Thursday, February 27, 2025

Vimal Jadhav

 


एक म्हण आहे “दिव्याखाली अंधार”…. पूर्वी तशीच काहीशी ही परिस्थिती होती. मी स्वतः फिटनेस अँड स्पोर्ट्स न्यूट्रिशनीस्ट (आहारतज्ञ).. पण माझ्या आईचं वजन जवळजवळ 75किलो च्याही पुढे निघून गेलं होत..


आतापर्यंत माझे गेल्या 5-6 वर्षातील वेगवेगळ्या वयोगटातील अगदी 8 वर्षाच्या मुलीपासून ते 80 वर्षाच्या आजोबा पर्यंतचे क्लाएंट होऊन गेले.. यात शालेयवयीन मुलींपासून ते अगदी डॉक्टर,वकील,पोलीस, गृहिणी,सर्जन,आर्किटेक्ट, मराठी अॅक्टर असे वेगवेगळ्या क्षेत्रातील क्लाइंटना बेस्ट रिझल्ट मिळाले आहेत. कमीत कमी 15 किलो ते जास्तीत जास्त 60 किलो पर्यंतचे वेट लॉस झालेले, तेही अगदी नैसर्गिक पद्धतीने घरच्या रोजच्या जेवणातून आणि रोज घरातून व्यायाम करून क्लाइंट्सला रिझल्ट मिळवून दिलेले आहेत. यात युके, यु एस, कॅनडा, साऊथ आफ्रिका, झांबीया, स्विझर्लंड, स्वीडन, जर्मनी,जपान, ऑस्ट्रेलिया या ठिकाणच्या NRI क्लाएंटसची संख्या देखील मोठी आहे.


यात कोणत्याही प्रकारे माझे स्वतःचेच कौतुक करावे असा उद्देश नाही. हे सांगण्याच उद्देश हा आहे की देश विदेशातील 900 पेक्षा अधिक समाधानी आणि आनंदी क्लायंट असूनही माझ्या स्वतःच्याच आईचं वजन मी कमी करू शकत नव्हते. तिचं वजन जास्त आहे हे तिला माहित आहे. आणि ते अगदी पूर्वीपासून म्हणजे आम्ही भावंड जेव्हा लहान होतो तेव्हापासूनच मला आठवतच नाही की आई कधीही बारीक होती. तिचं वजन हे माझ्या पप्पांपेक्षाही कायमच दहा किलोने तरी जास्तच असायचं. पण त्यावेळी ती तरुण होती तर तिला त्या वजनाचा एवढा काही त्रास झाला नव्हता, पण जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं, आणि आता वयाची साठी क्रॉस केल्यावर तिला त्या वजनाचा प्रचंड त्रास होऊ लागला.


माझं न्यूट्रिशन मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी तिला तेव्हापासूनच डाएटच महत्व समजावून सांगत होते. पण जसं मी मघाशी म्हटलं की दिव्याखाली अंधार तशीच ही परिस्थिती होती. तिने फारसं कधीच मनावर घेतलं नाही मी एवढ्या सर्व लोकांचे रिझल्ट्स तिला दाखवत होते, पण ते आपण स्वतः करावं आणि आपलंही वजन कमी करावं असं तिला अजिबातच वाटत नव्हतं. तिचं आपलं फास्ट फूड खाणं, तेलकट पदार्थ खाणं, गोड खाणं हे सर्व जिभेचे चोचले चालूच होते. वरून काही सांगायला गेलं तर एकच आयुष्य आहे आणि आता राहिलेच किती दिवस.. खाऊन पिऊन राहू दे असे उपदेशाचे डोस मलाच पाजले जायचे.


शेवटी एक वेळ अशी आली की तिच्या वजनामुळे तिच्या गुडघ्यांवर एवढा ताण येऊ लागला की इतर वेळी दोन दोन तास चालणारी माझी आई ही चार पावलं देखील मुश्किलीने टाकत होती. तिने खूप डॉक्टर केले, फिजिओथेरपिस्ट केले, कसले कसले मसाज घेतले, सर्वांचा म्हणणं हेच होतं की वजन कमी कराव, पण तिला स्वतःला ते वाटत नव्हतं. म्हणून डायट करण्याचं तिचं मन अजूनही होईना पण मग एक वेळ अशी आली की तिला बीपी, शुगर चा त्रास सुरू झाला तरी ती गोळ्या खाऊन राहत होती, पण वजन कमी करायला तयार नव्हती.


