Saturday, September 27, 2025

अमोल किराड


 #PulaFridayReview


माझे Husband अमोल किराड यांचा Fitness Naturo by Reshma यांच्यासाठी दिलेला रिव्ह्यू...👇🏻


माझं नाव अमोल किराड आहे. मी आयर्लंडला राहतो. मला रेश्मा मॅडम यांच्या "Fitness Naturo by Reshma" यांच्या बद्दल माहिती फेसबुकवरून मिळाली.


सुरुवातीला वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले, पण अनियमितता आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे काहीच परिणाम दिसत नव्हता. कधी माझं वजन ९० किलो झालं हेही कळलं नाही! जुने कपडे फिट होत नव्हते, स्थूलपणामुळे आळस, कंटाळा आणि उदासीनता जाणवायची.


सुरुवातीला मी त्यांच्या पोस्ट्स पाहायचो, पण मनात शंका होती – “आपल्याला हे जमेल का?” अखेर ठरवलं की एकदा प्रयत्न करून पाहूया.


मी रेश्मा मॅडम यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी दिलेलं डाएट सुरू केलं. हे डाएट अगदी पूरक आणि परिणामकारक ठरलं. पहिल्याच आठवड्यात माझं वजन ८९ वरून ८५ किलो झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आळस पूर्णपणे निघून गेला, शरीर हलकं वाटू लागलं.


त्यांच्या वीकली फॉलो-अप्स मुळे एक टार्गेट मिळालं आणि डाएट तंतोतंत फॉलो करणं सोपं झालं. या काळात मी कोणतेही बाहेरील पदार्थ, शेक्स किंवा सप्लिमेंट्स घेतले नाहीत. तरीसुद्धा वजन सातत्याने कमी होत राहिलं. डाएट सुरू करण्याआधी मला १५-२० प्रश्न होते, पण त्यांच्या टीमने सगळं व्यवस्थित स्पष्ट करून माझ्या शंकांचं निरसन केलं.


सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डाएट नैसर्गिक असल्यामुळे शरीर हलकं वाटतं, जुने कपडे पुन्हा फिट होतात, आणि त्याहून मोठा आनंद दुसरा नाही! आता शरीरात चांगली ऊर्जा जाणवते.


या प्रवासात माझ्या पत्नीने मला खूप साथ दिली आणि तिचा आनंद माझ्यासाठी खास आहे. आजूबाजूचे लोकही माझ्यात झालेला बदल पाहून आश्चर्यचकित आहेत.


सध्या माझं वजन ७८.५ किलो आहे. म्हणजेच एकूण १२ किलो वजन घटलं! माझा ३ महिन्यांचा प्लॅन फक्त ५ आठवड्यांत पूर्ण झाला आणि मला खूप हलकं व ताजंतवानं वाटतंय.


म्हणूनच मी "Fitness Naturo by Reshma" यांची सर्वांना मनापासून शिफारस करतो. 🙏 या खास जर्नीसाठी रेश्मा मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार! 🌸

.......

🌿 माझ्यात झालेले बदल 


1️⃣ वजन ९० किलोवरून ७८.५ किलो पर्यंत घटलं (एकूण १२ किलो कमी).

2️⃣ आळस पूर्णपणे गेला, शरीर हलकं वाटू लागलं.

3️⃣ सतत चांगली ऊर्जा जाणवते.

4️⃣ जुने कपडे पुन्हा फिट झाले.

5️⃣ चेहऱ्यावर आणि शरीरात ताजेतवानेपणा आला.

6️⃣ लोकांना लगेच बदल जाणवतो आहे.

7️⃣ आत्मविश्वास वाढला आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल झाला.

No comments:

Post a Comment