे.. आता एक मोठं challenge पूर्ण केल्याच्या आनंदात एक Cheat Day तर बनतोच ना. पण हो पुढेही चॅलेंज पूर्ण झाल्यानंतरही तुम्ही दिलेल्या टिप्स कायम लक्षात ठेवीन कारण शेवटी *शरीर हीच संपत्ती आहे आणि ती आपल्याला कायम जपायलाच हवी* हे तुमचं वाक्य मी डोक्यात कायमच फिक्स केलंय. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद रेश्मा मॅडम. मला तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीय. जे weightloss च स्वप्न डिसेंबर २०२१ पर्यंत मला अशक्य वाटत होतं ते २०२२ वर्ष अर्ध होईपर्यंत मी पूर्ण करू शकले. कोणत्याही संकटात सापडल्यावर देव मदतीला धावून येतो तसे तुम्ही आहात माझ्यासाठी. जरी weightloss टार्गेट संपत असलं तरी तुमच्या सारखी मैत्रीण मला कायम माझ्या आयुष्यात हवीय. शेवटी जपानी भाषेतून आभार मानते " 本当にありがとうございました " Onec again Thank You So Much Reshma Jadhav Ma'am & Fitness Naturo