शेवटी जे व्हायचं ते झालं तिची क्लोरेस्टॉल लेव्हल खूप वाढली आणि अँजिओग्राफी करण्याची वेळ आली… त्यावेळी मात्र मग ती घाबरली पण अँजिओग्राफी करणं भागच होतं.. तशी ती पूर्वी दोन दोन तास चालायची त्यामुळे तिच्या हार्टच्या सर्वच धमन्या क्लियर होत्या, पण एका छोट्या धमनी मध्ये अगदी मायनर ब्लॉकेज होता. त्यामुळे तिला चालताना दम लागत होता. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं यासाठी अँजिओप्लास्टी करायची तर गरज नाहीये औषधांनी क्लोरोस्टॉल कमी होऊन जाईल.. आणि जेवढा डायट त्या व्यवस्थित पाळतील तेवढं त्या लवकर क्युअर होतील..


आणि आपण म्हणतो ना सोनारानेच कान टोचले पाहिजेत तसंच काहीसं झालं. जेव्हा अगदी हृदयावर गोष्टी गेल्या तेव्हा मग तिची डायट करण्याची तयारी झाली. इतके दिवस मी कानी कपाळी ओरडून सांगत होते की वजन कमी केलं पाहिजे घरातले इतरही सर्व समजावून सांगत होते पण तिला समजत नव्हतं.


पण आता मात्र तिच्या मनाची पूर्ण तयारी झाली होती आणि तिने सिरीयस होऊन डायट सुरू केलं. तिला मी छानसा डाएट प्लॅन बनवून दिला आणि रोज वॉकही करायला सांगितला. त्यानुसार ते आता अगदी सर्व काटेकोरपणे पडत होती. त्यामुळे एकच महिन्यात तिचं जवळपास सहा किलो वजन कमी झालं. आणि तिचे शुगरची गोळी होती तिचा डोस कमी झाला.. असंच हळूहळू करत तिचं आज दहा आठवड्यांनी जवळपास बारा किलो वजन कमी झालेल आहे. आणि तिची शुगरची गोळी जी दोन वर्षांपूर्वी चालू झाली होती ती पूर्णपणे बंद झाली आहे. बीपी चा डोस हा देखील कमी झाला आहे. कोलेस्टेरॉल च्या गोळीचा डोस अगदी मायनर वर आला आहे डॉक्टर तिची प्रगती पाहून खूप खुश झाले आहेत. अजून पाच-सहा किलो वजन कमी झाल्यावर तिची क्लोरेस्ट्रॉल पूर्णपणे बंद होईल हे त्यांनी सांगितलं आहे.


अशाप्रकारे आईसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. असतर नेहमीच प्रत्येकजण फायनान्शिअली, फिजिकली सर्वच गोष्टी आईसाठी करतच असतो.. पण हेल्थ वाईज तिचं अशाप्रकारे वजन कमी करून देण्याचं भाग्य मला लाभलं यासाठी मी खूप कृतज्ञ आहे.. आणि पुन्हा अशी वजन वाढून आरोग्याची हानी होऊ नये याची माझ्या परीने पूर्णपणे काळजी घेईनच आणि तीच म्हातारपण कशाप्रकारे सोपे होईल याकडे माझं कायम लक्ष असेल.. थँक्यू आई माझ्यावर विश्वास दाखवून डाएट फॉलो करून तू स्वतः हेल्थी होण्याचं एक चांगलं गिफ्ट माझ्यासकट आपल्या सर्व कुटुंबाला दिला आहेस. कारण आई व्यवस्थित असेल तर सर्व कुटुंब हेल्दी आणि सुरक्षित असतात.. ती कितीही वर्षाची होऊदे पण तीच “आमच्यासाठी फक्त असणं” ही जाणीवच आम्हा सर्व भावंडांना आधार देणारी आहे. आणि तो असाच आमच्या पाठीशी कायम असू दे..


आणि हो सर्वात महत्वाच .. आता तीच वजन पपा पेक्षाही 7-8 किलो ने कमी आहे😍.. अजूनही 10 किलो ने ते कमी होईल यासाठी मी प्रयत्न करत आहे.✌️👍🏻

वर्षा मुळे




 हॅलो!


मी वर्षा मुळे. एक दिवस फेसबुकवर माझ्या मैत्रिणीने रेश्मा मॅडम बद्दल लिहिलेला रिव्ह्यू वाचला. तिने खूप छान वजन कमी केले होते, तिच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल वाचून खूप प्रेरणा मिळाली.


