Thursday, February 27, 2025

वर्षा मुळे




 हॅलो!


मी वर्षा मुळे. एक दिवस फेसबुकवर माझ्या मैत्रिणीने रेश्मा मॅडम बद्दल लिहिलेला रिव्ह्यू वाचला. तिने खूप छान वजन कमी केले होते, तिच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल वाचून खूप प्रेरणा मिळाली.


माझ्याही बाबतीत तसाच प्रॉब्लेम होता. प्रेग्नंसीनंतर माझे वजन खूप वाढले होते आणि त्यासोबतच हार्मोनल इश्यूज पण सुरू झाले. त्यामुळे शरीर जड वाटायचं, चेहऱ्यावर सूज यायची, सतत थकवा जाणवायचा. या सगळ्यामुळे आत्मविश्वास कमी झाला होता. कपडे फिट बसत नव्हते, आरशात बघताना स्वतःबद्दल निगेटिव्ह वाटायचं.


हे सगळं बदलायचं ठरवलं आणि रेश्मा मॅडमना संपर्क केला.

त्यांच्याकडे मी १० किलो वजन कमी करण्याचा डाएट प्लॅन सुरू केला आणि फक्त पहिल्याच आठवड्यात ३ किलो वजन कमी झालं!


शरीरात जाणवलेले बदल:


चेहऱ्यावरील सूज खूप कमी झाली आणि स्किन ग्लो करायला लागली.


शरीर खूप हलके वाटायला लागले, चालताना, काम करताना थकवा जाणवेनासा झाला.


आधी खूप आळस यायचा, पण आता दिवस एकदम फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतो.


वजन कमी झाल्यामुळे पायावरची सूज आणि मुंग्या येणं पूर्णपणे थांबलं.



रेश्मा मॅडमचा डाएट प्लॅन का खास आहे?


संपूर्ण घरगुती आहार असतो – महागडे सप्लिमेंट्स, प्रोटीन शेक्स, पावडर किंवा टॅब्लेट्स नाहीत.


सोप्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या एक्सरसाईजेस सांगतात.


दर आठवड्याला फॉलो-अप घेतात, सगळे डाऊट्स क्लिअर करतात आणि खूप छान मोटिवेट करतात.



सर्वात आनंदाची गोष्ट!


माझे घरचे, मैत्रिणी आणि नातेवाईक मला पाहून थक्क झाले!

सगळे म्हणतात – "तू १० वर्षांनी लहान दिसतेयस!" 😀

इतकं सुंदर कॉम्प्लिमेंट मिळाल्यावर अजूनच मोटिवेशन मिळतं!


आता माझा आत्मविश्वास दुपटीने वाढला आहे!


आणि हे सगळं शक्य झालं ते फक्त आणि फक्त रेश्मा मॅडममुळे.

रेश्मा मॅडम, तुमचे मनःपूर्वक आभार!


"Health is Wealth" हे आता खरंच पटतंय. योग्य मार्गदर्शन आणि ठरवलेलं उद्दिष्ट गाठण्यासाठी फक्त दृढ इच्छाशक्ती लागते. तुम्हालाही वेट लॉस करायचं असेल तर नक्कीच योग्य मार्ग निवडा!"



No comments:

Post a Comment