#PulaFridayReview
मी स्नेहा सातव. माझी आई सौ. संजीवनी सातव – वय 51 वर्षे, माध्यमिक शिक्षिका, बारामती.. हिने Fitness Naruro By Reshma यांच्याकडे तिचा weightloss program केला. तिचा अनुभव तिच्याच शब्दात खाली देत आहे.👇
मी संजीवनी सातव, वय 51 वर्ष... रेश्मा मॅडमचे व्हिडिओ युट्युबवर पाहिले आणि तिथूनच त्यांची माहिती मला मिळाली. खरं सांगायचं तर मला सुरुवातीला असं वाटत होतं की हा कार्यक्रम खूप स्टॅंडर्ड लोकांसाठी असेल, आपल्याला जमेल की नाही? पण जेव्हा मी या प्रवासाला सुरुवात केली तेव्हा जाणवलं की तसं अजिबात नाही.
रेश्मा मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम खूपच सपोर्टिव्ह आहे. त्यांनी मला प्रत्येक टप्प्यावर खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्या सातत्यपूर्ण सपोर्टमुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि परिणाम देखील झपाट्याने दिसू लागले.
✅ फक्त नऊ आठवड्यांत माझे तब्बल 10 किलो वजन कमी झाले.
✅ माझा दीर्घकाळचा पित्ताचा त्रास पूर्णपणे नाहीसा झाला.
✅ गुडघेदुखीचा त्रास कमी झाला.
✅ सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे – आता मला माझ्या मुलीचे कपडेही फिट होऊ लागलेत!
यातील सर्वात विशेष बाब म्हणजे – या वेटलॉस प्रवासात मला कोणत्याही पावडर, टॅबलेट, शेक किंवा महागड्या गोष्टींची गरजच भासली नाही.
👉 रोजच्या घरच्या जेवणातून – चपाती, भाकरी, भात – या सगळ्या आपल्या नेहमीच्या आहारातूनच माझा वेटलॉस झाला.
👉 कोणत्याही एक्स्ट्रा भाज्या, स्मूदी किंवा पावडर-शेक न वापरता हे शक्य झालं.
👉 त्यामुळे शरीरावर साईड इफेक्ट अजिबात झाले नाहीत, उलट अनेक फायदेच झाले.
आज घरात सर्वांनाच माझ्यातला बदल स्पष्टपणे जाणवतो आहे. माझा चेहरा, माझी चाल, माझं वागणं – सगळं अधिक आत्मविश्वासपूर्ण झालंय. आरोग्य सुधारलंय आणि मन हलकं, आनंदी झालंय.
मी मनापासून रेश्मा मॅडम आणि त्यांच्या टीमचे आभार मानते ❤️ कारण त्यांनी माझ्यासारख्या अनेकांना केवळ वजन कमी करण्यात नाही तर जीवनशैलीत कायमस्वरूपी बदल घडवण्यात मदत केली आहे.
No comments:
Post a Comment