माझ्याही बाबतीत तसाच प्रॉब्लेम होता. प्रेग्नंसीनंतर माझे वजन खूप वाढले होते आणि त्यासोबतच हार्मोनल इश्यूज पण सुरू झाले. त्यामुळे शरीर जड वाटायचं, चेहऱ्यावर सूज यायची, सतत थकवा जाणवायचा. या सगळ्यामुळे आत्मविश्वास कमी झाला होता. कपडे फिट बसत नव्हते, आरशात बघताना स्वतःबद्दल निगेटिव्ह वाटायचं.


हे सगळं बदलायचं ठरवलं आणि रेश्मा मॅडमना संपर्क केला.

त्यांच्याकडे मी १० किलो वजन कमी करण्याचा डाएट प्लॅन सुरू केला आणि फक्त पहिल्याच आठवड्यात ३ किलो वजन कमी झालं!


शरीरात जाणवलेले बदल:


चेहऱ्यावरील सूज खूप कमी झाली आणि स्किन ग्लो करायला लागली.


शरीर खूप हलके वाटायला लागले, चालताना, काम करताना थकवा जाणवेनासा झाला.


आधी खूप आळस यायचा, पण आता दिवस एकदम फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतो.


वजन कमी झाल्यामुळे पायावरची सूज आणि मुंग्या येणं पूर्णपणे थांबलं.



रेश्मा मॅडमचा डाएट प्लॅन का खास आहे?


संपूर्ण घरगुती आहार असतो – महागडे सप्लिमेंट्स, प्रोटीन शेक्स, पावडर किंवा टॅब्लेट्स नाहीत.


सोप्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या एक्सरसाईजेस सांगतात.


दर आठवड्याला फॉलो-अप घेतात, सगळे डाऊट्स क्लिअर करतात आणि खूप छान मोटिवेट करतात.



सर्वात आनंदाची गोष्ट!


माझे घरचे, मैत्रिणी आणि नातेवाईक मला पाहून थक्क झाले!

सगळे म्हणतात – "तू १० वर्षांनी लहान दिसतेयस!" 😀

इतकं सुंदर कॉम्प्लिमेंट मिळाल्यावर अजूनच मोटिवेशन मिळतं!


आता माझा आत्मविश्वास दुपटीने वाढला आहे!


आणि हे सगळं शक्य झालं ते फक्त आणि फक्त रेश्मा मॅडममुळे.

रेश्मा मॅडम, तुमचे मनःपूर्वक आभार!


"Health is Wealth" हे आता खरंच पटतंय. योग्य मार्गदर्शन आणि ठरवलेलं उद्दिष्ट गाठण्यासाठी फक्त दृढ इच्छाशक्ती लागते. तुम्हालाही वेट लॉस करायचं असेल तर नक्कीच योग्य मार्ग निवडा!"



Tuesday, February 18, 2025

श्रुती जोशी




 #PulaFridayReview 


           नमस्कार मी


श्रुती जोशी. मी फेसबुक च्या  PuLa ग्रुप वर रेश्मा मॅडम च्या weight loss प्लॅन चे काही reviews वाचले.  I was impressed with the success stories shared by those peoples. काही आठवड्यातच त्या लोकांमध्ये फरक जाणवत होता. ते फिट दिसत होते.


एका review मध्ये लिहिले होते कि त्यांनी successfully weight loss केला आणि २ वर्ष झाली अजून हि त्यांचं weight control मध्ये आहे. हे वाचल्या नंतर मी ठरवलंच कि हा weight loss plan जॉईन करायचाच.


मी लगेच दिलेल्या कॉन्टॅक्ट वर कॉल केला आणि Reshma ma'am ला मला असलेले 5-6 doubts विचारले. त्यांनी honestly उत्तरं दिली. 


डाएट प्लॅन follow करायला सुरवात केली. पहिले 2 weeks मला खूप कठीण गेले. कारण मला असा वाटायचं कि मी ऑलरेडी हेल्थी  खाते पण तरी देखील वजन कमी होत नाही कारण माझा मेटाबोलिसम slow असेल कदाचित. पण हा माझा गैरसमज होता.

पहिल्या आठवड्यातच माझा ३ किलो वजन कमी झाला. 

हा  डाएट प्लॅन  आपल्या रोज च्या आहार वर बेस्ड आहे. काही वेगळे बाहेरून आणावे लागले नाही.

Reshma ma'am आणि टीम तुमचा दर आठवड्याला follow up घेतात. ह्यानी तुम्हाला  accountable असल्या सारखे वाटते. 


गेल्या काही आठवड्यात ह्या डाएट प्लॅन मुळे  माझे १० किलो वजन कमी झाले. Reshma ma'am and team च्या सपोर्ट मुळे हे शक्य झाले. त्यांना खूप खूप धन्यवाद.