Wednesday, May 29, 2024

Maithili Pokhare

नमस्कार मी मैथिली पोखरे मुंबई ला राहते. मला रेश्मा बद्दल आणि तिच्या डाएट बद्दल बोलायचं आहे, रेश्मा बद्दल मला कळलं ते फेसबुक च्या " लेक माहेरचा कट्टा " ह्या पेज वरून २०१८ मधे, तेव्हा पासून तिला कॉन्टॅक्ट करायचं होतं ते राहून गेलं, कारण मधल्या काळात एकापाठोपाठ माझ्या दोन्ही पायाचे ऑपरेशन झाले. दरम्यान वजन एवढे वाढत गेले की बाहेर हिंडणे फिरणे मी स्वतःच बंद केले, ५ मिनिट चालले तरी पायात गोळे यायचे, अगदी रोजची भाजी पण घरी मागवून घेत होते, नंतर तर अशी वेळ आली की कॉन्फिडन्स कमी झाला आणि स्वतःला बघून मलाच माझी कीव यायला लागली. मग ठरवलं की आता रेश्माला कॉल करायचा.

एव्हाना २०२३ आलं होतं, रेश्माला कॉल केला तिला पूर्ण परिस्तिथी सांगितली. व्यायाम करण्यावर थोडी बंधन होती, तिने वॉक चा पर्याय दिला, आणि डाएट दिला. आधी मला वाटलं होईल का माझ्याकडून पण केलं नेटाने, १ तास योगा सोबत, ४५ मिनिट वॉक पण केला.

 



मी हे करू शकेन हा आत्मविश्वास रेश्माने दिला, प्रत्येक आठवड्याला फॉलोअप मधे ती सूचना करत होती आणि मी त्या पाळत गेले. सुरवातीला ८० किलो वजन डाएट पूर्ण झालं तेव्हा ६४ कीलोवर आले तेही फक्त रोजच्या जेवणातील डाएट प्लॅन मधून आणि कोणतेही बाहेरचे महागडे फॅन्सी डाएट न घेता, त्यामुळे लोकं मला माझ्या २२ वर्षाच्या मुलीची मोठी बहीण म्हणायला लागले 😍

तो आनंद वेगळाच होता.

Thank you so much Reshma तूझ्यामुळे शक्य झाले हे.

#Fitness #Weightloss #Weightgain #Weightloss #Challegnge